#Thread - "स्वराज्यस्वामींनी"
#राजमाता म्हटलं की ज्यांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यासमोर येते त्या म्हणजे- जिजाऊ माँसाहेब.
जिजाऊंची जडणघडण ही एका घरंदाज कुळात झाली, पुढे त्याच तोलामोलाच्या घराण्यात त्यांचा विवाह झाला. धैर्य -शौर्याचा, साहसाचा वारसा त्यांच्या माहेराकडून मिळाला.
जाधव घराणे हे त्यावेळी राजे किताबाने गौरवलेलं सन्मानप्राप्त घराणं होत. पुढे राजे किताब असलेल्या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या. व इथून खरी त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची, ओळख सगळ्या जगाला होते.! इथूनच मध्ययुगीन भारतातील सुवर्णकाळाचा अध्याय सुरू झाला अस म्हणण्यास हरकत नाही.
जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह झाल्यावर, समकालीन कवी - परमानंद यांनी आपल्या शिवभारत ग्रंथात जिजाऊ बद्दल जे लिहल आहे ते नक्की बघण्याजोगत आहे.!
परमानंद म्हणतो - "जेव्हा 'विनयशील' जिजाऊ, भोसले घरात येतात तेव्हा, शहाजीराजे व जिजाऊ या जोडीला जणू लक्ष्मीनारायणाची शोभा येतेय."
पुढे परमानंद म्हणतो - जिजाऊंच्या येण्याने, त्यांच्या तेजाने, शहाजीराजेंचा पराक्रम व कीर्ति प्रखरपणे दिसु लागली.!
माता पार्वती जशी श्री शंकराची सेवा करते तशी ती पती शहाजीराजेंची सेवा करतेय.!
परमानंद इथे, जिजाऊ विषयी विनयशील, गुणवान, प्रेमळ या अर्थाचे आशयाचे शब्द वापरतो.!
आपल्या मातेसमान असलेल्या सासूची सेवा, पतींशी आदरयुक्त प्रेमळ वार्तालाप व सेवा करणे, त्याना धीर देणे. एवढंच नव्हे तर इतर पतिव्रता स्रियांना त्या मार्गदर्शन करायच्या.! माहेर आणि सासर, अशा दोन्हीकडील थोर वडीलधाऱ्याना प्रियजनांना आपल्या सुस्वभावाने त्या आनंदित करायच्या.
जिजाऊ बद्दल विनय, विनयशीलता हा शब्द परमानंदाने दोनतीन वेळ वापरला आहे.!
व त्यासोबतच "विनयाची प्रतिमूर्ती" हा शब्द वापरून त्याने जिजाउंच चरीत्रचं स्पष्ट केल आहे.!
समकालीन व शहाजीराजेंच्या पदरी असलेल्या कवी जयराम पिंडयेनी आपल्या 'राधामाधवविलासचंपु' या ग्रंथात जिजाऊ बद्दल लिहल
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली ज्यास शोभली जाया जिजाई ! जिचे की कीर्तीचा चंबूजंबुद्वीपाला ! करी साउली माऊलीसी मुलाला !
याचा अर्थ- जिजाऊ ह्या पराक्रमी धीर, उदार, वीर शाहजीराजेने शोभणार्या पत्नी आहे. पतीची कीर्ती महान असली तरी, त्यांची कीर्ती व प्रसिद्धी वेगळी- स्वतंत्र आहे !
जिजाऊंची उदार व गंभीर कर्तव्यदक्ष वृत्ती पूर्ण जम्बुद्वीपात पसरली आहे की, गरीब, पीडित सज्जन, सभ्य असे लोक परकीय लोकांच्या त्रासाला- अन्यायाला कंटाळून थेट जिजाऊंच्या आश्रयाला- साउलीला येतात.! ही त्यांची कीर्ती आहे.! रयेतला त्यांचा मोठा आधार होता हे इथं स्पष्ट होतं.!
जिजाउंच विवाहानंतर सुरवातीच्या काळातील जीवन हे अतिशय धामधुमीच धावपळीच व त्रासदायक गेलं. पती शहाजीराजे यांचा पराक्रम असला तरी, त्यांना म्हणावा तेवढा सन्मान मिळत नव्हता. त्यांचे सासरे व मेहुण्याची हत्या निजामशाहने केली, यानंतर शाहजीराजे आदिलशाहीत गेले तिथेही तीच तऱ्हां झाली.
या सर्व घटनाचां परिणाम जिजाऊवर जाणवू लागला. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देत शहाजीराजे आपल्या पत्नी व मुलांची व्यवस्था नीट करत. शिवजन्मानंतर जिजाऊ व बाळशिवाजीराजेंचा निवास शिवनेरी, अहमदनगर, पेमगिरी, दौलताबाद, माहुली आदी ठिकाणी झाला.! पण या सर्व परिस्थितीला जिजाऊ धैर्याने समोर गेल्या.
शहाजीराजे मुलूखगिरी वर असताना, शिवबांचा जन्म झाला. यात जे बाळाचे सर्व परंपरागत विधी असतात ते सर्व जिजाऊनी शिवनेरीवर व्यवस्थित पार पाडले. 1630 ते 1630 पर्यत शिवाजीराजेंची काळजी-संगोपन-शिक्षण जिजाऊंनी उत्तम केलं. या सर्व धामधुमीत जिजाऊना या गडावरून त्या गडावर जावे लागत
कारण त्यावेळी मोघल आणि शहाजीराजेंचा संघर्ष तीव्र स्वरूपाचा होता. पुढे जिजाऊंना नाशिकला, बाळशिवबा समेत कैदही झाली. नंतर त्यांचे चुलते जगदेवराय जाधव यांच्या विनंतीवरून त्यांची सुटका झाली.!
हे सर्व सांगायच कारण की माँसाहेब जिजाऊनी किती अवघड-कठीण परिस्थितीला तोंड दिलं होतं.!
शाहजीराजेंचे कारभारी दादोजी कोंडदेव यांनी, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढे परकिय आक्रमणामुळे भकास झालेलं असलेली पुणे जाहगिरीची घडी पुन्हा ठीक बसवली.!
आपल्या आईच धैर्य, व्यवस्थापन, समयसुचकता, निर्णयक्षमता, प्रजावत्सल कारभार या सर्व गोष्टी बाळशिवाजीराजे पाहत मोठे झाले.!
पुढे स्वराज्याचं दिव्यकार्य सुरू झाल्यावर जिजाऊंनी शिवाजीराजेंना एक मार्गदर्शक म्हणून जी साथ दिली, बर वाईट जाणून घेण्याची उदारवृत्ती प्रदान केली.! रयेतेबद्दल असलेली कणव राजेंच्या मनी असेल तर त्याच मुळ, जिजाउंच्या उदार अंतःकरणात सापडत. जे मी वर जयराम पिंड्येच्या काव्यात सांगितलय.
राजेंनी ज्या काही मोहिमा काढल्या, त्यात अफजलखान, शाहिस्तेखान, सुरतेची लूट, आग्रावरून सुटका, या मोहीम हिंदुस्थानाच्या इतिहासात अजरामर आहेत. या सर्व मोहिमां फत्ते करण्यासाठी राजे जेव्हा बाहेर पडायचे, तेव्हा गडावरून स्वराज्याचा राजकारभार स्वतः जिजाऊंच्या देखरेखीखाली असायचा.!
अफजलखाचे पारिपत्य करताना, लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करताना, सुरतेची लूट करताना, या सर्व मोहिमाआधी जिजाऊबरोबर राजेंची चर्चा झाली असणार, त्याना एक मार्गदर्शक व आई म्हणून जे बळ व आशीर्वाद दिला असणार हे त्या मोहीमेच्या यशात दिसून येत. यावेळी राज्याची काळजी जिजाऊंनी नीट घेतली
आग्ऱ्याला निघाल्यापासून ते सुटेकपर्यत 6 ते 7 महिन्याचा काळ होता. या काळात स्वराज्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आधी जसा, तसाच कारभार जिजाऊंनी सांभाळला.
स्वराज्याची पहिली आरमार मोहीम' बसरूर मोहिमेला जात असताना राजेंनी जिजाऊंची सूर्यग्रहणाच्या पर्वणीला सुवर्णतुला केली
( महाबळेश्वरला 1665 मध्ये ही सुवर्णतुला केली आहे. )
म्हणजे यात कळून येईल की, राजेनां लढाया मोहिमां वेळी आईकडून उपयुक्त सल्ले, धीर, मार्गदर्शन, आशीर्वाद, आदी मिळायचे. आणि हेच त्यांच्या यशाचे फल आहे. शिवरायांच्या चरित्राविषयी वाचताना आपल्याला महाराजांना जो महान गुण दिसतो
तो म्हणजे परस्त्रीचा अतोनात आदर, तिला मातेइतकीच समजणे.! सोबतच स्वराज्यात स्रियाच्या विक्रीला अटकाव. शत्रूच्या गोटातील स्रियांना आदराने त्यांच्या घरी पोहोच करणे. शत्रूच्या स्रियांना बंदी करण्याचे हिणकस प्रकार शिवरायांनी कधीच केले नाही.! हे सर्व संस्कार माँसाहेब जिजाऊंचेच
पुढे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झाल्यानंतर. नातु शभुराजेंना आई इतकीच माया देऊन वाढवले, त्यानाही थोरल्या महाराजासारखे संस्कार दिले.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही राजे इतिहासात महान राजा म्हणून अमर आहेत. यामागे केवळ जिजाऊचं.!
जिजाऊ ह्या शिवाजी महाराज व शभुराजें या बापलेका मधील एक संवादाचा दुवा होत्या. तसेच राजेंच्या धर्मपत्नी व राजे यांच्यामध्ये जो मायेचा पदर होता तो जिजाऊं होत्या. राजे आणि राण्यांमधील दुवा जिजाऊच होत्या. एक मातृसमान सासू म्हणून त्या रायगडचे कौटुंबिक वातावरण, नीट व आलबेल ठेवायच्या.
मला वाटत की एक माता केव्हा धन्य होते ? जेव्हा तिच्या लेकास या धर्तीवर अलौकिक कीर्ती व सन्मान प्राप्त होतो.! म्हणून शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा या जगात सर्वात जास्त आनंद हा जिजाऊनाच झाला.! पाच पातशाहच्या समोर आपल्या मुलाने एक सार्वभौम राज्य निर्माण केले हा एक आनंदच.
राजे छत्रपती म्हणून सिंहासनी बसल्याच्या 12 दिवसांनीच जिजाऊ स्वर्गावासी झाल्या.!
इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवात जिजाउबद्दल लिहतात- "एक वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, म्हणून जिजाऊसारखे भाग्य कुणाला लाभले नाही"
[ यासोबत मला जिजाऊ एक (शभुराजें) वीराच्या आज्जी सुद्धा होत्या. ]
मध्ययुगीन भारतासह या जगात सर्वात आधी स्वातंत्र्य न्याय समता या मानवी मूल्यांच अधिष्ठान कोणी बसवले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असे थोर मानवतावादी राजे जगाला देणाऱ्या माता म्हणजेच राजमाता जिजाऊ.!
माझ्या मते माँसाहेब जिजाऊ म्हणजे एक हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यमाताच होय.
लेख - स्वराज्यस्वामींनी - राजमाता जिजाऊ 👆 @KokateShrimant @VrushaliGYadav @ShrimantManey @shrikantbangale @nilzalte @ashish_jadhao @harinarke @rajuparulekar @abpmajhatv @SakalMediaNews @niranjansbook @jitendradehade @TulsidasBhoite @WriterDeepak @Marathi_Rash @gajanangaikwad
1630 ते 1636 असे वाचावे ..👍
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.