Pravinkumar Biradar Profile picture
#Engineering | #Law | Work Is Worship | 🦅

Jul 1, 2021, 12 tweets

स्पष्ट , थेट व शेवटचं !

कोरोना काळात उगविलेले काही काळ्या बुरशीजन्य ट्विटर अकाऊंट काँगेस समर्थक असल्याचा आव आणुन कुणालाही ठरवून ट्रोल करने किंवा फेक माहिती पसरविणे हा धंदा करतात

एकतर महिलेच्या अंगावर अभद्र टिपण्णी करणारे/त्यांना पाठीशी घालणारे पक्षाचे समर्थक होऊच शकत नाहीत 👇

कर्तुत्व शून्य असणारे हे लोक ह्यांच्या #मालका सारख जणू काही CWC मेंबर असल्याचा आव आणतात.

ह्यांना त्यांच्या गावात कोण कुठल्या गटाच आहे हे नीट माहिती नसतं, पण हे आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कुठल्या लेव्हलच्या गप्पा मारत होते ह्याचे एक उदाहरण 👇

आता पक्ष संघटनेत काम करत असताना बाकीच्यापेक्षा आम्ही जवळून पाहतो आहे की, आमचे नेते किती कष्ट घेतात.

मग त्यांच्यावर एखाद्या #मालकाचे गुलाम बनून कुणी काहीही बोलतं असेल तेही काँगेस समर्थक असल्याचा बुरखा आणुन तर ते सहन होण्यापलीकडचे आहे तरी यांना आम्ही संयमाने समजाऊन सांगितलं 👇

मग ह्यांना ह्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन किंवा फोनवर किंवा भेटून समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं की हे जाणीपूर्वक करत आहेत.मग मी थेट one to one विरोध करु लागलो. पण ह्या लोकांचं दारू पिऊन बरगळण वाढतच होत ( त्यांनी स्वतः कबूल केलेली रेकॉर्डिंग आहे )

आता ते स्वत:ला SM किंग वगैरे पदव्या देऊ लागले होते. सगळे मोठे नेते मूर्ख व हे आणि ह्यांचा लिंगपिसाट ग्रूप एवढेच शहाणे ह्या आविर्भावात वागत होते. त्यांना कुणाचीच भिती राहिली नाही मग हे नेत्यासोबत कुणालाही म्हणजे अगदी भगिनींनापण ट्रोल करू लागले ...

नीट विचार करा की, हे नीच माणसं येण्याआधी आपली शक्ती ही फक्त भाजपाविरोधात लावली जात होती. आत्ता ती यांच्यासारख्या काँगेस राष्ट्रवादीच्या ट्रोलर्स विरोधात वाया जात आहे.

आम्ही दोघं भाऊ मिळून काँग्रेस - राष्ट्रवादी मध्ये भांडण लाऊ असं करुन त्यातून विकृत आनंद घेऊ म्हणणारे हे 👇

हे आम्हाला तुमचं काम काय ते विचारू लागले.

एक तर मी किंवा कुणीही पदाधिकारी ह्या लिंगपिसाट ट्रोलर्सला उत्तरे द्यायला बांधील नाहीत.
आम्ही आमच्या पक्षातील नेतृत्वाकडे आमचा कार्य अहवाल सादर करतो. काम विचारायचं असेलच तर एकतर खरे CWC मेंबर व्हा किंवा कमीत कमी संघटनेत या आणि काम करा.👇

आणि ह्यांचा माझ्याबद्दल एक नेहमीचा प्रश्न असतो की , तुमची आम्ही TL बघितली घेल्या ६ महिने वर्षभरात ट्विट कमी आहेत असे म्हणून ट्रोलिंग करतात.

त्यांना सांगायचं आहे की गेले एक ते दीड वर्ष झालं सोशल मीडियाची अधिकृतरित्या माझ्याकडे जबाबदारी नाही. (त्याआधी होती) मग काम काय तर 👇

गेल्या मार्च पासून मी इतर जबाबदाऱ्यासोबतच आमच्या युवक काँग्रेसच्या #SOSIYC साठी महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून काम करतं आहे. पहील्या लॉकडाऊनच्या वेळी हा नंबर संपुर्ण भारतात व्हायरल झाला होता तेंव्हा दिवसाला कधी कधी २००-३०० कॉल यायचे, तेही रात्री बेरात्री 👇

कधीही कॉल यायचे. त्यामुळे खरं म्हणजे बाकी कुणाला बोलायची पण ईच्छा राहायची नाही. त्यात काय इश्यू चालू आहेत हे बघून ट्विट करण तर दुरचीच गोष्ट आहे. डॉक्टरांनी तर फोन बंद ठेऊन थोड निवांत रहा इथ पर्यंत सल्ला दिला होता . तरी आम्ही काम करत करत भाजपच ढोंग उघडं करणं चालूच ठेवल .

त्यानंतर पक्षाने मला बिहार विधानसभा निवडणुकासाठी जबाबदारी दिली. मी आणि आमचे सहकारी कोरोना काळातही तिथे जाऊन महिनाभर काम केलं . मी काय काम केलं हे आमच्या पक्षातील नेत्यांना.. मग ते राष्ट्रिय अध्यक्ष श्रीनिवास सरांपासून ते राज्याचे अध्यक्ष सत्यजीतदादा पर्यंत सगळ्यांना माहिती आहे.

ह्या ट्रोलर्स गँगला सल्ला की, तुम्ही भाजपा विरोधात कथकथित लढाई करत असाल तर नीट संवैधानिकरित्या करा, आमच्या नेत्यांना ट्रोल केलेलं सहन करुन घेणारं नाही.

पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, ते तुम्ही शिकवू नये.

आम्हाला तुमच्या पातळीला येऊ देऊ नका आणि इथुन पुढे वैयक्तिक येऊ नका !

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling