फडणवीस आता टीपूला व्हिलन ठरवत आहेत. तिकडे राष्ट्रपती कोविंद तर म्हणून बसलेत की टिपूला ब्रिटीशांशी वीरमरण आलं, तो रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रणेता होता. हे राष्ट्रपती महोदय २०१७साली कर्नाटकच्या विधानसभेसमोर भाषणात म्हणालेत, तेही राष्ट्रपती असतानाच!
हे एवढंच नव्हे तर भाजपच्या कर्नाटक
सरकारने टिपू हा कसा बदल घडवणारा योद्धा होता असं पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे प्रकाशित करून झालं आहे. ते करताना टीपू कसा भारी होता ते सांगणारी पत्रे भाजपचे मुख्यमंत्यांनी लिहून दिली आहेत. भाजपचे नेते कर्नाटकात टीपू जयंती साजरी करताना टीपूसारख्या पगड्या
बांधून फोटो सुद्धा काढायचे!
त्यामुळे हे टीपू सुलतान प्रकरण म्हणजे भाजपच्या सुविख्यात "गुजरातमध्ये माता, गोव्यात कापून खाता" धोरणाचा अजून एक नमुना आहे!! यांनी शाखेत गोडसेचे गोडवे गायचे आणि यांच्या परदेशात गांधींचे गुणगान करायचे असल्या ढोंगीपणाचीच हे टीपू प्रकरण
म्हणजे अजून एक आवृत्ती आहे!
त्यामुळे फडणवीसांनी आधी भाजपमध्ये टीपूबद्दल प्रबोधन करावं, वाटल्यास शाखेत जाऊन तीन-चार बौद्धिकेही करावीत,आणि काऊ ते नीट ठरवून घ्यावं की टीपू हिरो होता की व्हिलन! म्हणजे त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची अशी सपशेल फजिती तरी होणार नाही!!
समृध्दी महामार्गावर कालच्या भीषण अपघातानंतर प्रश्न उपस्थित होत असताना "ही तर लोकांचीच चूक, त्यांना गाड्या चालवायची अक्कल नाही, सरकार काय करणार!" अशी तळी उचलायला येणारे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात. पहिली गोष्ट सरकारने स्वतः, (1/6)
अगदी केंद्रीय मंत्री ते मुख्यमंत्री यांनी हा रस्ता कसा जलदगती आहे याच्या प्रचारकी थाटात घोषणा केल्या होत्या. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी "टेस्ट ड्राईव्ह" करून बघितल्याच्या बातम्याही आल्या होत्या, (2/6)
ज्यात उपमुख्यमंत्री साहेबांनी कशी दीडशेच्या स्पीडने गाडी हाकली याचा गवगवा होता!
आता अशी जाहिरातबाजी करून झाल्यावर, त्या रस्त्यावर जलदगतीने वाहने जातात याचा सगळा दोष लोकांवर कसा आणि का म्हणून ढकलायचा बरं? (3/6)
फक्त उद्घाटन त्यांच्या हस्ते? याला काय अर्थ आहे! हा माणूस दिवसाचे अठरा अठरा तास आपल्यासाठी राबतो, देशोदेशी फिरून आपल्या देशाचं नांव उंचावतो, एक्सट्रा 2AB सारखे मूलभूत सिद्धांत देऊन आपलं जगणं समृद्ध करतो त्याच्या हस्ते फक्त उद्घाटन? हे बरोबर नाही, (1/4)
या एकमेवाद्वितीय नेत्यासाठी नवीन इमारतीत सर्वात उंच स्थानी एक डोळे दिपवणारं सिंहासन तयार करावं, नवीन इमारतीत जमणाऱ्या लोकांना रोज एक तास 'मन की बात'चे जुने एपिसोड सक्तीने ऐकवण्यात यावेत, (2/4)
जेव्हा हा दिव्य अवतारी पुरुष सभगृहात येईल तेव्हा अवघ्या वास्तुमध्ये त्याचा जयजयकार गुंजेल असे किमान ब्याएंशी डेसिबलचे डॉल्बी स्पीकर्स वास्तुच्या प्रत्येक कोपऱ्यात लावावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नवीन इमारतीच्या समोर या महापुरुषाचा एक भव्यदिव्य पुतळा उभारावा (3/4)
नुकताच सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा आधार-जीएसटी घोटाळा उघडकीस आला असून त्यातील पाच हजार कोटी म्हणजे पंचवीस टक्के गैरव्यवहार हे एकट्या गुजरातमध्ये पकडले गेले आहेत. (1/11)
यामध्ये व्यवहाराशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांची आधार कार्डे वापरून जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यात आले आणि त्याद्वारे खोटी बिले तयार करून गैरव्यवहार सुरू होते. यामध्ये गरीब माणसांना एक हजार रुपये देऊन त्यांची आधार कार्ड घेतली जातात, (2/11)
त्यांना सरकारी योजना असल्याचे खोटे सांगितले जाते, त्यांच्या आधारला लिंक केलेला मोबाईल नंबर बदलण्यात येतो आणि मग त्याद्वारे खोटे पॅन कार्ड आणि खोटे जीएसटी रजिस्ट्रेशन बनवण्यात येते. मग याचा वापर शेल कंपन्या तयार करून खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट दाखवण्यासाठी केला जातो. (3/11)
आपले माननीय पंतप्रधान पूर्ण वेळ प्रचारक म्हणून सगळ्या राज्यात प्रचाराला जातात. अमर्याद पैसा, सरकारी यंत्रणा आणि आयटी सेल हे सगळे कामाला लावले जातात. तरी आज कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आकडे भाजपला स्पष्टपणे मात देणारे आहेत...
(1/n)
दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप काही यश मिळवू शकली नाही. कर्नाटक आता हातातून जात आहे. आंध्र-तेलंगणा भाजपच्या हातात नाही. महाराष्ट्रात राज्यपालांच्या मार्फत कुरापती करून, दुसऱ्यांचे नेते फोडून सरकार बनवायची वेळ आली. पंजाब-दिल्लीमध्ये आपने क्लीन स्वीप दिलेला आहे.
(2/n)
राजस्थानमध्ये असंख्य उचापती करूनही काँग्रेसचं सरकार स्थिर आहे. बिहारमध्ये नितीश यांना सोडून तेजस्वी यादवांना घेऊन सत्तेत बसले आहेत. छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. बंगालमध्ये दीदी ओ दीदी सारखे थिल्लर प्रकार करूनही ममता त्या सगळ्याला पुरून उरल्या!
धर्माधिकारी भोंदू असतील नसतील, त्यांनी कधीचा मुहूर्त सांगितला असेल नसेल हा गौण मुद्दा आहे. जनतेने सरकारला निवडून दिलं आहे, धर्माधिकारी यांना नाही. पुस्तकार सोहळा सरकारचा होता. भारताचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची जबाबदारी होती की आपल्यासमोर तळपत्या उन्हात
(1/n)
बसलेल्या लोकांची व्यवस्था करावी. किमान माणुसकी म्हणून तरी लोकांना इतक्या कडक उन्हात बसावं लागणार नाही याची सोय करणे ही सरकारची जबाबदारी होती.
धर्माधिकारी सायंटिस्ट असते, कुठल्याही जातीधर्माचे असते, त्यांनी काहीही करू केलेलं असतं तरी सरकारी हलगर्जीपणा,
(2/n)
सामान्य माणसाचा जीव तुच्छ लेखण्याची वृत्ती क्षम्य ठरली नसती. कारण पुरस्कार सरकारचा होता, कार्यक्रम सरकारने आयोजित केलेला होता, भारताचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला स्वतः हजर होते, त्यांच्या नांवाने कार्यक्रमाची जाहिरात केली गेली होती.
पक्षाचे अधिकृत मुखपत्र आणि एखादे सामान्य व्यावसायिक वृत्तपत्र यात फरक करायचा की नाही?सरकारी जाहिराती नाकारणे नियमात न बसल्याने सरकारने जाहिराती बंद केल्या तर मुखपत्राला आर्थिक फटका बसेल हे बरोबर आहे. पण मुखपत्र फक्त आर्थिक गणितावर चालवायचे असेल तर त्याला मुखपत्र का म्हणावे?
(1/n)
मुखपत्राचे संपादक महाशय ज्या सत्ताधारी लोकांना चोर म्हणतात, जे सरकारच असंविधानिक आहे वगैरे जप ते सातत्याने करत असतात, ज्या सरकारचा जन्म ज्या पक्षाचे मुखपत्र आहे त्या पक्षाशी गद्दारी करून झाला असा आरोप सातत्याने संपादक साहेबांकडून होत असतो; अशावेळी मुखपत्राच्या मुखपृष्ठावर
(2/n)
त्याच सत्ताधारी नेत्यांची प्रचारकी जाहिरात छापणे हे नक्की काय म्हणून क्षम्य मानावे?
नुसता राजकीय विरोध असणे आणि राजकीय वैर असणे यात फरक आहे. ज्या नेत्यांना तुम्ही उघड वैरी मानता, गद्दार मानता, चोर म्हणता, शिव्याशाप देता, त्यांना राजकारणातून संपवून टाकायची भाषा करता,