PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jun 8, 2021, 17 tweets

📡देशातील #COVID19 परिस्थिती संदर्भात 📺 मीडिया ब्रीफिंग

🗓️ आज (8 जून, 2021)
🕓 4 वाजता
📍 नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली

#IndiaFightsCorona
#Unite2FightCorona

@MoHFW_INDIA @mybmcHealthDept @ddsahyadrinews @airnews_mumbai

#Unite2FightCorona

गेल्या आठवड्यापासून सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत 33% घट

5 मे पासून सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घसरण

: सहसचिव, @MoHFW_INDIA

✅3 मे पासून रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ – सध्या हा दर 94.3%

✅सरासरी साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ

#Unite2FightCorona

: सहसचिव, @MoHFW_INDIA

भारतातील #COVID19 लसीकरण

आतापर्यंत 23.62 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

आतापर्यंत 18-44 वयोगटातील 3.04 कोटी लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

आतापर्यंत 45 वर्षांवरील 13.29 कोटी व्यक्तींना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

- सहसचिव, @MoHFW_INDIA

जास्त रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या जिल्ह्यांच्या संख्येत घट, 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान ही संख्या 531 वरून 209 झाली असून या जिल्ह्यात दैनंदिन >100 रुग्णांची नोंद होत आहे.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होऊन ही संख्या आता 13.03 लाख झाली आहे.

-@MoHFW_INDIA

गुजरातमध्ये लोकसंख्येची घनता युकेच्या 1.3 पट आहे.

मात्र गुजरातमध्ये युकेच्या तुलनेत 5.5 पट कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

युकेच्या तुलनेत गुजरातमध्ये प्रतिदशलक्ष लोकसंख्येत एकूण रुग्ण आणि प्रतिदशलक्ष लोकसंख्येत दैनंदिन सर्वोच्च रुग्णसंख्या देखील कमी आहे.

- @MoHFW_INDIA

भारतात,

प्रति दशलक्ष लोकसंख्येतील रुग्णसंख्या जगातील सर्वात कमी रुग्णसंख्यांपैकी एक आहे.

प्रति दशलक्ष लोकसंख्येतील उपचाराधीन रुग्णांची संख्या जगातील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी एक आहे.

-@MoHFW_INDIA

महामारीमध्ये लाटा का येतात?
जेव्हा विषाणू स्वतःमध्ये बदल करून घेतो- नव्याने तयार झालेला प्रकार अधिक संसर्गजन्य असू शकतो
मानवी वर्तन- जेव्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागते आणि निर्बंध शिथिल होतात तेव्हा लोक #COVID प्रतिबंधक नियमांचे पालन थांबवू लागतातत्यामुळे नवी लाट येते-ड़ॉ. गुलेरिया

आपल्याला पुढच्या लाटा थांबवायच्या असतील तर आपल्याला आपल्या लोकसंख्येपैकी एका लक्षणीय संख्येचे लसीकरण होईपर्यंत अतिशय कठोरपणे #COVID प्रतिबंधक नियमांचे पालन करावेच लागेल

- डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक,एम्स

#COVID19 च्या यापुढील लाटा बालकांसाठी गंभीर असतील का?
भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या आकडेवारीत आणि जागतिक आकडेवारीतही असे दिसते की बालकांमध्ये गंभीर संसर्ग झालेला नाही. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या 60-70% बालकांमध्ये सहव्याधी होत्याःडॉ. गुलेरिया

पुन्हा एकदा पूर्वीसारखीच केंद्रीय खरेदी प्रक्रिया सुरू करावी आणि एकत्रित पद्धतीने लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी 12 राज्यांकडून विशेषत्वाने विनंती करण्यात आली.

- डॉ. व्ही के पॉल, सल्लागार (आरोग्य), @NITIAayog

राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी सुधारित मार्गदर्शक नियमावलीः

आमच्यापैकी काही टीम्सनी बाहेर संपर्क साधला, लस उत्पादकांकडून माहिती मिळवली, सर्वात चांगली पद्धती कोणती याबाबत राज्यांशी पद्धतशीर चर्चा केली. जागतिक प्रक्रियांना देखील विचारात घेतले.

- डॉ. व्ही के पॉल

देशातील उत्पादकांकडून सरकार 75% लसींची खरेदी करेल, ज्या राज्यांना मोफत पुरवण्यात येतील

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, आजाराचे प्रमाण, लसीकरणाची प्रगती आणि लसींची नासाडी या निकषांवर पुरवठा करण्यात येईल.

लसीकरणासाठी खालीलप्रमाणे प्राधान्य दिले जाईल:

✔️आरोग्यसेवा कर्मचारी
✔️आघाडीवर काम करणारे कर्मचारी
✔️45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक
✔️ज्यांची दुसरी मात्रा घेण्याची तारीख जवळ आली आहे
✔️18 वर्ष किंवा त्यावरील नागरिक

-डॉ व्ही. के. पॉल

@COVIDNewsByMIB @airnewsalerts

राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांनी 18 वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाचे गट स्वतः निर्धारित करावेत.

केंद्र सरकार लसींच्या पुरवठ्याबाबत आगाऊ माहिती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देईल.

सर्व नागरिक त्यांच्या उत्पन्नाची स्थिती विचारात न घेता मोफत लसीसाठी पात्र आहेत.

ज्यांची शुल्क देण्याची क्षमता आहे ते खाजगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेऊ शकतात.

- डॉ. व्ही. के. पॉल, सल्लागार, @NITIAayog

Unroll @threader_app

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling