Devashish Kulkarni (Modi Ka Parivar) Profile picture
| Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Jan 13, 2022, 13 tweets

#Thread : पानिपत - भाग १ः युद्धाची तयारी.

मराठा फौजेचे सेनापती, करवीरकर छत्रपतींचे पेशवा आणि नानासाहेब पेशव्यांचे दिवाण - अशा तिन जबाबदाऱ्या निभावणाऱ्या सदाशिवराव भाऊंना मल्हारबा व इतर थोर सरदार म्हणाले -

“आम्ही काही जिवाचा तमा धरीत नाही. हा जीव तुम्हावरून सदका आहे…

१/१३

…महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”

असे पुरुषार्थाचे बोल बोलून सर्व सरदार घोड्यावर स्वार होऊन निघाले.

२ उंच व शक्तिशाली हत्ती - रणरंगधीर व गजराज यांना ऐरावतासारखे तयार करण्यात आले.

२/१३

रणरंगधीरावर स्वतः भाऊसाहेब विराजमान होते तर गजराजावर विश्वासराव.

भीमगर्जनेसारखा तिसरा नगारा होताच हे दोन हत्ती पुढे निघाले.

मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार, समशेर बहादूर, अंताजी माणकेश्वर, सोनजी भापकर, अटोळे, पाटणकर, बांडे, घाटगे, निंबाळकर, जनकोजी शिंदे…

३/१३

…या सर्वांनी भाऊसाहेबांना मुजरा केला. सर्वांचे मुजरे घेऊन सदाशिवरावभाऊ सेनेसहित उभे राहिले.

भाऊंनी फौजेवर नजर फिरवली तेव्हा मराठ्यांची फौज पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात दिसणाऱ्या सिंधु महासागरासारखी दिसत होती.

४/१३

स्वतःच्या जीवाची परवा न करणारी, मायभूमिच्या रक्षणार्थ उभी असलेल्या वीर मराठ्यांची ती फौज होती.

अफगाणी शत्रूंसमोर डोंगरा सारखे उभे असलेल्या भाऊसाहेबांनी सैन्याकडे बघून गर्जना केली - “आपल्यासारख्या नरकेसरींसमोर हा जंबुक (कोल्हा) दुरानी काय आहे?”

५/१३

मग भाऊसाहेबांनी मल्हारराव होळकर आणि दमाजी गायकवाडांकडे बघितले आणि विचारले, “सेनेची रचना कोणत्या पद्धतीने करावी? शत्रूला कुठल्या प्रकारे घेरावे? मल्हारबा, तुम्ही नेहमी यशस्वीरित्या सैन्याची रचना करुन विजयश्री मिळवली आहे. तुम्हीच सैन्याची व तोफखान्याची रचना करा.”

६/१३

मल्हाररावांनी सैन्याच्या तीन टोळ्या केल्या.

डावीकडे यशवंतराव पवार, सोनाजी भापकर, संताजी अटोळे, जंगी समशेर, जिवाजी पवार, गोविंदराव निंबाळकर, दत्ताजी वाघ, शंकराजी घाटगे, फिरंगोजी पवार, माधवराव चिमणाजी, मानोजी मोहिते, धिराजी पवार, यमाजी बांदे, मानसिंहराव खुळे, आदि…

७/१३

…सरदार मायभूमिच्या रक्षणार्थ सज्ज होते. इब्राहिम खान गार्दी चा तोफखाना व पायदळ पण सज्ज होता.

गजराजावर अंबारीत बसून विश्वासराव हातात धनुष्य घेऊन शत्रूवर अर्जुनाच्या अभिमन्युसारखे बाण चालवत होते.

८/१३

मध्यभागी स्वतः सदाशिवराव भाऊ हातात तलवार, बिचवे व वाघनखे घेऊन महाभारती अर्जुनासारखे शत्रू ला कापायला उभे होते.

पानिपतचा बखरकार (समकालीन) करवीरकर रघुनाथ यादव लिहीतो - ‘…भाऊचे उपमेस दुसरी उपमाच नाही. यैसा सामर्थवाण मणुश रुपे अवतारच. संपूर्ण क्षेत्रियातील भार्गवराम…

९/१३

…जनमुख नामा प्रतापवीर. श्रीकृपे सपूर्ण धराभुवनी शत्रु समुदायात व ५६ पातशाईत दारे दंड प्राये प्रतापे कीर्ती भास्कर सदासिवपंत...’

‘सदासिवपंती वीरश्रीचीच सीमा केली. कुरुक्षेत्री रण भूमिकेस जाऊन उभे ठाकले’.

भाऊसाहेबांसोबत मातबर सरदार दमाजी गायकवाड, समशेर बहादूर,…

१०/१३

…बाबूराव व खंडेराव गायकवाड, धनाजी पवार, नरसिंगराव इंगळे, धनाजी वाघमोडे, लिंगोजी नारायण व येसाजी खरात होते.

उजवीकडे जनकोजी शिंदे, बुबाजी पवार, धर्माजी काटेकर, अंताजी माणकेश्वर, नारायणराव निंबाळकर, हैबतराव जाधव माधवसिंह, गोविंद बल्लाळ, हणमंतराव मोहिते, बिबाजी पासलकर,…

११/१३

…देवाजी व कुंवरजी शिर्के, संभाजी मोरे, आदि सरदार अडून होते.

सर्व स्त्रियां मल्हारराव होळकर यांच्या संरक्षणाखाली होत्या.

अशा प्रकारे लाखापेक्षा जास्तं मराठ्यांचे सैन्य मायभूमिला वाचवण्याकरिता सज्ज होते.

मराठ्यांचे सैन्य बघून अब्दाली, नजीब-उद-दौलाह आणि शुजा-उद-दौलाह…

१२/१३

…अफगाणी सैन्याचे मनोबल जपण्याचा प्रयत्न करत होते.

डावीकडे नजीब, मध्यभागी स्वतः अब्दाली व उजवीकडे शुजा-उद-दौलाह चे सैन्य अशी शत्रूपक्षाच्या सैन्याची रचना होती.

मराठे व अफगाण, दोघे युद्धासाठी सज्ज झालेले!

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

१३/१३

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling