Bhushan Eshwar Profile picture
He/Him. I teach Science. I practice Atheism & Scientific temperament. I love Indian Classical Music; Proudly NOT followed by Modi

Jul 30, 2022, 22 tweets

पं वसंतराव देशपांडे

02/05/1920 - 30/07/1983

वसंतराव नावाच्या तेजोनिधीचं शारीरिक अस्तित्व 39 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. मात्र त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा लोहगोल आजही अतिशय प्रखर तळपत आहे. वसंतरावांच्या असण्याला जितक्या छटा होत्या, तितक्या फारच क्वचित इतर कोण्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वांना असाव्यात.
👇

वसंतरावांचा अभिनय बघितला की वाटायचं, यांचा जन्म बालगंधर्वांच्या कुळात झाला असावा; वसंतरावांचं तबलावादन ऐकलं की वाटायचं, हे आणि थिरकवा एकाच शाळेत तबला शिकले असतील; वसंतरावांची गझल ऐकून वाटतं की हे कुठंतरी लखनौला जन्मले असतील आणि तिथं त्यांना आपसूकच गझल गाता यायला लागली असेल
👇

अगदी बेगम अख्तर सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा गझलच्या मुरक्यांबद्दल सल्लामसलत करत तेव्हा वसंतराव हे त्यांचे गुरु वाटत; आणि गाणाऱ्या वसंतरावांकडे बघताना वाटायचं- त्यांच्या पेशींमध्ये एकेक राग इतका भिनलाय की आता त्यांना नको असलं तरी स्वतःवरचं रागांचं गारुड अमान्य करता येणार नाही.
👇

मित्रांनो, अतिशय प्रतिभावान अशा डॉ वसंतरावांच्या अभिनय/तबलावादन/गायकीविषयी बोलण्याची नसलेली पात्रता माहित असूनही मी भारावलेपणाने त्यांच्या काही रागांमध्ये सौंदर्य निर्माण करण्याच्या पद्धतीविषयी आज इथं व्यक्त होतोय.
👇

वसंतरावांचा रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार म्हणजे फारच वेगळा होता. त्यांच्या सिग्नेचर ताना अशक्यप्राय नव्हत्या असं नाही; पण ते सौंदर्य नेमकं कुठं आणि किती वापरायचं याची समज फक्त वसंतरावांकडे होती. आणि अशी सांगीतिक समज उपजत असणं हे त्यांना इतरांपासून वेगळा सौंदर्योपासक बनवतं.
👇

उदाहरणार्थ, आपण हा मालकंस बघा. यात वसंतराव ज्या पद्धतीने सुरुवात करत आहेत, असं वाटावं की मोर आपला पिसारा उलगडत असावा. मालकंस गायनासाठी तसा फार अवघड राग नाही. अनेकजण सहज गातात. पण वसंतरावांच्या सादरीकरणातलं सौंदर्य काही निराळंच.

संपूर्ण
👇


👇

जितका सुंदर मालकंसमधला वरील आलाप आहे, तितकाच सुंदर मधुकंस आहे. मधुकंस हा राग मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाच वसंतरावांचा. मधुकंसच्या काय एकेक छटा रंगवल्या आहेत! आणि इथं सोबतीला आप्पा जळगावकर आहेत म्हटल्यावर तर वसंतरावांचं बहरणं विचारायलाच नको!

संपूर्ण ऐका
👇

राग चंद्रकंस विषयी मी मागे एक थ्रेड लिहिला होता. त्यात मी त्या रागाचं सौंदर्य, व्याकरण याबद्दल थोडं लिहिलं होतं.
इथे 👇तो वाचू शकता.

रंजनी-गायत्री या वरच्या थ्रेडमध्ये एक अभंग सादर करतायत; जो उपशास्त्रीय कर्नाटकी पद्धतीने वेगवान आहे, इथं वसंतराव सादर करतायत तो उत्तरेकडील ख्यालगायकीला बांधलेला विलंबित आहे. हा विलंबित परफॉर्मन्स शीतल आहे, शांत आहे, दाह मिटवणारा आहे. ऐकाच.

संपूर्ण
👇

वसंतरावांचे चंद्र/मधू/मालकंस हे राग जितके वरचा क्लास प्रकारातील, तितकेच उत्तुंग 'कौन्सी कानडा' सारखे जोडराग सुद्धा. इथं पुन्हा ते एक सिग्नेचर तान घेऊन रागाच्या व्याकरणाचं नवं तोरण बांधतात. आणि हे तोरण म्हणजे सौंदर्याने नटलेलं इंद्रधनूच जणू!

संपूर्ण
👇

तोडीचा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे- सालग-वराळी. हा राग फार कमी जणांना माहित आहे; आजकालचे गायकही या प्रकाराला फार सादर करताना आढळून येत नाहीत. फार गुंतागुंतीचा हा राग वसंतरावांनी सवाई गंधर्व मध्ये सादर केला होता. इथंही त्यांच्या सिग्नेचर ताना घेऊन त्यांनी फार मजा आणली आहे!
👇

हा सवाई गंधर्व फेस्टिव्हलमध्ये वसंतरावांनी सादर केलेला सालग-वराळी संपूर्णपणे ऐका इथं.
👇

मारू बिहाग रागाला जे डायमेन्शन वसंतरावांनी दिलेलं आहे, ते अगदी अशक्यप्राय आहे. कोणत्याही रागाबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपण नक्कीच या द्रुतगतीने सादर केलेल्या 'मै पतिया लिख भेजी' या छोट्या ख्यालामध्ये स्पष्ट होतं. या रागाचा विलंबितही कहर आहे!
संपूर्ण ऐका इथं
👇

वसंतरावांनी सर्वात जास्त मास्टरी केलेला राग म्हणजे "मारवा". ते मारवा रागाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांच्यासारखा गगनभेदी मारवा त्यांच्यानंतर झाला नाही, असं पुल सांगत. इथं मारवा सादर करताना काय एकेक मुरक्या ते घेत आहेत!
संपूर्ण ऐका👇

इथं वसंतराव सादर करत आहेत, तेजोनिधी लोहगोल. कट्यार काळजात घुसली या अजरामर संगीत नाटकात हे गीत जेव्हा वसंतराव सादर करत तेव्हा श्रोते भान हरपून त्यांच्या गायकीला दाद देत. वसंतराव स्वतःच एक तेजोनिधी होते. हे गीत ललित पंचम रागातील आहे. वसंतरावांनी अक्षरशः सौंदर्याचा धुमाकूळ घालतात.👇

तेजोनिधी लोहगोल,
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज
कोटी कोटी किरण
तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होउन
अणुरेणु उजळिती
तेजातच जनन मरण,
तेजातच नविन साज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज

संपूर्ण
👇

वसंतरावांचं नाट्यगीतांसंदर्भात असणारं आकलन अगाध होतं. जितक्या सहजतेने ते ख्यालगायकीतील विलंबित उलगडत तितकीच सहजता त्यांच्या नाट्यगीतांमध्ये सुद्धा होती. त्यांच्या नाट्यगीतांचा तर वेगळा थ्रेडच होईल. ती गीते म्हणजे एकेक आकाशगंगाच आहेत.
उदाहरणार्थ- 'रवी मी' हे 👇गीत.

वसंतरावांचा 'रवी मी'चा वरील परफॉर्मन्स त्यांनी त्यांच्या बालपणीच्या गुरूंना, म्हणजे दीनानाथ मंगेशकरांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात सादर केला होता. त्या कार्यक्रमात दीनानाथांचे अनेक पैलू त्यांनी उलगडले होते.

जरूर ऐका/बघा.
👇

वसंतरावांनी दीनानाथांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात जी भैरवी सादर केली आहे, ती सुद्धा नजर लागावी अशी! एकेक तान मोजून-मापून आणि तरीही भैरवीच्या सौंदर्याचा स्वतःचा खूप दीप थॉट त्यात जाणवत राहतो.

#immortal

संपूर्ण ऐका इथं.
👇

प्रिय वसंतराव!
काश. काश, आपण असताना मी जन्मलो असतो आणि आपली भेट झाली असती. काश, मला आपलं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं असतं. काश, मला आपला तबला ऐकता आला असता. काश!!
🥺🥺

Talented Tabla Player, Brilliant Theatre Actor, Brilliantly Gifted Singer Dr Vasantrao Deshpande
🙏

Immortalराव ❤️

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling