कोरोना काळात उगविलेले काही काळ्या बुरशीजन्य ट्विटर अकाऊंट काँगेस समर्थक असल्याचा आव आणुन कुणालाही ठरवून ट्रोल करने किंवा फेक माहिती पसरविणे हा धंदा करतात
एकतर महिलेच्या अंगावर अभद्र टिपण्णी करणारे/त्यांना पाठीशी घालणारे पक्षाचे समर्थक होऊच शकत नाहीत 👇
कर्तुत्व शून्य असणारे हे लोक ह्यांच्या #मालका सारख जणू काही CWC मेंबर असल्याचा आव आणतात.
ह्यांना त्यांच्या गावात कोण कुठल्या गटाच आहे हे नीट माहिती नसतं, पण हे आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कुठल्या लेव्हलच्या गप्पा मारत होते ह्याचे एक उदाहरण 👇
आता पक्ष संघटनेत काम करत असताना बाकीच्यापेक्षा आम्ही जवळून पाहतो आहे की, आमचे नेते किती कष्ट घेतात.
मग त्यांच्यावर एखाद्या #मालकाचे गुलाम बनून कुणी काहीही बोलतं असेल तेही काँगेस समर्थक असल्याचा बुरखा आणुन तर ते सहन होण्यापलीकडचे आहे तरी यांना आम्ही संयमाने समजाऊन सांगितलं 👇
मग ह्यांना ह्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन किंवा फोनवर किंवा भेटून समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं की हे जाणीपूर्वक करत आहेत.मग मी थेट one to one विरोध करु लागलो. पण ह्या लोकांचं दारू पिऊन बरगळण वाढतच होत ( त्यांनी स्वतः कबूल केलेली रेकॉर्डिंग आहे )
आता ते स्वत:ला SM किंग वगैरे पदव्या देऊ लागले होते. सगळे मोठे नेते मूर्ख व हे आणि ह्यांचा लिंगपिसाट ग्रूप एवढेच शहाणे ह्या आविर्भावात वागत होते. त्यांना कुणाचीच भिती राहिली नाही मग हे नेत्यासोबत कुणालाही म्हणजे अगदी भगिनींनापण ट्रोल करू लागले ...
नीट विचार करा की, हे नीच माणसं येण्याआधी आपली शक्ती ही फक्त भाजपाविरोधात लावली जात होती. आत्ता ती यांच्यासारख्या काँगेस राष्ट्रवादीच्या ट्रोलर्स विरोधात वाया जात आहे.
आम्ही दोघं भाऊ मिळून काँग्रेस - राष्ट्रवादी मध्ये भांडण लाऊ असं करुन त्यातून विकृत आनंद घेऊ म्हणणारे हे 👇
हे आम्हाला तुमचं काम काय ते विचारू लागले.
एक तर मी किंवा कुणीही पदाधिकारी ह्या लिंगपिसाट ट्रोलर्सला उत्तरे द्यायला बांधील नाहीत.
आम्ही आमच्या पक्षातील नेतृत्वाकडे आमचा कार्य अहवाल सादर करतो. काम विचारायचं असेलच तर एकतर खरे CWC मेंबर व्हा किंवा कमीत कमी संघटनेत या आणि काम करा.👇
आणि ह्यांचा माझ्याबद्दल एक नेहमीचा प्रश्न असतो की , तुमची आम्ही TL बघितली घेल्या ६ महिने वर्षभरात ट्विट कमी आहेत असे म्हणून ट्रोलिंग करतात.
त्यांना सांगायचं आहे की गेले एक ते दीड वर्ष झालं सोशल मीडियाची अधिकृतरित्या माझ्याकडे जबाबदारी नाही. (त्याआधी होती) मग काम काय तर 👇
गेल्या मार्च पासून मी इतर जबाबदाऱ्यासोबतच आमच्या युवक काँग्रेसच्या #SOSIYC साठी महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून काम करतं आहे. पहील्या लॉकडाऊनच्या वेळी हा नंबर संपुर्ण भारतात व्हायरल झाला होता तेंव्हा दिवसाला कधी कधी २००-३०० कॉल यायचे, तेही रात्री बेरात्री 👇
कधीही कॉल यायचे. त्यामुळे खरं म्हणजे बाकी कुणाला बोलायची पण ईच्छा राहायची नाही. त्यात काय इश्यू चालू आहेत हे बघून ट्विट करण तर दुरचीच गोष्ट आहे. डॉक्टरांनी तर फोन बंद ठेऊन थोड निवांत रहा इथ पर्यंत सल्ला दिला होता . तरी आम्ही काम करत करत भाजपच ढोंग उघडं करणं चालूच ठेवल .
त्यानंतर पक्षाने मला बिहार विधानसभा निवडणुकासाठी जबाबदारी दिली. मी आणि आमचे सहकारी कोरोना काळातही तिथे जाऊन महिनाभर काम केलं . मी काय काम केलं हे आमच्या पक्षातील नेत्यांना.. मग ते राष्ट्रिय अध्यक्ष श्रीनिवास सरांपासून ते राज्याचे अध्यक्ष सत्यजीतदादा पर्यंत सगळ्यांना माहिती आहे.
ह्या ट्रोलर्स गँगला सल्ला की, तुम्ही भाजपा विरोधात कथकथित लढाई करत असाल तर नीट संवैधानिकरित्या करा, आमच्या नेत्यांना ट्रोल केलेलं सहन करुन घेणारं नाही.
पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, ते तुम्ही शिकवू नये.
आम्हाला तुमच्या पातळीला येऊ देऊ नका आणि इथुन पुढे वैयक्तिक येऊ नका !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कालपासून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रचंड जनसमुदाय आहे, हे दाखविण्यासाठी #WeSupportEknathShinde हा #Trend चालविला जात आहे.
पण, हा ट्रेंड चालविणारे लोक कोणत्या प्रकारचे आहेत, हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य बसेल!
पहिला प्रकार,अबुधाबीमधील मुलींचे फेक अकाउंट 👇👇
(१/५)
दुसरा प्रकार, संघी विचारांची गरळ ओकणारे फेक अकाउंट्स.... (Typical BJP IT Cell Accounts ) 👇👇
(२/५)
तिसरा प्रकार, जे पेड प्रमोशन करण्यासाठी काढलेले फेक अकाउंट्स....👇👇
(३/५)
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.
(०१/०८)
पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.
आता शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि #फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).
आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?
नाही.
(०२/०८)
शिवसेना प्रमुख हे #प्रतिनिधी_सभेचे सदस्य निवडून देतात.
ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमूख ई. असतात.
२०१८ मध्ये एकूण २८२ जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिले होते.
जे लोकं (@Dev_Fadnavis) सांगत आहेत की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या OBC राजकीय आरक्षणाविरोधी निकालाचा आणि केंद्र सरकारचा किंवा फडणवीस सरकारचा काहीही संबंध नाही.
त्यांनी "मी पुन्हा येईन" यात्रेतला ३/८/२०१९ रोजीचा हा व्हिडीओ पूर्ण (२:२०) बघा, वेळ नसेल तर हा थ्रेड पूर्ण वाचा!
(१/८)
कळलं का ?
चर्चा न करता Ordinance द्वारे याविषयी कायदा कुणी केला ?
फडणवीस सरकारने !
मग निवडणूक आयोगाने जिल्हावार ओबिसीचा डेटा नाही म्हणाल्यावर तो डेटा केंद्राकडे आहे (SECC 2011 डेटा) आणि केंद्राकडून तो आम्ही आणुन देऊ असं मा. सुप्रीम कोर्टात कोण म्हणालं ?
फडणवीस सरकार !
(२/८)
मा. सुप्रीम कोर्टाने ८ आठवड्याची मुदत कुणाला दिली?
फडणवीस सरकारला!
( Socio Economic Caste Census (SECC) - 2011 संदर्भात तत्कालीन मंत्री मा. आ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे @Pankajamunde यांनी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांना १८/०९/२०१९ रोजी पाठविलेले हे पत्र पहा.)
आज विश्र्वगुरू , समतेचे प्रणेते, आम्ही लिंगायत ज्यांच्या विचारांचे पाईक आहोत अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती!
त्याबद्दल काल एक ट्विट बनवुन ठेवली होती. आज माझे नेते राहुलजी, अमित साहेब, नाना भाऊ, सत्यजीत दादा यांपैकी कुणाच्या तरी ट्विटला ते ट्विट RT with Comment करणार होतो.पण
(१/n)
अजूनतरी त्यांनी काही ट्विट केलं नाही.
त्यांनी म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी ते ट्विट केलं नाही. मग प्रश्न पडतो की, आपण लिंगायत/बसवविचार मानणारे लोक बसवेश्र्वरांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यास कमी पडत आहोत का ??
(२/n)
जेणेकरुन ह्या नेत्यांच्या टीमला त्यांचे विचार महत्वाचे वाटले नाहीत?
पण तस बघायचं झालं तर नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे, माझे नेते धीरज देशमुख व अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विट केलं आहे. म्हणजे नेत्यांपर्यंत बसवेश्वरांचे विचार किती महत्वाचे आहेत हे सांगण्यात आम्हाला यश आलंय.
(३/n)
खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न.
2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
3/ मला वाटलं की, हे अर्धवट अभ्यासू आहेत त्यामूळे कदाचित असं बोलत असतील .पण, दरवेळेस असं काही वेगळं लिहिलं की, मी ट्विटरवरील प्रसिध्द अशा काही "अभ्यासू" मित्रांना ते ट्विट पाठवत असतो व एरव्ही ते लगेच रिट्विट करतात , परंतु ह्यावेळेस बहुतांश जणांनी ते लाईक सुद्धा केलं नाही.