वसंतराव नावाच्या तेजोनिधीचं शारीरिक अस्तित्व 39 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. मात्र त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा लोहगोल आजही अतिशय प्रखर तळपत आहे. वसंतरावांच्या असण्याला जितक्या छटा होत्या, तितक्या फारच क्वचित इतर कोण्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वांना असाव्यात.
👇
वसंतरावांचा अभिनय बघितला की वाटायचं, यांचा जन्म बालगंधर्वांच्या कुळात झाला असावा; वसंतरावांचं तबलावादन ऐकलं की वाटायचं, हे आणि थिरकवा एकाच शाळेत तबला शिकले असतील; वसंतरावांची गझल ऐकून वाटतं की हे कुठंतरी लखनौला जन्मले असतील आणि तिथं त्यांना आपसूकच गझल गाता यायला लागली असेल
👇
अगदी बेगम अख्तर सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा गझलच्या मुरक्यांबद्दल सल्लामसलत करत तेव्हा वसंतराव हे त्यांचे गुरु वाटत; आणि गाणाऱ्या वसंतरावांकडे बघताना वाटायचं- त्यांच्या पेशींमध्ये एकेक राग इतका भिनलाय की आता त्यांना नको असलं तरी स्वतःवरचं रागांचं गारुड अमान्य करता येणार नाही.
👇
मित्रांनो, अतिशय प्रतिभावान अशा डॉ वसंतरावांच्या अभिनय/तबलावादन/गायकीविषयी बोलण्याची नसलेली पात्रता माहित असूनही मी भारावलेपणाने त्यांच्या काही रागांमध्ये सौंदर्य निर्माण करण्याच्या पद्धतीविषयी आज इथं व्यक्त होतोय.
👇
वसंतरावांचा रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार म्हणजे फारच वेगळा होता. त्यांच्या सिग्नेचर ताना अशक्यप्राय नव्हत्या असं नाही; पण ते सौंदर्य नेमकं कुठं आणि किती वापरायचं याची समज फक्त वसंतरावांकडे होती. आणि अशी सांगीतिक समज उपजत असणं हे त्यांना इतरांपासून वेगळा सौंदर्योपासक बनवतं.
👇
उदाहरणार्थ, आपण हा मालकंस बघा. यात वसंतराव ज्या पद्धतीने सुरुवात करत आहेत, असं वाटावं की मोर आपला पिसारा उलगडत असावा. मालकंस गायनासाठी तसा फार अवघड राग नाही. अनेकजण सहज गातात. पण वसंतरावांच्या सादरीकरणातलं सौंदर्य काही निराळंच.
संपूर्ण
👇
👇
जितका सुंदर मालकंसमधला वरील आलाप आहे, तितकाच सुंदर मधुकंस आहे. मधुकंस हा राग मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाच वसंतरावांचा. मधुकंसच्या काय एकेक छटा रंगवल्या आहेत! आणि इथं सोबतीला आप्पा जळगावकर आहेत म्हटल्यावर तर वसंतरावांचं बहरणं विचारायलाच नको!
संपूर्ण ऐका
👇
राग चंद्रकंस विषयी मी मागे एक थ्रेड लिहिला होता. त्यात मी त्या रागाचं सौंदर्य, व्याकरण याबद्दल थोडं लिहिलं होतं.
इथे 👇तो वाचू शकता.
रंजनी-गायत्री या वरच्या थ्रेडमध्ये एक अभंग सादर करतायत; जो उपशास्त्रीय कर्नाटकी पद्धतीने वेगवान आहे, इथं वसंतराव सादर करतायत तो उत्तरेकडील ख्यालगायकीला बांधलेला विलंबित आहे. हा विलंबित परफॉर्मन्स शीतल आहे, शांत आहे, दाह मिटवणारा आहे. ऐकाच.
संपूर्ण
👇
वसंतरावांचे चंद्र/मधू/मालकंस हे राग जितके वरचा क्लास प्रकारातील, तितकेच उत्तुंग 'कौन्सी कानडा' सारखे जोडराग सुद्धा. इथं पुन्हा ते एक सिग्नेचर तान घेऊन रागाच्या व्याकरणाचं नवं तोरण बांधतात. आणि हे तोरण म्हणजे सौंदर्याने नटलेलं इंद्रधनूच जणू!
संपूर्ण
👇
तोडीचा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे- सालग-वराळी. हा राग फार कमी जणांना माहित आहे; आजकालचे गायकही या प्रकाराला फार सादर करताना आढळून येत नाहीत. फार गुंतागुंतीचा हा राग वसंतरावांनी सवाई गंधर्व मध्ये सादर केला होता. इथंही त्यांच्या सिग्नेचर ताना घेऊन त्यांनी फार मजा आणली आहे!
👇
हा सवाई गंधर्व फेस्टिव्हलमध्ये वसंतरावांनी सादर केलेला सालग-वराळी संपूर्णपणे ऐका इथं.
👇
मारू बिहाग रागाला जे डायमेन्शन वसंतरावांनी दिलेलं आहे, ते अगदी अशक्यप्राय आहे. कोणत्याही रागाबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपण नक्कीच या द्रुतगतीने सादर केलेल्या 'मै पतिया लिख भेजी' या छोट्या ख्यालामध्ये स्पष्ट होतं. या रागाचा विलंबितही कहर आहे!
संपूर्ण ऐका इथं
👇
वसंतरावांनी सर्वात जास्त मास्टरी केलेला राग म्हणजे "मारवा". ते मारवा रागाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांच्यासारखा गगनभेदी मारवा त्यांच्यानंतर झाला नाही, असं पुल सांगत. इथं मारवा सादर करताना काय एकेक मुरक्या ते घेत आहेत!
संपूर्ण ऐका👇
इथं वसंतराव सादर करत आहेत, तेजोनिधी लोहगोल. कट्यार काळजात घुसली या अजरामर संगीत नाटकात हे गीत जेव्हा वसंतराव सादर करत तेव्हा श्रोते भान हरपून त्यांच्या गायकीला दाद देत. वसंतराव स्वतःच एक तेजोनिधी होते. हे गीत ललित पंचम रागातील आहे. वसंतरावांनी अक्षरशः सौंदर्याचा धुमाकूळ घालतात.👇
तेजोनिधी लोहगोल,
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज
कोटी कोटी किरण
तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होउन
अणुरेणु उजळिती
तेजातच जनन मरण,
तेजातच नविन साज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज
संपूर्ण
👇
वसंतरावांचं नाट्यगीतांसंदर्भात असणारं आकलन अगाध होतं. जितक्या सहजतेने ते ख्यालगायकीतील विलंबित उलगडत तितकीच सहजता त्यांच्या नाट्यगीतांमध्ये सुद्धा होती. त्यांच्या नाट्यगीतांचा तर वेगळा थ्रेडच होईल. ती गीते म्हणजे एकेक आकाशगंगाच आहेत.
उदाहरणार्थ- 'रवी मी' हे 👇गीत.
वसंतरावांचा 'रवी मी'चा वरील परफॉर्मन्स त्यांनी त्यांच्या बालपणीच्या गुरूंना, म्हणजे दीनानाथ मंगेशकरांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात सादर केला होता. त्या कार्यक्रमात दीनानाथांचे अनेक पैलू त्यांनी उलगडले होते.
जरूर ऐका/बघा.
👇
वसंतरावांनी दीनानाथांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात जी भैरवी सादर केली आहे, ती सुद्धा नजर लागावी अशी! एकेक तान मोजून-मापून आणि तरीही भैरवीच्या सौंदर्याचा स्वतःचा खूप दीप थॉट त्यात जाणवत राहतो.
प्रिय वसंतराव!
काश. काश, आपण असताना मी जन्मलो असतो आणि आपली भेट झाली असती. काश, मला आपलं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं असतं. काश, मला आपला तबला ऐकता आला असता. काश!!
🥺🥺
Talented Tabla Player, Brilliant Theatre Actor, Brilliantly Gifted Singer Dr Vasantrao Deshpande
🙏
‘संभाजी’चे लेखक व निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील साहेबांसाठी शंकावली:
👇
१) कोण्या मानवाने नाटक लिहिले किंवा पोवाडा रचला किंवा कादंबरीपर बाजारू (मार्केटेबल) लेखन केले म्हणून लगेच तो मानव इतिहासकार होतो का? इतिहासकार म्हणून करण्याच्या संशोधनाचे काय?
👇
२) बोडस/खाडीलकरांनी असे काय इतिहाससंशोधन केले आहे, याबद्दल तुमच्या खंडीभर पुरावेसंग्रहातील एखादा पुरावा ट्विट कराल का?
३) आपण अमोल कोल्हे यांच्या मार्केटेबल टायटलचा विषय मांडत आहात. पण ते करताना तुम्ही स्वतःच्याच कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या मुखपृष्ठाचे मार्केटिंग करत आहात का?
४) नीतिमत्तेविषयी (अवघड) प्रश्न :
सुरेश पाटलांनी (तुमचे भाऊ) तुमच्यावर लस्ट फॉर लालबाग नावाच्या कादंबरीच्या वांग्मयीन चौर्यकर्माचा आरोप करणारा लेख लोकसत्ता मध्ये लिहिला होता, त्यामुळे तुम्ही लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी सध्या मागे घेतली आहे का?
👇 bit.ly/3QjllDm
👇
काही प्रश्न:
१) स्वैरचाराची सांविधानिक व्याख्या काय?
२) कोणी कसे कपडे परिधान करुन वावरावे याबद्दल कोणता कायदा पारीत करण्यात आलेला आहे?
३) भाजपचे देशातील जे मंत्री/ त्यांचे मुलगे/नातेवाईक/कार्यकर्ते स्त्रियांवर अत्याचार करत फिरत असतात, त्यांच्याविरुद्ध मोर्चा कधी काढणार आहात?
👇
४) विकासपुरुष (!) नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून २०१४ साली विराजमान झाल्यावरही ज्या माणसांवर परकोटीच्या गरिबीमुळे कपड्यांशिवाय राहण्याची वेळ आली त्यांबद्दल तुम्हाला कळवळा वाटतो का? या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या एनजीओला संपर्क साधून मदत करण्याची तयारी तुम्ही दर्शवली आहे का?
👇
५) इन्स्टाग्रामनामक मेटा या अमेरिकन कंपनीच्या ऍपवरील व्हीडीओ रील्समध्ये भारतीय नागरिकांनी कोणते कपडे परिधान करुन वावरावे यासंदर्भातल्या सरकारी गाईडलाईन्स नेमक्या कोणत्या?
६) मॉरल पोलीसिंग करत फिरण्याचा अधिकार कोणत्या सांविधानिक हक्कांद्वारे तुम्ही प्राप्त करवून घेतला आहे?
👇
कोणी कोणासोबत लग्न करावं हे सरकार ठरवणार. मग तर टिंडर, बंबल आणि हिंज सारख्या ऍप्स ला आधार कार्ड लिंक करायला हवे. लवकरच कोणासोबत/कधी/कुठे डेटवर जावे, हेही सरकारने ठरवावे. तसेच कोणासोबत सेक्स करावा हेही सरकारने ठरवावे. सेक्स करताना निरोध वापरावे की नाही, तेही सरकारने सांगावे.🫵
निरोध कोणत्या ब्रँडचा असावा, हेही सरकारने सांगावे. सेक्स करताना निरोध फाटल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती भित्तीपत्रकांद्वारे व वर्तमानपत्रांत हँडबिलांच्यास्वरुपात द्यावी. तसेच, कोणत्या पोझिशनमध्ये सेक्स करावा, याबाबतीत तातडीचा जीआर काढावा.🫵
सरकारी पोझिशन्स सोडून कोणी एक्सपेरिमेंटल काही करत नाही ना, हे तपासण्याची सीक्रेट यंत्रे शोधून काढावी. इंजिनियरिंगच्या मुलांना तसे प्रोजेक्ट करण्यास सांगावे. जर कोणी सरकारी पोझिशन्सचे उल्लंघन करताना आढळला/ली/ले, तर तात्काळ अटक करुन डायरेफ्ट यूएपीएचा व ४२०चा गुन्हा नोंदवावा.🫵
गदिमांविषयी नामदेव ढसाळ यांनी एक आठवण निखिल वागळे यांच्या ग्रेट भेट मध्ये सांगितली होती. गदिमांना ज्या प्रकारे काही लोक मराठीतील वाल्मिकी म्हणून सन्मान देण्याचा नादान प्रयत्न करतात, त्यांनी तर हा प्रसंग ऐकण्यासारखा आहे.
हा प्रसंग ढसाळ ज्या काळात पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवत त्या काळचा आहे. फार आधीपासून कविता लिहू लागलेले ढसाळ टॅक्सीने विविध काव्यसंमेलनांना हजेरी सुध्दा लावत असत. एकदा त्याना भारतमाता सिनेमाजवळ कवितांविषयी कार्यक्रम असल्याची खबर समजली. लागलीच ते तिकडे गेले.
गदिमांना ते पहिल्यांदाच भेटत होते. गदिमांना ते महाकवी मानत. त्यांच्या बऱ्याच कविता ढसाळांना तोंडपाठ होत्या. अतिशय भारावून ढसाळांनी गदिमांना त्यांच्या स्वलिखित कवितांची डायरी वाचायला दिली व माझ्या नवकविता आपण वाचाव्यात अशी विनंती केली.
डॉ नरेंद्र दाभोलकर.
०१/११/१९४५-२०-०८-२०१३
—————
मला असं वाटतं-
मनुस्मृती नसती, तर मनुवाद आला नसता; मनुवाद नसता, तर ब्राह्मण्यवादी धर्मसत्ताने समाजाचा गळा आवळला नसता; धर्मसत्ताधिष्ठान नसतं, तर चातुर्वर्ण्य आलं नसतं;
👇
चातुर्वर्ण्य नसतं, तर पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा समूह बहुजनांना -'देवाने आम्हाला जास्त बुद्धी दिलेली असल्यामुळे आम्ही सांगतो, तेच सत्य आम्हाला प्रतिप्रश्न करणं म्हणजे ईश्वराला आव्हान देण्यासारखं आहे'- असं सांगू शकला नसता; एकूण समाजमनात समतेची बीजं रुजली असती;
👇
एवढंच काय! भोंदूबाबांना समाजाने ब्राह्मण्यवादाला आव्हान देणारे प्रश्न विचारले असते- गंडेदोरे घालणाऱ्यांच्या गचांड्या पकडल्या गेल्या असत्या; समतावादी समाजात हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजं रुजली असती, आणि आपसूकच अंधश्रद्धांचा जन्म झाला नसता.
👇
सार्वजनिक व्यक्तिमत्वे, आदर्श आणि समाज
-
विजय तेंडुलकर
(हमीद, या अनिल अवचट लिखित पुस्तकाच्या प्रस्तावानेतून.
👇
समाज म्हणजे कोण?? तर हाडामांसाची आणि वासनांची खरीखुरी शरीरे आणि अनावर गुणदोषांची स्खलनशील जिवंत मने वागवणारी माणसे. आदर्शांचे अनुकरण प्रत्यक्षात म्हणजे कृतीत करण्याइतकी यांतली बहुसंख्य मूर्ख नसतात.
👇
आदर्शांना नमस्कार घालून ती आपली शारीर आणि बरे वाईट जगणे निवांतपणे जगतात. तोंडाने उदात्त आणि सुंदर बोलत जगण्यातले कुरूप आणि बिनउदात्त जगून ते भावी पिढ्यांपासून लपवू शकतात. उरलेली थोडी माणसे आदर्शांचे अनुकरण करू मागत शेवटी एका अपरिहार्य समस्येशी पोचतात.
👇