विश्राम परब (मुळीक) 🚩🇮🇳 मैं भी मोदीजी का परिवार Profile picture
जय श्री राम 🚩जय श्री राम🚩जय श्री राम🚩....... भारत माता की जय🚩.. वंदे मातरम्🚩... राष्ट्र प्रथम🚩...Only NaMo Bhakt... #Only_BJP...🚩 100% FB

Jan 23, 2023, 12 tweets

बॉयकॉट ट्रेंड : द्वेष नव्हे त्वेष

1) बॉलीवूड नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे विषय का घेत होते?

2) द काश्मीर फाईल्स, बाहुबली, कांतारा सारखे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते तेव्हा बॉलीवूडमध्ये त्याचं मनापासून तोंडभरून कौतुक का होत नव्हतं?

3) विजय

देवराकोंडा, प्रभास सारख्या उत्तम दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन बॉलीवूडवाले फालतू, दर्जाहीन चित्रपट का निर्माण करतात?

4) उत्तान दृश्ये, अनावश्यक शिवीगाळ, अश्लीलता आणि सवंगपणा पसरवणाऱ्या बॉलीवूडला सर्वसामान्य भारतीय का म्हणून आपलं म्हणेल?

5) चांगल्या उत्तम साहित्य, नाटक, इतर

प्रादेशिक चित्रपटांचे हीन दर्जाचे remakes बनवून बॉलीवूड निर्मात्यांचा पैसा, कलाकारांचा वेळ, मेहनत आणि प्रेक्षकांची अभिरुची वाया घालवतात त्याबाबत तुम्ही नाराजी का व्यक्त केली नाही?

6) नसिरुद्दीन शहा, अनुराग कश्यप, प्रकाश राज, वीर दास, नंदिता दास, स्वरा भास्कर, सोनम कपूर सारखे

कलाकार लोकं देव देश धर्म विरोधी शक्तींना कायम प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे पाठींबा देत असतात, खळबळजनक वक्तव्ये करतात तेव्हा बॉलीवूड मधली तुमच्यासारखी सुजाण मंडळी का चुप्पी साधतात?

7) बादशाह, यो यो हनी सिंग, मिका सिंग सारखे गायक संगीताच्या नावाखाली सतत रम, रमा, रमी सारखे विषय घेत

असतील, तर एका लिमिट नंतर लोकंही त्यांची गाणी का म्हणून ऐकतील?

8) संगीताचा महासागर सामोरी असतानाही तनिष्क बागची, मित ब्रदर्स - अंजान सारखे संगीतकार जुन्या गाण्यांना नव्या पद्धतीत बनवून उगाचच नव्या बाटलीत जुनी दारू भरतात

9) आपलं बॉलीवूड हे काही तथाकथित भाई लोकांच्या दहशतीखाली

वावरत आहे हे कटू सत्य आपण कधी स्वीकारणार? एका तथाकथित अल्पसंख्यांक समाजाचे गेली कित्येक वर्षे चुकीच्या पद्धतीने लांगुनचालन केले जाते, त्यांच्या नावाने सतत victim cards खेळली, खेळवली जातात, हे जनतेला आता कळून चुकलं आहे, जनता का शांत बसेल?

10) पुरस्कार सोहळ्यांमधील दिसणारं

सर्रासपणे दिसणारं राजकारण सुजाण जनता का म्हणून दुर्लक्षित करेल?

11) बजेट 100, 150, 200, 250 कोटींच्या नावाखाली 500 रुपयांची तिकिटं घेऊन लोकं सतत आपल्याच देव, देश, धर्माचा आपल्याच डोळ्यांपुढे होणारा अपमान, विटंबना का म्हणून सहन करेल?? आपल्या संस्कृती व सभ्यतेचा सातत्याने होणारा

उपमर्द का सहन करेल??

12) सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराचा गूढ मृत्यू होतो, कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला जातो तेव्हा अशा संवेदनशील प्रकरणांत सुद्धा बॉलीवूडमधली अनेक दिग्गज मंडळी अजिबात ब्र काढत नाही. असं का?

13) मराठी पात्रांना लाचखोर, भ्रष्टाचारी, दाक्षिणात्य

पात्रांना विनोदी, पंजाबी पात्रांना बावळट, बिहारी पात्रांना निरक्षर, गुजराती पात्रांना लबाड आदी गोष्टी सातत्याने दाखवून बॉलीवूड नेमकं काय सिद्ध करू इच्छित आहे? संबंधित प्रांताच्या पात्रांमध्ये इतर स्वभावधर्म नसतात का?

14) लेस्बियन, समलिंगी, गुन्हेगारी, Underworld, ज्या गोष्टी

खुद्द विज्ञानाला, निसर्गाला अमान्य आहेत, ज्या गोष्टी खोट्या आहेत, समाज विघातक आहेत, अशा गोष्टींचा पुरस्कार बॉलीवूड का करतो? आणि प्रेक्षकांच्या माथी का मारतो?

15) वास्तववादी, सत्यघटना अथवा ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये artistic liberty च्या नायक - नायिकांची प्रणयदृश्ये,

गाणी, भव्यदिव्य सेट्स, खोटायकी दाखवणे म्हणजे बॉलीवूडचा जन्मसिद्ध अधिकार असल्याप्रमाणे का म्हणून चितारले जातात?

बॉलीवूडमध्ये जी बॉयकॉट ट्रेंड नावाची जी सुनामी आली आहे ती येण्यापूर्वीची परिस्थिती म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती... तो एक निद्रिस्त ज्वालामुखी होता... केवळ हिंदू

समाजच नव्हे तर या देशातील प्रत्येक नागरिक आता राष्ट्रवादी विचारांचा पाईक होण्याला महत्त्व देतोय.. तुम्हीही दर्जेदार विषय आणि त्याची मांडणी आणा प्रेक्षक अक्षरशः तुटून पडतील आणि उत्पन्नाची ' बॉर्डर ' क्रॉस करतील

#BoycottbollywoodCompletely
#BoycottBollywoodForever
#BoycottPathan

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling