PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 14, 2022, 16 tweets

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संबोधित करणार.

7 वाजेपासून थेट प्रसारण:

#HarGharTiranga
#AzadiKaAmritMahotsav

नमस्कार, 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशात-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा-राष्ट्रपती

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संबोधन.

पाहा:

14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती-दिन म्हणून पाळला जात आहे. हा स्मृतीदिन पाळण्याचा उद्देश, सामाजिक सद्भावना, जनतेचं सक्षमीकरण आणि एकोप्याला अधिक बळ देणे हा आहे-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी

15 ऑगस्ट 1947 या दिवशी, आपण वसाहतवादी शासनाच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या. त्या दिवशी आपण आपल्या नियतीला नवे स्वरूप देण्याचा संकल्प केला होता: राष्ट्रपती

#AmritMahotsav

बहुतांश लोकशाही देशांत, मत देण्याचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता.

मात्र, आपल्या गणराज्याच्या सुरुवातीपासूनच, भारताने सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

मार्च 2021 मध्ये दांडी यात्रेच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देत, “स्वातंत्र्याचा #AmritMahotsav सुरु करण्यात आला. या युगप्रवर्तक आंदोलनानं आपल्या स्वातंत्र्यलढ्याला जागतिक पटलावर नेले.

या आंदोलनाचा गौरव करत, या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली-राष्ट्रपती

दरवर्षी 15 नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा सरकारने गेल्या वर्षी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आपले आदिवासी महानायक, केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक गौरवाचेच प्रतीक नाहीत, तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत: राष्ट्रपती

2047 पर्यंत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्णपणे साकार करण्याचा संकल्प केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, संविधानाची निर्मिती करणाऱ्या विभूतींच्या दूरदृष्टीनुसार, त्यांच्या स्वप्नातला भारत याच काळात आपण साकार करु-राष्ट्रपती

#COVID19 महामारीचा सामना आपण ज्याप्रकारे केला, त्याचे सर्वत्र कौतुक केले गेले. आपण देशातच निर्माण केलेल्या लसींसोबत, मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु केली. गेल्या महिन्यात आपण 200 कोटी लस मात्रा देण्याचा विक्रम पूर्ण केला आहे: राष्ट्रपती

भारतात आज संवेदनशीलता आणि करुणा या जीवन मूल्यांना प्राथमिकता दिली जात आहे. या जीवन मूल्यांचा मुख्य उद्देश आपल्या वंचित, गरजू आणि उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी काम करणे, हा आहे-राष्ट्रपती

आज देशात आरोग्य, शिक्षण आणि अर्थव्यवस्था तसेच त्यांच्याशी निगडीत इतर क्षेत्रांत जे चांगले बदल दिसून येत आहेत त्यांच्या मुळाशी सुशासनावर विशेष भर दिला जाण्याची प्रमुख भूमिका आहे-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा स्रोत देशाचे युवक, शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या महिला आहेत. आता देशात स्त्री – पुरुष अशा लैंगिक आधारावर असलेली विषमता कमी होत आहे-राष्ट्रपती

आज जेव्हा आपल्या पर्यावरणासमोर नव नवी आव्हाने येत आहेत, तेव्हा आपल्याला भारताच्या सौंदर्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे दृढतेने संरक्षण केले पाहिजे. जल, माती आणि जैव विविधतेचे संरक्षण हे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपले कर्तव्य आहे-राष्ट्रपती

"आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या मातृभूमीने दिले आहे. म्हणूनच आपण आपल्या देशाचे संरक्षण, प्रगती आणि समृद्धीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या अस्तित्वाची सार्थकता एका महान भारताच्या उभारणीतच असेल".

भारताची सशस्त्र दले, भारतीय दूतावास आणि आपल्या मातृभूमीचा गौरव वाढविणारे अनिवासी भारतीय, यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देते. सर्व देशवासियांना, सुखी आणि मंगलमय आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा-राष्ट्रपती

📹twitter.com/i/broadcasts/1…

76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

📙 pib.gov.in/PressReleasePa…

📹

#AmritMahotsav

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling