परमसौगत Profile picture
श्वास, तन, मन, धन तथागतांना अर्पण..!! || निर्वाण || क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले || भ.तथागत अनुयायी || rt is not an endorsement ||

Dec 28, 2022, 18 tweets

"श्यामची आई" आणि "बालसाहित्य" एवढीच प्रतिमा साने गुरुजींची केली जाते पण इतर अनेक ठिकाणी गुरुजींचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते (1/16)

#Thread #समाजसुधारक_साने_गुरुजी📍

#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)

"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.

व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.

संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.

क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.

मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)

दि.२४ डिसेंबर १८९९ रोजी दापोली शहराजवळील "पालगड" या गावी जन्मलेले साने गुरुजी म्हणजे, "फक्त श्यामची आई" आणि "बालसाहित्य" एवढीच प्रतिमा साने गुरुजींची केली जाते.

पण इतर अनेक ठिकाणी साने गुरुजींचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते अस्पृश्यता निवारण (4/16)

या क्षेत्रात साने गुरुजींनी उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे.

गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिव तर आईचे नाव यशोदाबाई असे होते.

वडील सदाशिवराव हे महसूल कलेक्टर होते. नंतरच्या काळात साने यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली व पुढे गुरुजींच्या आईचे म्हणजेच यशोदाबाईंचे (5/16)

१९१७ मध्ये निधन झाले.

साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठविण्यात आले. पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही, परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी पालगडला आले.

दापोली येथे (6/16)

असताना मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवणारे ते हुशार विद्यार्थी होते. व त्यांना कवितेतही रस होता.

१९१८ साली गुरुजींनी हायस्कूल मधून मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळवून पुढील शिक्षण सर परशुरामभाऊ कॉलेज मधून पूर्ण केले. तेथे त्यांनी बी.ए. ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी (7/16)

मराठी आणि संस्कृत साहित्यात एम.ए. ची मास्टर डिग्री पूर्ण केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजींनी अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केले, शाळेतील मुलांसाठी त्यांनी "विद्यार्थी" नावाचे एक मासिक देखील प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. (8/16)

गुरुजी हे प्रतिभाशाली वक्ता होते त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये "नैतिक मूल्य" निर्माण केली.

तसेच गुरुजींनी अध्यापनाचे कार्य ६ वर्ष केले व त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य "भारतीय स्वातंत्र्यासाठी" समर्पित केले. जेंव्हा महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली त्यावेळेस गुरुजींनी (9/16)

आपल्या शालेय नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला.

पुढे नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्याबद्दल त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्याने धुळे कारागृहात पंधरा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले.

१९३० ते १९४७ या कालावधीत साने गुरुजींनी (10/16)

अनेक आंदोलनात भाग घेतला व त्यांना तब्बल आठ वेळा अटक करण्यात आली.

व धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरुंगात सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले.

"श्यामची आई" ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. पुढे (11/16)

१९४२ च्या "भारत छोडो" आंदोलनात भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने १५ महिने तुरूंगात टाकले.

कामगार चळवळीतही साने गुरुजींचा सक्रिय सहभाग होता. वस्त्रोद्योग व खानदेशातील शेतकरी संघटित करण्यातही गुरुजींनी मुख्य भूमिका बजावली. व "राष्ट्र सेवा दलाची" स्थापना केली. (12/16)

ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. जातिभेद, दलितांना रूढी वागणूक, अस्पृश्यता या अनेक प्रकारच्या परंपरांचा साने गुरुजींनी कडाडून विरोध केला.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी गुरुजींनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला (13/16)

व या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला हे उपोषण ११ दिवस चालले आणि विठ्ठल मंदिराचे दरवाजे हे अस्पृश्यांसाठी खुले झाले.

"एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले." असे त्यावेळी म्हटले गेले.

गुरुजींनी विपुल साहित्य लेखन केले आहे. कादंबऱ्या, लेख, निबंध (14/16)

काव्य, चरित्रे, लेखन करत असताना भारतीय संस्कृती आणि माणसातील असणारे मूल्ये यांचा विचार करून त्यांनी आपली बरीच पुस्तके ही तुरुंगात पूर्ण केली आहेत.

प्रेम बंधुता यांची शिकवण देणारे थोर साहित्यिक साने गुरुजी स्वतः लिहिलेल्या "भगवान गौतम बुद्ध चरित्रामध्ये" म्हणतात, (15/16)

"भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले,

"जगाविषयी मनात सहानुभूती व करुणा बाळगून मानवांच्या हितार्थ, व कल्याणार्थ प्रयत्न करा, पावित्र्याने पुरीत अशा विशुद्ध व निर्दोष जीवनाची घोषणा करा; सुफलीत अशा कृतार्थ जीवनाची घोषणा करा." (16/16)

#थोर_साहित्यिक #समाजसुधारक #साने_गुरुजी📍

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling