१६७४ साली आजच्याच दिवशी आपले शिवाजीराजे छत्रपती झाले.
सभासदाने केलेलं वर्णन वाचून आंगावर काटा येतो👇🏼
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.
१/१०
‘हिंदू साम्राज्य दिवस’ - हे ऐकलं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागतं.
ही तीच लोकं आहेत ज्यांचे शिवछत्रपतींचे हिंदुत्व हिरावून घेण्याचे आणि त्यांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे केविलवाणे प्रयत्न नेहमी फसेलेले आहेत.
पण हिंदवी स्वराज्य हे हिंदुंचं स्वराज्य होतं.
२/१०
आणि असं मी नाही तर समकालीन संदर्भ सांगतायेत.
🔸वा.सी.बेंद्रे त्यांच्या ‘Coronation of Shivaji The Great - गागाभट्टकृत: श्रीशिवराजाभिषेकप्रयोग:’ मध्ये काय लिहीतात ते वाचा👇🏼
शिवछत्रपतींच्या महाराजाभिषेकात हिंदु धर्मातील चार ही वर्णांनी सहभाग घेतला होता.
३/१०
वैदिक मंत्रानी शिवाजीराजेंना भगवान श्रीविष्णुचा प्रतिनिधी करण्यात आलं. हा प्रत्येक अभिषिक्त राजाचा मान असतो.
शिवछत्रपती हे ब्राह्मणांचे राजा होते, क्षत्रियांचे राजा होते, वैश्यांचे राजा होते आणि शुद्रांचे राजा होते.
महाराजाभिषेकानंतर शिवछत्रपती हे हिंदुंचे राजा झाले होते.
४/१०
🔸धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी आपल्या दानपत्रात आपल्या पूर्वजांसाठी वापरलेल्या या बिरुदावली -
‘देवब्राह्मणप्रतिपालक, हैंदव धर्म उद्धारक, क्षत्रियकुलावतंस आणि म्लेंच्छक्षयदीक्षित’ पण हे साफ करतात.
५/१०
🔸”आतां हे हिंदु राज्य जाहले...”
- स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज
हे मूळ पत्र ज्यावर कोरले आहे तो प्रसिद्ध हडकोळण शिलालेख आजही पणजी मध्ये गोवा राज्य संग्रहालयात आहे.
स्वराज्याच्या छत्रपतींपेक्षा कोणाचाही शब्द मोठा नाही!
६/१०
🔸पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या प्रत्येक प्रधान/सरदार - पेशवे, प्रतिनिधी, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर, पवार, आदि यांनी त्यांच्या ‘हिंदुपदपादशाही’ स्थापण्यासाठी केलेल्या प्रत्येक कृतितून पण हेच सिद्ध केलेलं आहे.
७/१०
🔸पुढे १७६१ मध्ये लिहीलेल्या ‘बखर पानिपत ची’ ह्यात कोल्हापूर चे रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी श्रीमंत भाऊसाहेबांच्या तोंडी घातलेले शब्द👇🏼
“हे हिंदुची पातशाई.......................तीन च्यार लक्ष फौजेचा पातशाहा आमचा पातशाहा छत्रपती महाराज...”
८/१०
गेल्या वर्षी थोर शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी अशा अनेक समकालीन पुराव्यांसह शिवराज्याभिषेक दिवस म्हणजेच हिंदुसाम्राज्य दिन हे सिद्ध केलेलं आहे.
ज्यांना हे पटत नाही त्यांनी खुशाल मेहेंदळे गुरुजींच्या पुराव्यांना खोडून दाखवावं.
९/१०
🚩🙏🏼हैंदव धर्म-उद्धारक म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन🙏🏼🚩
#Thread: समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद खंडपीठाचा ‘तो’ निकाल!
इतिहासाचे विकृतीकरण हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक बाष्कळ वाद आपण सर्वांनीच ऐकले/वाचले आहेत. त्यात दोन्ही बाजूंचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे शिवसमर्थ संबंध.
१/७
शिवसमर्थ संबंधांवर वाद सुरु झाला की आजकाल एक नवीनंच गोष्ट ऐकायला मिळेत. ती म्हणजे औरंगाबाद उच्चन्यायालयाने या संबंधांवर दिलेल्या निकालाची.
या सोबतंच कुठल्यातरी फालतू स्थानिक वृत्तपत्रातील हे👇🏼कात्रण फिरवून लोकांनी दिशाभूल केली जाते.
२/७
आता औरंगाबाद हे बॉम्बे उच्चन्यायालयाचे एक ‘खंडपीठ’ आहे हे ही या विचारदळिद्री लोकांना माहिती नसतं. असो.
पण खरंच औरंगाबाद घटनापीठाने रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नाहीत असा ‘निकाल’ दिला आहे का? शिव-समर्थांचा एकत्रीत फोटो टाकल्यास खरंच कारवाई होऊ शकते का?
#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.
रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.
१/१२
होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.
२३ जुलै, १८५६ रोजी आजच्या टिळक आळीतील या वाड्यात जन्माला आलेला केशव गंगाधर टिळक पुढे जाऊन तत्कालीन भारताच्या…
२/१२
राजकारणातील सर्वोच्च नेता होईल असा कोणी विचार तरी केला असेल का? पण स्वकर्तृत्वाच्या व बुद्धिमतेच्या जोरावर केशव तथा बाळ ‘लोकमान्य’ झाले!
गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या भारतीयांना भारतीयत्वाची जाणीव करुन देऊन पुन्हा एकदा स्वराज्याची आठवण लोकमान्य टिळकांनी करुन दिली.
#Thread: छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ही कुठे ही मशीद बांधली नाही!
राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर कधी थांबेल कोणासठाऊक. दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे महाराजांच्या अद्वितीय इतिहासाचे विकृतीकरण महाराष्ट्रात होत आहे.
गंगाधर यशवंत आणि राघोबादादा यांचे कारस्थान - ही मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या सत्तासंघर्षाची एक बाजू आहे.
नेहमीप्रमाणे, नाण्याची एकंच बाजू दाखवून काँग्रेस च्या चमच्याने त्याचे काम चोख बजावले आहे.
पण इतरांना दुसरी बाजू कळणे गरजेचे आहे.
२/७
गंगोबा तात्या चंद्रचूड आणि राघोबादादा यांचे कारस्थान रंग घेत असताना अहिल्याबाईंनी मराठ्यांचे तत्कालीन पंतप्रधान (पेशवे) थोरले माधवराव यांना पत्रव्यवहाराद्वारे सगळी हकीकत कळवली.
माधवरावांसारख्या करारी राज्यकर्त्याने स्वराज्यहितापुढे आपल्या सख्ख्या काकाला ही सोडले नाही.
अभ्यासपूर्ण लेख लिहीण्याचा प्रयत्न केलास पण गर्वाने “सत्य उशिरा येत पण पद्धतशीर घोडा लावून जात” - ही टिप्पणी करुन स्वतःचा विचारदळिद्रीपणा सिद्ध करायला विसरला नाहीस.
असो, बघ आता ‘घोडे कसे लागतात ते’😋
आणि हो, #Thread: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालकंच’!
यंदाच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच मजा होता. एक वेगळाच उत्साह होता. पाऊसातही तो उत्साह काही कमी झाला नाही. पाऊसातल्या गर्दीत ही श्रींना माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह काही मी आवरु शकलो नाही. त्यातील काही छायाचित्रे या थ्रेडमध्ये टाकत आहे.
१/१०
मानाचा पहिला - श्री कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत ज्याची स्थापना दस्तुरखुद्द हिंदुराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केली होती.
२/१०
मानाचा दुसरा - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर विराजमान झालेला हा गणपती मला वयक्तिकरित्या सगळ्यात आवडतो.