Bhushan Eshwar Profile picture
He/Him. I teach Science. I practice Atheism & Scientific temperament. I love Indian Classical Music; Proudly NOT followed by Modi
Jan 6, 2023 10 tweets 3 min read
‘संभाजी’चे लेखक व निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील साहेबांसाठी शंकावली:

👇

१) कोण्या मानवाने नाटक लिहिले किंवा पोवाडा रचला किंवा कादंबरीपर बाजारू (मार्केटेबल) लेखन केले म्हणून लगेच तो मानव इतिहासकार होतो का? इतिहासकार म्हणून करण्याच्या संशोधनाचे काय?
👇 २) बोडस/खाडीलकरांनी असे काय इतिहाससंशोधन केले आहे, याबद्दल तुमच्या खंडीभर पुरावेसंग्रहातील एखादा पुरावा ट्विट कराल का?
३) आपण अमोल कोल्हे यांच्या मार्केटेबल टायटलचा विषय मांडत आहात. पण ते करताना तुम्ही स्वतःच्याच कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या मुखपृष्ठाचे मार्केटिंग करत आहात का?
Jan 4, 2023 5 tweets 1 min read
काही प्रश्न:
१) स्वैरचाराची सांविधानिक व्याख्या काय?
२) कोणी कसे कपडे परिधान करुन वावरावे याबद्दल कोणता कायदा पारीत करण्यात आलेला आहे?
३) भाजपचे देशातील जे मंत्री/ त्यांचे मुलगे/नातेवाईक/कार्यकर्ते स्त्रियांवर अत्याचार करत फिरत असतात, त्यांच्याविरुद्ध मोर्चा कधी काढणार आहात?
👇 ४) विकासपुरुष (!) नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून २०१४ साली विराजमान झाल्यावरही ज्या माणसांवर परकोटीच्या गरिबीमुळे कपड्यांशिवाय राहण्याची वेळ आली त्यांबद्दल तुम्हाला कळवळा वाटतो का? या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या एनजीओला संपर्क साधून मदत करण्याची तयारी तुम्ही दर्शवली आहे का?
👇
Dec 15, 2022 14 tweets 2 min read
कोणी कोणासोबत लग्न करावं हे सरकार ठरवणार. मग तर टिंडर, बंबल आणि हिंज सारख्या ऍप्स ला आधार कार्ड लिंक करायला हवे. लवकरच कोणासोबत/कधी/कुठे डेटवर जावे, हेही सरकारने ठरवावे. तसेच कोणासोबत सेक्स करावा हेही सरकारने ठरवावे. सेक्स करताना निरोध वापरावे की नाही, तेही सरकारने सांगावे.🫵 निरोध कोणत्या ब्रँडचा असावा, हेही सरकारने सांगावे. सेक्स करताना निरोध फाटल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती भित्तीपत्रकांद्वारे व वर्तमानपत्रांत हँडबिलांच्यास्वरुपात द्यावी. तसेच, कोणत्या पोझिशनमध्ये सेक्स करावा, याबाबतीत तातडीचा जीआर काढावा.🫵
Dec 13, 2022 5 tweets 1 min read
गदिमांविषयी नामदेव ढसाळ यांनी एक आठवण निखिल वागळे यांच्या ग्रेट भेट मध्ये सांगितली होती. गदिमांना ज्या प्रकारे काही लोक मराठीतील वाल्मिकी म्हणून सन्मान देण्याचा नादान प्रयत्न करतात, त्यांनी तर हा प्रसंग ऐकण्यासारखा आहे. हा प्रसंग ढसाळ ज्या काळात पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवत त्या काळचा आहे. फार आधीपासून कविता लिहू लागलेले ढसाळ टॅक्सीने विविध काव्यसंमेलनांना हजेरी सुध्दा लावत असत. एकदा त्याना भारतमाता सिनेमाजवळ कवितांविषयी कार्यक्रम असल्याची खबर समजली. लागलीच ते तिकडे गेले.
Nov 1, 2022 21 tweets 5 min read
डॉ नरेंद्र दाभोलकर.
०१/११/१९४५-२०-०८-२०१३
—————
मला असं वाटतं-
मनुस्मृती नसती, तर मनुवाद आला नसता; मनुवाद नसता, तर ब्राह्मण्यवादी धर्मसत्ताने समाजाचा गळा आवळला नसता; धर्मसत्ताधिष्ठान नसतं, तर चातुर्वर्ण्य आलं नसतं;
👇 चातुर्वर्ण्य नसतं, तर पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा समूह बहुजनांना -'देवाने आम्हाला जास्त बुद्धी दिलेली असल्यामुळे आम्ही सांगतो, तेच सत्य आम्हाला प्रतिप्रश्न करणं म्हणजे ईश्वराला आव्हान देण्यासारखं आहे'- असं सांगू शकला नसता; एकूण समाजमनात समतेची बीजं रुजली असती;
👇
Jul 30, 2022 22 tweets 9 min read
पं वसंतराव देशपांडे

02/05/1920 - 30/07/1983 वसंतराव नावाच्या तेजोनिधीचं शारीरिक अस्तित्व 39 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. मात्र त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा लोहगोल आजही अतिशय प्रखर तळपत आहे. वसंतरावांच्या असण्याला जितक्या छटा होत्या, तितक्या फारच क्वचित इतर कोण्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वांना असाव्यात.
👇
Jul 11, 2022 14 tweets 2 min read
सार्वजनिक व्यक्तिमत्वे, आदर्श आणि समाज
-
विजय तेंडुलकर
(हमीद, या अनिल अवचट लिखित पुस्तकाच्या प्रस्तावानेतून.

👇 समाज म्हणजे कोण?? तर हाडामांसाची आणि वासनांची खरीखुरी शरीरे आणि अनावर गुणदोषांची स्खलनशील जिवंत मने वागवणारी माणसे. आदर्शांचे अनुकरण प्रत्यक्षात म्हणजे कृतीत करण्याइतकी यांतली बहुसंख्य मूर्ख नसतात.
👇
Jul 10, 2022 4 tweets 2 min read
चंद्रकंस हा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग आहे. जेव्हा मालकंसमधला कोमल निषाद वगळून त्या ठिकाणी शुद्ध निषाद लावला जातो, तिथं चंद्रकंसची निर्मिती होते. शुद्ध निषाद हा या रागाचा फार महत्वाचा स्वर आहे; आणि अर्थातच हा राग उत्तरप्रधान आहे.

👇 मालकंस प्रमाणे इथं पंचम व रिषभ वर्ज्य असतात; गंधार व धैवत कोमल असतात. हा राग कर्नाटकी शास्त्रीय संगीतातून उत्तरेकडील संगीतपद्धतीत आलाय. त्यामुळे या रागात विलंबित किंवा धृत बंदिशी आहेत, तराणे सुद्धा आहेत; पण ठुमरी/टप्पा/होरी असे उपशास्त्रीय प्रकार गाण्याची पद्धत रूढ नाही.

👇
May 27, 2022 12 tweets 4 min read
29 मे 1953 रोजी शेर्पा तेनझिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी या दोन मानवांनी ब्रिगेडियर सर जॉन हंट यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात उंच जागा असलेल्या माउंट एव्हरेस्ट इथं पाऊल ठेवलं आणि जागतिक विक्रम केला. जवळपास सर्वांनी ही माहिती शालेय अभ्यासक्रमात वाचली/ऐकली असेल.
⬇️ Image मला आजरोजी माहित झालेलं एक फॅक्ट सांगतो. 1953साली भारताचे पंतप्रधान होते- पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना एव्हरेस्ट सर झाल्याची बातमी समजल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी तेनझिंग यांच्या घरी जाऊन त्यांना अत्यानंदाने मिठी मारली आणि स्वतःच्या गाडीत बसवून दिल्लीला घेऊन आले.
⬇️ Image
Apr 30, 2022 22 tweets 7 min read
'भारतीय शास्त्रीय संगीतातील स्त्रिया'
थ्रेड पहिला.

सुरश्री गानसम्राज्ञी वंदनीय 'केसरबाई केरकर'

#SeriesOfThreads
#शास्त्रीय_संगीत
#DoyensOfClassicalMusic
#म #मराठी @MarathiRT @ashish_jadhao हा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.
Apr 27, 2022 10 tweets 2 min read
ज्या जिग्नेश मेवाणी यांना मोदी सरकारच्या विरोधात एक ट्विट बद्दल अटक करून नेण्यात आलेलं होतं, त्यांना म्हातारे आईवडील आहेत.

ज्या रिया चक्रवर्तीचं मिडीया ट्रायल चालवून मुख्य मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न केला गेला, तिला सुद्धा म्हातारे आईवडील आहेत.
👇 फर्जी टूलकिट प्रकरणात बंदी बनवलं गेलेल्या दिशा रवी या हवामानबदल संदर्भातील कार्यकर्तीला सुद्धा आईवडील होते.

जामिया मिलिया इस्लामिया मधील विद्यार्थी असलेल्या सफुरा झरगर या सीएए कायद्याविरोधात प्रोटेस्ट करत असताना पकडून डांबण्यात आलं, त्यावेळी सफुरा झरगर गरोदर होत्या.
👇
Apr 22, 2022 22 tweets 4 min read
ब्राह्मणी विचारसरणी कलेच्या क्षेत्रात सर्वात जास्त घुसलेली आहे. शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात तर खूप जास्त. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे सोडले, तर सगळेच शास्त्रीय गायक भटशाहीचे सुप्त पाईक झालेले असल्याचे पुरावे सांगता येऊ शकतात.
👇 कुमार तर चारचौघात मी फक्त गाण्यालाच धर्म मानतो, असं सांगायचे! माझं घराणं माझ्यापासून सुरु होतं म्हणताना गाणं हाच धर्म असणारे वसंतराव त्या काळात तथाकथितांच्या टीकेचा विषय झाले होते. दोघांनी शास्त्रीय गाण्यात विद्रोह केला. रागांना नव्या पद्धतीने मांडलं आणि लोकप्रिय केलं.
👇
Feb 19, 2022 7 tweets 2 min read
शिवरायांच्या जयंती निमित्त काही मुद्दे:

1) शिवजयंतीची सुरुवात जोतीराव फुल्यांनी केली. त्यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली, स्वच्छ केली, तिच्यासमोर नतमस्तक झाले. त्यांनी शिवरायांना वाहिलेली काव्यसुमनांजली म्हणजे रचलेला आठ कडव्यांचा दीर्घ पोवाडा खूपच महत्वाचा आहे.
👇 2) बीएम पुरंदरे नामक RSSवादी माणसाच्या ब्राह्मणी विचारधारेच्या नादी लागून काही लोक शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक असे संबोधतात. वास्तविक, राजे शिवाजी शहाजी भोसले हे कुळवाडीभूषण क्षत्रियकुलवतसं श्रीराजा शिवछत्रपती होते, आणि म्हणूनच ते बहुजनांमध्ये कायमस्वरूपी वंदनीय ठरले आहेत.
👇
Jan 4, 2022 11 tweets 3 min read
मॅडम, आपल्या कमेंट मध्ये भरपूर असंबद्धता आहे, पण ठिके. पं कुमार गंधर्व यांच्याविषयीच्या तीन facts द्वारे आपला अर्धवटपणा दूर करण्याचा प्रयत्न करतो.
👇 १) ८ ऑगस्ट १९४२ रोजी गोवलिया टॅंक-मुंबई इथल्या सभेत महात्मा गांधींनी भारत छोडो हे भाषण दिले होते. त्या सभेत कुमार गंधर्व यांनी भजन गायले होते. पं कुमार गंधर्व हे गांधीवादी विचारांचे होते. म्हणूनच, त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून गांधी-मल्हार नावाचा राग निर्माण केला
👇