Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

Jun 18, 2022, 9 tweets

👇ह्याचे उत्तर किचकट आहे..आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्याला ते विज्ञान..विज्ञान वाटतच नाही..इतके ते अजब आहे..तरी एक प्रयत्न करतो..

आपण पाहिले की आइन्स्टाईनने प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वळतो हे सिद्ध केले..पण प्रकाश तसे का वळतो ह्याच्या कारणासाठी त्याने सांगितले की गुरुत्वाकर्षण #म १/९

हे मुळात बल अर्थात force नाहीये..!

आणि आपण ज्याला विश्वाची पोकळी म्हणतो ती निव्वळ पोकळी नसून ती एक त्रिमितीय रचना आहे..!

त्या रचनेची कल्पना नीट यावी म्हणून त्याला fabric of universe (उदा 👇निळा कपडा) असे म्हणतात..म्हणजे काय तर - २/n

अशी कल्पना करा की हे विश्व म्हणजे एक मोठा हवेत तरंगणारा तागा/कपडा आहे..आणि हे आपला सूर्य हा त्या ताग्यावर ठेवलेला एक वजनी गोळा आहे-

आता त्या गोळ्याचे वजन जेवढे जास्त तेवढा तो त्या कपड्याला खाली ढकलतो..तेच सर्व ग्रहांचे पण..ते त्यांच्या त्यांच्या वजनाने त्या कपड्याला खाली ढकलतात

पण सूर्य हा त्यात सर्वात मोठा व वजनी असल्याने सर्व ग्रह हे सूर्याकडे खेचले जात आहेत(गुरुत्वाकर्षण)

फक्त ग्रहांना वेग असल्याने ते एका सरळ रेषेत सूर्याकडे न जाता गोल गोल फिरत सूर्याकडे खेचले जात आहेत..!!

👇हा व्हिडिओ ते मस्त समजावतो
(१३ कोटी views 🤯😀)

आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जसे सर्व ग्रह सूर्य भोवती फिरतात तसाच आपला सूर्यही (सर्व ग्रहांना घेऊन!!) इतर लाखो ताऱ्यांसारखा आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो..!!

ह्या सर्व फिरण्यामुळे विश्वाच्या ताग्यात जे तरंग निर्माण होतात..त्याला आपण गुरूत्वीय लहरी म्हणतो..❤️

विशेष म्हणजे हा विश्वाचा तागा अन् कपडा ह्या आइन्स्टाईनच्या कल्पना..हो.. निव्वळ कल्पनाच..हास्यास्पद वाटू शकतात..शुद्ध वेडेपणा वाटू शकतो..पण..

नुकत्याच लागलेल्या गुरूत्वीय लहरींच्या शोधाने पुन्हा एकदा आइन्स्टाईनने १०० वर्षापूर्वी केलेल्या त्या वेड्या कल्पनांनाच दुजोरा दिलाय..😍

आता विषय निघालाच आहे तर..सांगतो.. टाईम मशीन..किंवा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त लवकर पोहोचणारे अवकाश यान.. इ इ गोष्टी पुढे जाऊन अस्तिवात आल्या तर त्या गोष्टींचा पाया हा आइन्स्टाईन ने सांगितलेली विश्वाची रचना/सिद्धांत हा असू शकतो..!!

टीप - कधीही न ऐकलेल्या वाचकांना समजायला अवघड विषय सोपा करून सांगायचा प्रयत्न असल्याने काही टेक्निकल गोष्टी मुद्दाम गाळल्या आहेत..🙏 ८/९

@nanachi_tang202
@Chandragupta258

Kindly add / correct if anything..🙏😀

विश्वाचा तागा कुठे संपतो..किंवा त्याच्या खाली काय आहे..किंवा ताऱ्यांच्या वजनाने खाली जाणारा हा तागा कोणाच्या गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या बाजूला जातो..ह्या व अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी लागणाऱ्या वेड्या कल्पना तुमच्याकडे आहेत का ?असतील तर किमान एक नोबेल तुमची वाट बघते आहे
😂🫣 ९/९

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling