Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Jun 6, 2021, 10 tweets

६ जून - आज शिवराज्याभिषेक दिवस अर्थात #हिंदू_साम्राज्य_दिवस 🚩

१६७४ साली आजच्याच दिवशी आपले शिवाजीराजे छत्रपती झाले.

सभासदाने केलेलं वर्णन वाचून आंगावर काटा येतो👇🏼

या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.

१/१०

‘हिंदू साम्राज्य दिवस’ - हे ऐकलं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागतं.

ही तीच लोकं आहेत ज्यांचे शिवछत्रपतींचे हिंदुत्व हिरावून घेण्याचे आणि त्यांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे केविलवाणे प्रयत्न नेहमी फसेलेले आहेत.

पण हिंदवी स्वराज्य हे हिंदुंचं स्वराज्य होतं.

२/१०

आणि असं मी नाही तर समकालीन संदर्भ सांगतायेत.

🔸वा.सी.बेंद्रे त्यांच्या ‘Coronation of Shivaji The Great - गागाभट्टकृत: श्रीशिवराजाभिषेकप्रयोग:’ मध्ये काय लिहीतात ते वाचा👇🏼

शिवछत्रपतींच्या महाराजाभिषेकात हिंदु धर्मातील चार ही वर्णांनी सहभाग घेतला होता.

३/१०

वैदिक मंत्रानी शिवाजीराजेंना भगवान श्रीविष्णुचा प्रतिनिधी करण्यात आलं. हा प्रत्येक अभिषिक्त राजाचा मान असतो.

शिवछत्रपती हे ब्राह्मणांचे राजा होते, क्षत्रियांचे राजा होते, वैश्यांचे राजा होते आणि शुद्रांचे राजा होते.

महाराजाभिषेकानंतर शिवछत्रपती हे हिंदुंचे राजा झाले होते.

४/१०

🔸धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी आपल्या दानपत्रात आपल्या पूर्वजांसाठी वापरलेल्या या बिरुदावली -
‘देवब्राह्मणप्रतिपालक, हैंदव धर्म उद्धारक, क्षत्रियकुलावतंस आणि म्लेंच्छक्षयदीक्षित’ पण हे साफ करतात.

५/१०

🔸”आतां हे हिंदु राज्य जाहले...”

- स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज

हे मूळ पत्र ज्यावर कोरले आहे तो प्रसिद्ध हडकोळण शिलालेख आजही पणजी मध्ये गोवा राज्य संग्रहालयात आहे.

स्वराज्याच्या छत्रपतींपेक्षा कोणाचाही शब्द मोठा नाही!

६/१०

🔸पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या प्रत्येक प्रधान/सरदार - पेशवे, प्रतिनिधी, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर, पवार, आदि यांनी त्यांच्या ‘हिंदुपदपादशाही’ स्थापण्यासाठी केलेल्या प्रत्येक कृतितून पण हेच सिद्ध केलेलं आहे.

७/१०

🔸पुढे १७६१ मध्ये लिहीलेल्या ‘बखर पानिपत ची’ ह्यात कोल्हापूर चे रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी श्रीमंत भाऊसाहेबांच्या तोंडी घातलेले शब्द👇🏼

“हे हिंदुची पातशाई.......................तीन च्यार लक्ष फौजेचा पातशाहा आमचा पातशाहा छत्रपती महाराज...”

८/१०

गेल्या वर्षी थोर शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी अशा अनेक समकालीन पुराव्यांसह शिवराज्याभिषेक दिवस म्हणजेच हिंदुसाम्राज्य दिन हे सिद्ध केलेलं आहे.

ज्यांना हे पटत नाही त्यांनी खुशाल मेहेंदळे गुरुजींच्या पुराव्यांना खोडून दाखवावं.



९/१०

🚩🙏🏼हैंदव धर्म-उद्धारक म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन🙏🏼🚩

आणि सर्व शिवभक्तांना #शिवराज्याभिषेक_दिन अर्थात #हिंदू_साम्राज्य_दिवस च्या कोटी-कोटी शुभेच्छा💐🚩

१०/१०

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling