PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 3, 2021, 8 tweets

देशातील #Coronavirus 🦠 परिस्थितीवर 📺 मीडिया ब्रीफिंग

नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे

⏰ : 4:00 PM

#Unite2FightCorona
लाइव पाहा @PIB_India च्या युट्यूब चॅनेल वर

222 जिल्ह्यांमध्ये #COVID19 रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली असून केवळ 57 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या जास्त केसेस दिसून येत आहेत
यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येचा वाढता कल दिसून येत आहे - @MoHFW_INDIA

78,700 सक्रिय रुग्ण संख्येसह महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्ण संख्येच्या ~20 टक्के रुग्ण आहेत - @MoHFW_INDIA

लसीकरणाच्या वेगामध्ये सातत्याने वाढ होत असून मे मध्ये देण्यात आलेल्या सरासरी लसींच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट लसी देण्यात आल्या. आजवर देण्यात आलेल्या लसींची एकूण संख्या 47.85 कोटी आहे- @MoHFW_INDIA

एक संसर्गित व्यक्ती किती लोकांना संसर्ग करू शकते हे सांगणाऱ्या रिप्रोडक्टिव नंबर मध्ये महाराष्ट्रात घट दिसून आली आहे जो एक चांगला संकेत आहे- @MoHFW_INDIA

100% लसीकरण करण्यामध्ये महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसराचे उदाहरण हे आपल्या संयुक्त प्रयत्नांची यशोगाथा आहे. यासाठी स्थानीय कोरकू भाषेमध्ये जनजागरण केले गेले. आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले-@MoHFW_INDIA

लाइव पाहा

इंडियन ईम्यूनॉलॉजिकल लिमिटेड मधून सप्टेंबरअखेर लसींचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे तर हाफकीन आणि इतर काही संस्थांमधून या वर्षाअखेर लस पुरवठा सुरू होईल- वी के पॉल, @NITIAayog

महाराष्ट्रातील आदिवासीबहुल क्षेत्र मेळघाटमध्ये 100 टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले. लसींशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी, जनप्रतिनिधी, डॉक्टर, आशा आणि अंगणवाडी सेवकांनी एकत्र येऊन स्थानिक कोरकू भाषेत लोकांना जागरूक केले.- @MoHFW_INDIA #Unite2FightCorona @InfoDivAmravati

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling