प्रविण कलंत्री 📚 Profile picture
जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान! पुस्तक प्रेमी!! #पुस्तकआणिबरचकाही

Feb 26, 2023, 9 tweets

#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇

उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण  हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇

जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप  हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇

वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले  ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला  हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची 👇

भरेल. सावरकरांची कविता ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप  ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी  (जन्मापासून नाशिकपर्यंत), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  (२ खंड) आणि शत्रूच्या शिबिरात  हे त्यांचे 👇

अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी 👇

एक. 'मला काय त्याचे अथवा मोपल्यांचे बंड' आणि 'काळे पाणी' या त्यांच्या दोन कादंबऱ्या. 'उ:शाप', 'संन्यस्त खडग' आणि उत्तरक्रिया ही त्यांनी लिहिलेली नाटके. त्यांच्या इंग्रजी ग्रंथात 'वाॅर ऑफ इंडियन इडिंपेडंन्स १८५७', 'हिंदूपदपादशाही', ' हिंदूराष्ट्रदर्शन', 'हिस्टाॅरिक स्टेटमेंट', 👇

आणि 'लेटर्स फ्रॉम अंदमान' यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाड्मय खंड १ ते ८ ह्यात समाविष्ट आहे. मुंबईमध्ये १९३८ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच १९४३ साली सांगली येथील नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. 👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling