अचानक ३ दिवसाची सुट्टी भेटली..😀
मग काय..ज्या बसमध्ये जागा भेटली त्या बसचे बुकिंग करून निघालोही..!
ह्या वेळेस एक नवा प्रयोग..Live Travel Blog..!👇
सुरुवात रायगड जिल्ह्याच्या अश्या जागेपासून जिथून कमीत कमी ७ राज्यात एका रात्रीच्या प्रवासात पोहचू शकतो..!
#प्रवासवर्णन
#म
महामुंबईत..
विमानांसाठी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट..
जहाजांसाठी जेएनपीटी बंदर..
रेल्वेसाठी सीएसटी..
आणि
बससाठी कळंबोली MacDonalds..!
खरे तर , कर्नाटकात जायचे तर VRL travels..नाहीतर SRS travels च्या बसेस बेस्ट आहेत.
पण..ऐनवेळी..त्यांची तिकिटे भेटली नाही..म्हणून.. Citizen travels ची बस घ्यावी लागली.
आतापर्यंत तरी ह्या ट्रॅव्हल्सचा आंबट गोड अनुभव..👇
वेळेवर आली..पण AC नीट चालत नाहीये..
पांघरून स्वच्छ आहे..पण बेडशीटला गलिच्छ म्हणण्याशिवाय पर्याय नाही..!
कर्नाटकात फिरायचे तर २ जागा अगदी मोक्याच्या..हुबळी आणि मंगळूर..!
मला हुबळीचे तिकीट मिळाले..तिथून २-४ तासात हम्पी, गोकर्णा, कारवार, दांडेली, अगदी गोव्यालाही सहज पोचता येते..!
खेड शिवापूर म्हटलं की प्रत्येकाचे आवडीचे असे मटण भाकरीचे एक तरी हॉटेल असतेच..!
तसेच..ट्रॅव्हल्स वाल्यांचे आवडते हॉटेल म्हणजे हॉटेल नीलकमल..जिथे मटण भाकरी सोडून सर्व काही मिळते..😅
आणि त्यामुळेच मग सामान्य जनतेला खेड शिवापूरला जाऊनही पावभाजी खायची मानहानी पत्करावी लागते..😬😂
तसं..माझ्यावर जर अशा थांब्यांवर कोणता धंदा करायाची वेळ आली असती तर मी नक्की सिगारेट विकायचा केला असता..कमी भांडवलात जास्त नफा..!
नफ्याच चक्र रोज फिरवता येतं त्यात..सकाळी विकत घ्या..रात्री भरपूर मागणी असल्याने संपवून टाका..!
उगाच नाही ITC वरचे वर..वरच चालला आहे..😬😂
रात्री १०.३०-११ ला खेड शिवापूर वरून निघून बसने सांगितल्याप्रमाणे sharp ५ ला हुबळी ला पोचवले.
हुबळी च्या बहुतेक सर्व बस पुढे बंगळूर ला जाणाऱ्या असतात..म्हणून त्या सर्व शहराबाहेर हायवे ला सोडतात..पण Citizen ट्रॅव्हल्स ने गावात बस स्थानकाला सोडले..त्याने सहज २-३००₹ वाचले.
तेथून थेट रेल्वे स्टेशन गाठले..आणि सुदैवाने..कर्नाटकच्या मलनाड
(मल -ढग, नाड -देश) अर्थात ढगांच्या देशात जाणाऱ्या ८.३० च्या ट्रेनचे
(इथली हुबळी - म्हैसूर express) टिकीटही भेटले..!✌️
ह्या ट्रेन ने आता हिल स्टेशन्स अन् ट्रेकस टप्प्यात आणलेत..🤩
स्टेशनची सुसज्ज Wating room 🔥👇
सकाळी ८.३० ला बेळगाव-म्हैसूर जाणाऱ्या विश्वमानव एक्स्प्रेसमध्ये जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म वरून बसलो..!
इथून बिरुर जंक्शनला उतरायचा विचार आहे..कारण ते कूर्ग/माडिकेरी, चिक्के मंगळूर व अगुंबे (देशातील सर्वाधिक पावसाचे २ नं चे ठिकाण) ह्या सर्व Hill stations पायथ्याशी आहे..!
ढगांच्या प्रदेशात..मलनाड..!
बीरुर जंक्शन @१.१० वाजता
सुदैवाने अजून तरी फक्त ढगच आहेत..
पाऊस नाही..😅
बिरुर पासून सगळ्यात जवळ आहे ते चिक्केमंगळूर..४५किमी..त्यासाठी दर तासाला बस आहेत..फक्त दुपारचे १२.३०-२.३० चा वेळ सोडून..😬
म्हणून मग अजून एक कार्यकर्ता पकडला आणि रिक्षाने (घासाघीस करून १०००ला) ह्या hill station चा प्रवास नक्की केला..!
महाराष्ट्राबाहेर आलो आणि तिथल्या रस्त्यांचा हेवा वाटला नाही असे कधी तरीच होते..😑
आजचा पुण्याचा पाऊस बघून..माझ्या फोनची आणि त्यासोबतच माझ्या Live Travel Blog ची वाट लावणारा पाऊस आठवला..😬😅
त्या पावसाने आजारी पडलेला माझा फोन आजच बरा झाला..तो..पुण्याचा पाऊस पाहण्यासाठीच..😂😭
असो..
चिक्कामगलुर - हे राजाने त्याच्या लहान (चिक्का)मुलीला (मगळ)बहाल केलेलं गाव (उरू)लई भारी आहे..!
हिरव्यागार डोंगरातून..
अधूनमधून ढगांना बिलगत..
मख्खन रस्त्यांवर Rent वर मिळणारी बाईक घेऊन उगाचच हुंदडत फिरायची जागा म्हणजे हे चिक्कामगळूर..❤️
Highlights टाकून हा थ्रेड संपवतो..😬
बेलूर (तेथून ~३०किमी) येथील होयसळा राजांनी बांधलेल्या ७०० वर्ष जुन्या मंदिरातील कला व होयसळा साम्राज्याचे चिन्ह..!
बरं..हे चिन्ह होयसळा सम्राट विष्णूवर्धन( चिन्हातील व्यक्ती) ह्याने सिंहाला म्हणजे चोला साम्राज्याला पराभूत केल्याचे सांगते..! (सिंह -चोला साम्राज्याचे चिन्ह)
कर्नाटकातील सर्वोच्च शिखर - मुलायनगिरी
कळसूबाईपेक्षा हजारभर फूट उंच..पण त्यात काही विशेष नाही..तसंही जसे दक्षिणेकडे जावे तशी सह्याद्रीची उंची वाढतच जाते..! पण इतक्या उंचावर जाणारा रस्ता मात्र विशेष आहे!
साधारण ३ किमीचा ट्रेक..शेवटपर्यंत गाडी नेली तरी ~ १ किमीचा तरी ट्रेक भरेल
शिखरावरचा बाप्पा..शिखर..वाटेवरची फुले अन् रस्ता..!
केळीच्या पानात व पात्रात दम दिलेली बिर्याणी.. अन् चिक्कामगळुर कॉफी
तेथील Multilevel Farming !
सर्वात खाली झुडुपे आहेत ती कॉफीची..उंच झाडांवर चढलेल्या वेली आहेत त्या काळे मिरी उगवणाऱ्या..आणि ती सरळसोट झाडे कधी सुपारीची तर कधी पाईनची..!
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.