जमिर लांडगे Profile picture
#पुस्तकेवाचणारा 📕📚📖 #वाचनप्रेमी #संगीतप्रेमी 🎶🎧🎵📻 #चित्रपटप्रेमी 🎥🎦🎞️

Jan 18, 2023, 14 tweets

@LetsReadIndia @logicaldk @PABKTweets
#mustreadbook #पावनखिंड #रणजितदेसाई
' पावनखिंड ' बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या अतुलनीय शौर्याची गौरवगाथा आहे. बांदल - देशमुखांच्या साहसी पराक्रमाचा इतिहास आहे. शिवा काशिद ह्या मावळ्याची स्वराज्य निष्ठेची कहाणी आहे. सिद्धी जौहर, (1/14)

फाजलखान ह्यांना मराठी अस्मितेने दिलेल्या लढ्याची परीक्षा आहे. घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून पावनखिंड करणाऱ्या मावळ्यांच्या अखंड जयघोषाची ही गाथा आहे.
लेखकांने आपल्या लेखन शैलीने कादंबरीत जीव ओतला आहे. कादंबरीतील पात्र, घटना आपल्या भोवती फिरत आहेत असंच जाणवत राहते. (2/14)

अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये दाखवून दिली आहेत. दूरदृष्टी, मावळ्यांबद्दल असणारा जिव्हाळा - आपुलकी, स्वराज्य निष्ठा, स्त्रियांप्रती आदरभाव असे महाराजांचे अनेक पैलू उलगडले आहेत. (3/14)

कादंबरीची सुरुवात होते ती बाजी प्रभु पासून जेव्हा ते बांदल देशमुखांचे दिवाण होते. रोहिड्या वरील हल्ल्याने बाजी प्रभू महाराजांच्या व्यक्तिमत्वाला मोहून स्वराज्यात सामील होतात. पुढे महाराज त्यांना जसलोड गडाची बांधणीची कामगिरी देतात. ती कामगिरी बाजी फत्ते करतात. (4/14)

त्या नंतर अफजलखान स्वराज्यावर मोठ्या संख्येने घोडदळ, पायदळ घेऊन चालून येतो. अफजल वधानंतर झालेल्या घोर रणसंग्रामात बाजी मोठी कामगिरी पार पाडतात. आदिलशहाकडुन सिद्धी आणि मुघलांकडून शायिस्तेखान असे दोन नामी सरदार स्वराज्यावर चालून येतात. (5/14)

दोघांची हातमिळवणी होण्या अगोदर महाराजांना सुरक्षित स्थळी हलणे गरजेचे होते. त्यासाठी शिवरायांनी पन्हाळा जवळ केला. वर्षभर सुद्धा सिद्धीचा वेढा पडला तरी पन्हाळा त्या स्थितीत अनुकूल होता. पावसाळ्यापर्यंत सिद्धीचा वेढा उठेल असा महाराजांचा तर्क होता. (6/14)

पण सिद्धी सर्व तयारीनिशी स्वराज्यात उतरला होता. पावसाळ्यात टिकतील अशी कौलारू घरं त्याने पावसाळ्यात बांधली. एकूण वेढा लवकर सुटणार नाही ह्याची महाराजांना खात्री पटली. इकडे पुण्यात शयिस्ते खान कहर माजवत होता. तो लाल महालवर ठाण मांडून बसला होता. (7/14)

त्यामुळे प्रजेची होणारी गैर व्यवस्थेमुळे शिवरायांना लवकरात लवकर वेढा फोडून स्वराज्यात धाव घ्यावी लागणार होती. शिवरायांचा एक हेर गडावर दाखल झाला. शिवरायांनी गडावरून निसटण्याची एक योजना आखली. योजने प्रमाणे शिवा या नाभिक मावळ्याने शिवरायांचं सोंग घेऊन सिद्धिसमोर हजेरी लावली. (8/14)

आणि शिवराय अगदी कठीण अशा रस्त्यातून वाट काढत खेळणा किल्ल्याकडे मार्ग परिक्रमा करू लागले. पण दगा झाला अस कळताच सिद्धिने शिवरायांचा पाठलाग करण्यासाठी मसुदला पाठवले. शत्रू मागावर आहे हे कळताच बाजींनी शिवरायांना पुढे पाठवले आणि बांदल देशमुख मावळ्यांसह घोडखिंड थोपवून धरली. (9/14)

गडावर पोहचताच तोफांची बत्ती द्या असं शिवरायांना कळवलं. खेळणा किल्ल्याखाली जसवंत सुर्व्यांचा वेढा पडला होता. आपल्या पट्टे बाजीची चुणूक दाखवत शिवरायांनी मावळ्यांसह सूर्व्यांचा वेढा फोडला. (10/14)

आणि गडावर पोहचताच शिवरायांनी किल्लेदार झुंजारराव पवार ह्यांना तोफांची बत्ती देण्याचे आदेश दिले.
घोडखिंडीत यमाला ही ताटकळत ठेवणाऱ्या बाजी, फुलाजी आणि ३०० बांदल देशमुखांना तोफेचा आवाज ऐकताच जीवात जीव आला. (11/14)

क्षणाचा सुद्धा विलंब न लावता हर एक मावळा शत्रू गोटातील १० - १० गानिमांना चढेनिशी परतून लावत होता. तोफेचा आवाज ऐकताच ही सेना हसत हसत मृत्यूच्या दारी निजली.
कादंबरी कुठेही संथ वाटत नाही. वेगवान आणि पकड धरणारा घटनाक्रम, वाचकाला समरस करणारी पात्रं, (12/14)

डोळ्याला सुखावणारे निसर्ग दृष्यवर्णन आणि हुबेहूब डोळ्यांसमोर उभी राहणारी प्रसंग ह्या कादंबरीची वैशिष्टये आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ इतके सुरेख आहे की कोणत्याही वाचकाला वाचण्याचा मोह आवरता येणार नाही.
अशी ही शौर्याची, स्वाभिमानाची, स्वराज्य निष्ठेची, (13/14)

त्याग - बलिदानाची कथा प्रत्येक वाचनभक्त आणि शिवप्रेमींनी अवश्य एकदा वाचावी.
(14/14)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling