फडणवीस आता टीपूला व्हिलन ठरवत आहेत. तिकडे राष्ट्रपती कोविंद तर म्हणून बसलेत की टिपूला ब्रिटीशांशी वीरमरण आलं, तो रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रणेता होता. हे राष्ट्रपती महोदय २०१७साली कर्नाटकच्या विधानसभेसमोर भाषणात म्हणालेत, तेही राष्ट्रपती असतानाच!
हे एवढंच नव्हे तर भाजपच्या कर्नाटक
सरकारने टिपू हा कसा बदल घडवणारा योद्धा होता असं पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे प्रकाशित करून झालं आहे. ते करताना टीपू कसा भारी होता ते सांगणारी पत्रे भाजपचे मुख्यमंत्यांनी लिहून दिली आहेत. भाजपचे नेते कर्नाटकात टीपू जयंती साजरी करताना टीपूसारख्या पगड्या
बांधून फोटो सुद्धा काढायचे!
त्यामुळे हे टीपू सुलतान प्रकरण म्हणजे भाजपच्या सुविख्यात "गुजरातमध्ये माता, गोव्यात कापून खाता" धोरणाचा अजून एक नमुना आहे!! यांनी शाखेत गोडसेचे गोडवे गायचे आणि यांच्या परदेशात गांधींचे गुणगान करायचे असल्या ढोंगीपणाचीच हे टीपू प्रकरण
म्हणजे अजून एक आवृत्ती आहे!
त्यामुळे फडणवीसांनी आधी भाजपमध्ये टीपूबद्दल प्रबोधन करावं, वाटल्यास शाखेत जाऊन तीन-चार बौद्धिकेही करावीत,आणि काऊ ते नीट ठरवून घ्यावं की टीपू हिरो होता की व्हिलन! म्हणजे त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची अशी सपशेल फजिती तरी होणार नाही!!
#TipuSultan
१. फडणवीसांचे विधान
२. राष्ट्रपती महोदयांचे गौरवोद्गार
३. टीपूवरील पुस्तक
४. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र
google.com/amp/s/www.then…
५. टीपूप्रेमी भाजपचे नेते
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.