ADITI Gujar Profile picture

Feb 16, 2023, 11 tweets

संध्येतील भगवान विष्णूंच्या केशव नावाच्या (२४ पैकी एक) शिल्पाचा परिचय

१) केशवाय नम

कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना, आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः पहिली तीन नांवे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन,

प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते.नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडुन नमस्कार स्थितीत ठेवले जाते याला आचमन करणे म्हणतात. आचमनाने शरीर शुध्द होते.

यातील पहिले नांव ॐ केशवाय नमः असे आहे.

विष्णू सहस्रनामातील २३ वे व ६४८ वे नांव केशव आहे.

भगवत् गीतेत दुस-या, तिस-या व दहाव्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांचा, केशव म्हणुन उल्लेख केल्याचा पहायला मिळतो.

आकाशात् पतितं तोयम् ,
यथा गच्छती सागरम् ।
सर्व देव नमस्कार :
केशवं प्रतिगच्छति ॥

या श्लोकात असे सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जसे, ओहोळ, नाला, ओढा, नदी द्वारा अंती समुद्राला पोहोचते तसे सर्व देवांना केलेला नमस्कार अंती केशवरूपी नारायणाला पोहोचतो. म्हणजे सर्व देव हे केशवाचीच रूपे आहेत.

ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तींना केश म्हणतात. या तिघांचे कार्य आपल्या सतर्कतेने चालविणारा तो केशव.

कंसाने, बाल श्रीकृष्णाची हत्या करण्यासाठी अश्र्व मुखी राक्षस गोकुळात पाठवला होता. त्याचे नांव केशी होते. केशी राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला म्हणुन

श्रीकृष्णाला केशव नांवाने ओळखले जाते.

श्रीकृष्णाचे केस कुरळे, घनदाट, लांब सुंदर होते म्हणून ही केशव म्हटले जाते.

केशवाची शक्ती किर्ति तर लक्ष्मी रूप श्रीदेवी आहे.

सौम्य केशव म्हणजे शांत, प्रसन्न रूपातील केशव. सौम्य केशवाची कर्नाटकात मंदिरे आहेत.

नागमंगला, मंड्या, कर्नाटक येथे सौम्य
केशवाचे मंदिर आहे.

चन्नकेशव मंदिर (चन्ना- सुंदर, देखणा -कानडी) बेलूर कर्नाटक येथे आहे.

आपल्याकडे काही मंदिरात लक्ष्मीसहित केशवाची मंदिर असतात तेथे लक्ष्मी केशव म्हटले जाते. अनेक कुटुंबांचे कुलदैवत लक्ष्मी केशव आहे.

कोकणात लक्ष्मी केशव मंदिरे बरीच आहेत.

लक्ष्मी केशव मंदिर कोळिसरे हे रत्नागिरी जयगड रस्त्यावर, रत्नागिरी पासुन ३५ किमी अंतरावर आहे.

लक्ष्मी केशव मंदिर, बिवली चिपळूण, हे चिपळूण पासुन २५ किमी अंतरावर आहे.

काही ठिकाणी लक्ष्मी केशव मंदिर असले तरी विष्णू मूर्तिची गदा, पद्म, शंख, चक्र आयुधे लक्षात घेता, विष्णू लक्ष्मी मूर्ति असते.

केशव रूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात.

उजव्या समोरच्या हातात - पद्म
उजव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख
डाव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र
डाव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा

ठिकठिकाणच्या केशव मूर्तीं चा परिचय येथे करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

#wa
फोटो माहिती (Social Media)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling