PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 17, 2022, 21 tweets

केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांच्या आभासी उपस्थितीत बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सी सेवेचा ध्वजांकन कार्यक्रम

⏲️ आज दुपारी 12 वाजता

बेलापूर इथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील

थेट पहा 🎥

ही जलमार्ग टॅक्सी सेवा, नेरुळ, बेलापूर, एलिफंटा बेटे आणि @JNPort इत्यादी ठिकाणांना जोडणार आहे

#WaterTaxi मुळे पहिल्यांदाच मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे जलद आणि विश्वासार्ह अशा वाहतूक सेवेने जोडली जाणार आहेत

थेट पहा
🎥

बेलापूर जेट्टी प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2019मध्ये झाली आणि सप्टेंबर 2021पर्यंत प्रकल्प पूर्ण झाला

#Sagarmala कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी ₹ 8.37 कोटी खर्च करण्यात आले

यात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा समान वाटा आहे

आज बेलापूर जेट्टीचे उदघाटन होत आहे

.@mahamaritime1 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित सैनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बेलापूर जेट्टी आणि जलमार्ग टॅक्सी सेवेच्या उदघाटन समारंभात स्वागत केलं

केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आभासी माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित

आज आपल्या सर्वांसाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठबळामुळे आपण बेलापूर जेट्टी ची उभारणी पूर्ण करू शकलो याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानत आहे

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

आपल्या अर्थव्यवस्थेचा जलद विकास करण्यासाठी देशाच्या जनतेला सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी @shipmin_india किनारपट्टी लगतची राज्ये, बंदरे आणि #Sagarmala योजनेशी संलग्न मंत्रालये यांच्या मदतीने विविध प्रकल्प राबवत आहेत

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

#Sagarmala च्या माध्यमातून नवी मुंबईला बेलापूर येथे अत्याधुनिक जेट्टी मिळत आहे; केंद्र सरकार आणि राज्य यांच्या 50:50 वाटा असलेल्या 8.37 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची @mahamaritime1 ने यशस्वी अंमलबजावणी केली आहे

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@SDCL_India

#COVID19 महामारीमुळे निर्बंध लागू असतांनाही, हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@ddsahyadrinews
@airnews_pune

बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनलदरम्यानच्या वॉटर टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानचा साधारण दीड तासांचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासापर्यंत कमी झाला आहे; या सेवेमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

#Mumbai हार्बर पासून आणखी अनेक जेट्टी सेवा सुरु करण्याची योजना आहे, यात काटामरान आणि रो-पॅक्स अशा दोन्ही सेवा असतील; सध्याच्या मुंबई-अलिबाग रो पॅक्स सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

जलमार्ग टॅक्सी आणि रो-पॅक्स फेरी बोटीसाठी, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, गरजेनुसार अतिरिक्त जेट्टी सुरु केल्या जातील

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@shipmin_india @PIB_ShipMin

#Sagarmala योजनेअंतर्गत सुरु असलेले अनेक प्रकल्प, ज्यात प्रवासी जेट्टी, किनारी पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, रो-रो सेवा आणि इतर अनेक सेवा #Maharashtra मध्ये सुरु करण्यात आल्या आहेत.

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@SDCL_India

केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणाच्या माध्यमातून 1.05 लाख कोटी रुपयांचे 131 प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केले जाणार आहेत

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

या 131 प्रकल्पांपैकी, 2,078 कोटी रुपये किमतीच्या 46 प्रकल्पांना केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वित्तीय सहकार्य केलं जाईल

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

#Maharashtra च्या सागरी किनाऱ्यांमध्ये, नागरी जलमार्ग वाहतूक सेवेसाठी प्रचंड वाव असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@ddsahyadrinews @airnews_pune
@shipmin_india @CMOMaharashtra

बंदर समूहाअंतर्गत, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी, मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी 32 पेक्षा अधिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत

4 मच्छिमार बंदर प्रकल्पांनाही #Sagarmala अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@MahaDGIPR

#PMGatiShakti राष्ट्रीय बृहद आराखड्याअंतर्गत, देशाचा अतिशय जलद गतीने होईल

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

@shipmin_india @GatiShakti @SDCL_India @MahaDGIPR

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी माध्यमातून बेलापूर जेट्टीचे उद्घाटन केले

केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal आभासी माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते, तर महाराष्ट्र सरकारचे मंत्री तसेच केंद्र आणि राज्याचे अधिकारी बेलापूर इथे उपस्थित होते

देशात पहिल्यांदाच जलमार्ग टॅक्सी सेवेचा शुभारंभ केला जात आहे

वाहतूक हा देशाच्या विकासातील महत्वाचा घटक आहे. सध्या असलेली वाहतुकीची साधने, उड्डाणपूल, मेट्रो, रेल्वे अशा मुंबईच्या सेवांमध्ये आता जलमार्ग वाहतुकीचीही भर पडली आहे

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

@OfficeofUT

केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभासी उपस्थितीत आज, बेलापूर जेट्टीमधून जलमार्ग टॅक्सी रवाना करण्यात आल्या

🎥

बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडणारा पहिला जलमार्ग नागरिकांसाठी उपलब्ध

- केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal

📙pib.gov.in/PressReleasePa…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling