The Mahrattas (मराठी) Profile picture
क्षत्रिय महरट्टा (सूर्य ☀️ चंद्र 🌙 यदु 🤺 नाग 🐍 वंशी मिळून ९६ क्षत्रिय कुळांचा समूह ) इंग्रजी माहिती साठी - @tmahrattas

Dec 19, 2021, 25 tweets

पानिपत मोहिमेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीची समीक्षा (भाग २) ⚔️

आपण पानिपत मोहिमेविषयी प्राथमिक स्त्रोतांचे अहवाल व नुकसानीची आकडेवारी पहिली
ही पानिपतची तिसरी लढाई म्हणजे भारतीय इतिहासातील सर्वात मोठे युद्ध.

(1)

#The_Mahrattas

मराठ्यांचा चौथा हल्ला 🔥

छाजपूरची लढाई, 7 डिसेंबर 1760
मराठी सैन्याने (गारदी , होळकर, शिंदेशाही आणि सरकारी फौज)
अफगाणांना मराठ्यांशी लढण्याचे आमंत्रण म्हणून छाजपूर गावाजवळील जंगल जाळले आणि तेथे युद्धस्तंभ उभारला (रण खंबा).

(2)

अफगाण नेहमी सरळ लढाई करण्यास घाबरून होते .
त्यांना मराठ्यांनी युद्धात निर्णायकपणे लढण्यासाठी आमंत्रित केले होते.
दुर्रानी-रोहिल्ला यांच्या जिहादी फौजांपैकी फक्त शुजा आणि रोहिल्ला 7 डिसेंबर 1760 रोजी छाजपूर येथे मराठ्यांच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी आले होते.

(3)

दुर्मिळ चित्र:
शत्रू नवाब शुजा-उद-दौला , 1760
(पानिपत मोहिमेदरम्यान तो आणि त्याची माणसे दिसली)
म्हणून मराठ्यांनी अर्धा कोस (0.9 मैल) पुढे सरकून आपला मोर्चा सांभाळत अफगाणांना आवाहन दिले.
शुजा-उदौलाच्या सैनिकांनी होळकरांच्या सैन्यावर छोटे वार केले व ते पळून जाऊ लागले.

(4)

मल्हारराव जमिनीवर बसले आणि ओरडले जाऊद्यात त्यांना पळून आणि अफगाणांच्या हातूनच त्यांचा नाश होऊद्या.
होळकरांच्या सैन्याने शुजाच्या सैन्यावर हल्ला करून,त्याला पराभूत केले व मल्हारराव यांचे आरेदशानुसार सैन्य मागे वळले.
यावेळी नजीबने शुजाला सैन्य पुरवून बळकट करण्याचा प्रयत्न केला.
(5)

नजीब आणि शुजाहच्या एकत्रित सैन्याने महरट्टा हुजुरतीवर मूर्खपणे हल्ला केला, ज्याला गारदी च्या "Gunnery Troopers" संरक्षण दिले होते.
घोडदळ आणि गोळीबाराच्या मध्ये मराठ्यांच्या हुजुराती आणि गारदी च्या सैन्याने अफगाणांना गुंतवून ठेवले.
सरदार बळवंतरावांनी अगोदर अफगाणांवरील
(6)

हल्ल्यांमधील आपल्या निष्क्रियतेचा बदला घेतला, रोहिल्लाच्या निशाण्याने गोळ्या झाडल्या त्यामध्ये ते जखमी झाले.
रोहिल्लांनी त्यांच्या शरीराचा शिरच्छेद करण्यास सुरुवात केली त्याच वेळी सरदार खंडेराव निंबाळकरांनी मुसद्दीपणाने त्यांना गुंतवून ठेवून मेहंदळे यांचे धड परत आणले.

(7)

मराठ्यांनी सरदार मेहेंदळे यांचे पार्थिव त्यांच्या छावणीकडे नेण्यास सुरुवात केली त्यावेळी रोहिल्लांनी त्यांचा पाठलाग केला सुरु केला. हे पाहून एका योध्याप्रमाणे महाराजा जंकोजीराव शिंदे
यांनी मराठा घोडदळाच्या मदतीने सर्व पाठलाग करणाऱ्या सैन्याची कत्तल केली व अडथळा दूर केला.

(8)

या वेळी अब्दालीचे लोक युद्धात सामील झाले नाहीत व अफगाणांचा पराभव झाला.
एकट्या गारदी च्या सैन्याने 1500 रोहिल्लांना ठार केले,तर मराठा हुजूरत-होळकर-शिंदशाहीच्या तुकड्यांनी सुमारे 3500 शत्रूला ठार केले.
सरदार बळवंतराव मेहेंदळेंचा मृत्यू वगळता मराठ्यांनी हा मोठा विजय मिळवला होता.
(9)

नुकसानीचा पडताळा

छजपूरची लढाई-

अफगाणांचे नुकसान: 5,000 हून अधिक अफगाणी ठार.
नजीब-उद-दौलाचा काका खलील-उल-रहमान ठार.

मराठ्यांचे नुकसान: फक्त 150 मारले गेले.
रोहिल्लांना पराभूत करण्याच्या अंतिम प्रयत्नात सरदार बळवंतराव मेहेंदळे यांना गोळी लागल्यामुळे वीरगती प्राप्त झाली.

(10)

मराठ्यांचा 5वा हल्ला

पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761

अब्दालीचे सैन्य वारंवार मराठ्यांशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, नजीब आणि काझी कादरीस यांच्या विनंती नुसार शेवटी अब्दालीने मराठ्यांच्या दहशतीवर मात करण्यासाठी आणि जिहादसाठी एकत्र लढण्याची खात्री दिली.
(11)

अब्दालीला जिहाद साठी लढण्यास भाग पाडणारे शब्द:
"जर तुम्ही, तुमच्या कडे शक्तीच्या असूनही हार मानली तर (अल्ला) तुमच्याकडून स्पष्टीकरण मागेल ,शत्रूला (मराठ्यांना) घाबरू नका,निधीच्या कमतरतेला घाबरू नका, फक्त अल्लाची भीती बाळगा."
-अब्दालीचा काझी काद्रीस (सरगुजाश्त-ओ-नजीबुद्दौलाह)
(12)

अखेर मराठ्यांचा संयम संपला आणि त्यांनी पानिपतच्या युद्धभूमीवर त्यांची रंणनीती आखण्यास सुरुवात केली.

मराठ्यांनी अब्दालीच्या छावणीवर बॉम्बफेक करण्याच्या काही काही क्षण आधी अफगाण शांतिदूत येत होता तो पुन्हा वापस गेला.

(13)

पानिपत लढाईची सैन्यरचना प्रसिद्ध आहे. त्याचे अचूक चित्र तयार करण्यासाठी अनेक स्त्रोतांचा अभ्यास आवश्यक आहे.

पश्तुन इतिहास संदर्भ "सरगुजास्त-ओ-नजीबुद्दौलाह" आणि "गुलिस्तान-ए-रहमत" या दोन्ही प्राथमिक संदर्भानी अफगाण विजयाचे श्रेय शहा पसंद खानच्या सैन्यरचनेला दिले.

(14)

शाह पासंद खानच्या सैनिकांची हल्ले हे मराठा अंतिम रेषांच्या मागिल बाजूस झाल्याने बरेच मराठा सैन्य मागच्या बाजूला सरकले गेले आणि मराठ्यांचे केंद्रस्थान उघड झाले.अब्दालीच्या हत्यारबंद 1500झांबुरकाच्या हल्ल्यामुळे अफगाणांचा विजयाला अंतिम रूप दिले गेले.
(सरगुझहस्त-ओ-नजीबुद्दौला)
(15)

अफगाण सैन्याचा क्षमता --
अहमद शाह दुर्रानीची शाही सेना-
1200 घोडेस्वारांचे 24 दस्त (28,800); 2,000 Zamburaks प्रत्येकी 2 Musketeers ( प्रत्येकी 4,000 गनर्स) असलेले, 40 तोफांचा तोफखाना, अगणित सैनिक.
शुजाह-उद-दौला -
2,000 घोडदळ, 2,000 पायदळ, 20 तोफांचा तोफखाना.

(16)

नजीब-उद-दौला,
6,000 घोडदळ; 20,000 पायदळ; बेहिशेबी रॉकेट्स.
डंडी खान आणि हाफीज रहमत खान,
15,000 पायदळ; 4,000 घोडदळ; बेहिशेबी तोफ तोफखाना
अहमद खान बंगला,
1,000 घोडदळ; 1,000 पायदळ
(प्रत्यक्ष जिहादी हे एकूण संख्येच्या 4 पट होते)

(17)

सर्वात विश्वसनीय स्त्रोत काशीराय पंडित अफगाण सैन्याच्या आकाराबद्दल खालील अहवाल देतात:
32800+4000+26000+19000+2000= दुर्रानी-रोहिल्ला सैन्याचा आकार 83,800.
पण इतिहासकार महत्वाची माहिती गृहीत धरायला अपयशी ठरतात,ते म्हणजे अनियमित जिहादी(बाकीचे सैन्य) हे या संख्येच्या 4 पट होते!
(18)

अंतिम आकडा मिळवण्यासाठी 4 वेळा केलेला गुणाकार येतो (83,800*4) =3,35,200 (इतके यातिम आणि तबानी जिहादी)
इतके ताबानियन आणि यतीम जिहादी आपण दुर्रानी च्या सैन्यात मिळवले कि अंतिम संख्या :
83,800 + 3,35,200 = 4,18,000 अफगाणी! सैन्य होते.

(19)

हि संपूर्ण 300000 पेक्षा जास्त असलेली दुर्रानी, रोहिल्ला, अवधि, मुघल, ताबानी आणि यतीम यांचे सैन्य.व त्यांचे नेतृत्व करणारे हे 8000 पश्तुन.
या सर्व सैन्याने अखेर च्या दिवशी 1200मराठे शिल्लक असलेल्या मराठा सैन्यावर हल्ला केला आणि लढाई संपवली.
संदर्भ(सरगुजास्त-ओ-नजीबुद्दौला)
(20)

कोणताच अफगाण संदर्भ मराठ्यांच्या नुकसानीचा आकडा देत नाही. एकमेव अपवाद अफगाण संदर्भ "गुलिस्तान-ए-रहमत" स्पष्टपणे सांगते की मराठ्यांचे झालेले नुकसान हे फक्त 25000 इतके होते.
काही इतिहासकार पुराव्याशिवाय 3000 लोक अजून जोडतात. ज्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांचा समावेश केला जातो.

(21)

अंतिम नुकसानीची समीक्षा -
मराठ्यांचे नुकसान - 25,000
यामधील बहुसंख्य मराठ्यांची हत्या कुतुबशाह च्या मुलाने (4000) आणि अहमदखान लंगडा (5000) यांनी केली
संदर्भ - लिस्तान-ए-रहमत

(22)

अफगाण स्त्रोत त्यांची वास्तविक संख्या लपवण्यासाठी स्वतःच्या नुकसानीवर मौन बाळगतात.
मराठा इतिहास अभ्यासकांनी एकमताने लिहलेल्या माहितीनुसार अब्दालीचे 50 सरदार(अताई खान दुर्रानीसह) आणि 22000 पेक्षा जास्त सैन्य मारले गेले.
अफगाण नुकसान: 22000पेक्षा जास्त.
स्त्रोत:होळकरांची थैली
(23)

4 आणि 5 व्या हल्ल्यांमध्ये मागील संख्या जोडणे.
अफगाण हानी
28,200+5,000+22,000 = 55,200+
मराठा हानी
2,539+150+25,000+9000 = 36,689
जर आपण हत्याकांडाला वगळले तर ते 27,689 होतील.
अफगानांची प्राणहानी स्पष्टपणे दुप्पट आहेत!

(24)

संदर्भ सूची -
• भाऊसहेबंची बखर
• पानिपताची बखर
• भाऊसहेबांची कैफियत
• सरगुझाष्ट-ओ-नजीबुद्दौलाह
• गुलिस्तान-ए-रहमत
• काशीराज पंडित यांच्या आठवणी
• नाना फडणवीस पानिपत रणसंग्राम
• पेशवे दफ्तार रेकॉर्ड

(25)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling