संध्येतील भगवान विष्णूंच्या केशव नावाच्या (२४ पैकी एक) शिल्पाचा परिचय
१) केशवाय नम
कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना, आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः पहिली तीन नांवे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन,
प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते.नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडुन नमस्कार स्थितीत ठेवले जाते याला आचमन करणे म्हणतात. आचमनाने शरीर शुध्द होते.
यातील पहिले नांव ॐ केशवाय नमः असे आहे.
विष्णू सहस्रनामातील २३ वे व ६४८ वे नांव केशव आहे.
भगवत् गीतेत दुस-या, तिस-या व दहाव्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांचा, केशव म्हणुन उल्लेख केल्याचा पहायला मिळतो.
आकाशात् पतितं तोयम् ,
यथा गच्छती सागरम् ।
सर्व देव नमस्कार :
केशवं प्रतिगच्छति ॥
या श्लोकात असे सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जसे, ओहोळ, नाला, ओढा, नदी द्वारा अंती समुद्राला पोहोचते तसे सर्व देवांना केलेला नमस्कार अंती केशवरूपी नारायणाला पोहोचतो. म्हणजे सर्व देव हे केशवाचीच रूपे आहेत.
ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तींना केश म्हणतात. या तिघांचे कार्य आपल्या सतर्कतेने चालविणारा तो केशव.
कंसाने, बाल श्रीकृष्णाची हत्या करण्यासाठी अश्र्व मुखी राक्षस गोकुळात पाठवला होता. त्याचे नांव केशी होते. केशी राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला म्हणुन
श्रीकृष्णाला केशव नांवाने ओळखले जाते.
श्रीकृष्णाचे केस कुरळे, घनदाट, लांब सुंदर होते म्हणून ही केशव म्हटले जाते.
केशवाची शक्ती किर्ति तर लक्ष्मी रूप श्रीदेवी आहे.
सौम्य केशव म्हणजे शांत, प्रसन्न रूपातील केशव. सौम्य केशवाची कर्नाटकात मंदिरे आहेत.
नागमंगला, मंड्या, कर्नाटक येथे सौम्य
केशवाचे मंदिर आहे.
चन्नकेशव मंदिर (चन्ना- सुंदर, देखणा -कानडी) बेलूर कर्नाटक येथे आहे.
आपल्याकडे काही मंदिरात लक्ष्मीसहित केशवाची मंदिर असतात तेथे लक्ष्मी केशव म्हटले जाते. अनेक कुटुंबांचे कुलदैवत लक्ष्मी केशव आहे.
कोकणात लक्ष्मी केशव मंदिरे बरीच आहेत.
लक्ष्मी केशव मंदिर कोळिसरे हे रत्नागिरी जयगड रस्त्यावर, रत्नागिरी पासुन ३५ किमी अंतरावर आहे.
लक्ष्मी केशव मंदिर, बिवली चिपळूण, हे चिपळूण पासुन २५ किमी अंतरावर आहे.
काही ठिकाणी लक्ष्मी केशव मंदिर असले तरी विष्णू मूर्तिची गदा, पद्म, शंख, चक्र आयुधे लक्षात घेता, विष्णू लक्ष्मी मूर्ति असते.
केशव रूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात.
उजव्या समोरच्या हातात - पद्म
उजव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख
डाव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र
डाव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा
ठिकठिकाणच्या केशव मूर्तीं चा परिचय येथे करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आज जेवून झाल्यावर वडील बोलले,
"मी आता रिटायर्ड होतोय..
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
रोज वाचायला पेपर नको,
आजपासून सिगरेट बंद,
जसे ठेवाल तसे राहीन."
काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का वडीलांना वाटलं ते ओझं होतील माझ्यावर ?
मला त्रास होईल जर ते गेले नाहीत कामावर ?
ते घरात राहिले म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्यांची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्यांनी दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्यांचा सांगण्याचा,
पण ते काकुळतीला का आले?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
वडीलांच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
गेल्या काही दिवसांपासून संकर्षण कऱ्हाडे चा एक video, viral होत आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांचा एक अनुभव सांगितला आहे. नकळत त्यावर चर्चा अशी झाली की जशी काही देवस्थान श्रीमंत असतात तसं आपलं पंढरपूर नाही. सहज एक विचार डोक्यात आला की खरंच असं का नाही?
भक्त कमी आहेत का तर नाही. लाखो लोक येतात. पण या देवाकडे मागणं काय मागितलं जातं? तर देवा पाऊस चांगला पडू दे शेती बहरून येऊ दे. जे काही मागणं असतं ते समाजासाठी, समृद्धीसाठी. मला नाही वाटत की कोणी त्याकडे गाडी, फ्लॅट, बंगला मागत असेल. संकर्षण सहज बोलून गेला की हा गरिबांचा देव आहे.
मला वाटत तो तृप्त लोकांचा देव. बघा ना पांडुरंगाला कधी नवस केल्याचं ऐकिवात नाही. त्याला साकडं घातलं जातं. कोणीही पांडुरंगाला business partner करत नाही.वर्षाला कोटा पोहचवत नाही. श्रीमंत दगडूशेठ माझं लाडकं दैवत. कधीही प्रश्न असला आणि मंदिरात जाऊन आलो की माझा प्रश्न तरी मिटलेला असतो
गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.
ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.
इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.
मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.
जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.
येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.
त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?
आपले जग काय आहे? आपली उंची किती आहे?
आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.
वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.
अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.
मारुती हे नाव सगळयाना माहीत आहे पण मारुती नावाचा अर्थ खूप महान आणि गहन विषय आहे.
मा- म्हणजे मारुत.
मारुत - पवन किंवा वारा. महर्षी कश्यप यांचे 49 पुत्र जे अत्यंत बलवान होते. त्रिखंडात वारा आणि हवा पोहोचविण्याचे काम हे त्यांचेच.
त्या 49 मारुतांची शक्ती एकट्या अंजनी पुत्रा मध्ये सामावलेली आहे.
दुसऱ्या बाजूने
मा- म्हणजे माधव, देव विष्णू.
रु - म्हणजे रुद्र. देव शिवशंकर
ती मध्ये
त - सत तत मधील त म्हणजे देव ब्रह्मदेव.
आता ती च्या वेलांटी बद्दल
ती मधली त + इ =ती
इ = गौरी+सरस्वती+लक्ष्मी= "शक्ती" त्यातील ती
त्रिदेव आणि त्रिदेवी , 49 मारुत , अष्ट दिगपाल सहित प्रभू श्री रामाच्या पाच अवतारांची शक्ती, महान शिवभक्त माता अंजना आणि महा बलशाली राजा केसरी यांची शक्ती, सर्व ऋषी महर्षींचा आशीर्वाद. असा सर्वाचा समावेश असलेली महान शक्ती म्हणजे मारुती.
हे सर्व शास्त्राच्या आधारे आहे.
एक राजाला चार राण्या होत्या.
पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा .
❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,
"मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."
❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,
"मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन. त्यापुढे नाही.
❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले,
"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?