Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

Apr 10, 2022, 5 tweets

#थोडक्यात_पण_महत्त्वाचे

पेट्रोलच्या किंमती ,देशनिर्माण आणि माझी गरिबी

क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..!

आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू

Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य)

पुरवल्यानंतर आपल्याकडे उरतात.

जिथे गरीब माणसाची सर्व कमाई ही मूलभूत गरजा पुरवण्यात जाते तिथे श्रीमंत/मध्यम त्याच्या कमाईचा छोटा हिस्सा अशा मूलभूत गोष्टींवर खर्च करतो.

म्हणून पेट्रोलच्या किमती पर्यायाने महागाई वाढल्याने जेव्हा मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाच्या राहणीमानात फारसा

येत नाही तेव्हा भारतातील संख्येने फार मोठा कष्टकरी वर्ग जो दारिद्र्य रेषेच्या जवळपास आहे तो कर्ज बाजारीपणाकडे व आत्यंतिक गरिबीकडे झुकतो. खरे सांगायचे तर..भारतातील ~ ९५% लोक हे LIG म्हणजे Low Income Group किंवा त्याहून कमी उत्पन्न असणारे आहेत..म्हणजेच भारतातील ९५% लोकांना

ह्या ना त्या मार्गाने वाढलेल्या पेट्रोलच्या किंमती गरिबीकडे ढकलत आहेत..! अशा परिस्थितीत ९५% जनता जर गरिबीत लोटली जात असेल तर अशा
' देशनिर्माणा 'साठीच्या जास्तीच्या करांचा आणि वाढलेल्या महागाईचा उपयोग तो काय ? ? ?

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling