#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇
उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇
जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇
वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची 👇
भरेल. सावरकरांची कविता ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड) आणि शत्रूच्या शिबिरात हे त्यांचे 👇
अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी 👇
एक. 'मला काय त्याचे अथवा मोपल्यांचे बंड' आणि 'काळे पाणी' या त्यांच्या दोन कादंबऱ्या. 'उ:शाप', 'संन्यस्त खडग' आणि उत्तरक्रिया ही त्यांनी लिहिलेली नाटके. त्यांच्या इंग्रजी ग्रंथात 'वाॅर ऑफ इंडियन इडिंपेडंन्स १८५७', 'हिंदूपदपादशाही', ' हिंदूराष्ट्रदर्शन', 'हिस्टाॅरिक स्टेटमेंट', 👇
आणि 'लेटर्स फ्रॉम अंदमान' यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाड्मय खंड १ ते ८ ह्यात समाविष्ट आहे. मुंबईमध्ये १९३८ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच १९४३ साली सांगली येथील नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
वसंत शंकर कानेटकर (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१) लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत.प्राध्यापक असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून लिहिलेल्या 👇
लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची 👇
ही शोकांतिका. प्रेमा, तुझा रंग कसा?, ही एक हलकी-फुलकी विनोदी, खेळकर सुखात्मिका होती. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले.हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले.👇
#पुस्तकआणिबरचकाही
एडगर राइज बरोज ( १ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५९ ) टारझन हे नाव न ऐकलेलं क्वचितच कोणीतरी असेल. एका इंग्लिश उमरावाचा मुलगा आई वडिलांचे छत्र हरवून आफ्रिकेच्या निबिड अरण्य एप्सच्या टोळी सोबत वाढतो. डोळ्याचं पातं लावताना लावतो तोच वेलींच्या आधारे एका झाडावरून 👇
दुसऱ्या झाडावर तिथून तिसऱ्या झाडावर असा लिहिलया प्रवास करू शकतो. अंगावर फक्त एक व्याघ्राजीन, कमरेला लटकणारा धारदार सुरा, मानेवर रुळणारे केस आणि पिळदार शरीरयष्टी. एडगर राइज बरोज ने टारझन या पात्राची पहिली कथा लिहिली १९१२ मधे. बघता बघता टारझन इतका लोकप्रिय झाला की बरोजने 👇
टारझनवर २६ कादंबऱ्या लिहिल्या. हॉलीवुड निर्मात्यांच या हिरो वर गेल्या शंभर वर्षांपासून सिनेमे बनवनं सुरुच आहे. टारझन वर कॉमिक्स व ॲनिमेशन फिल्म सुद्धा बनल्या. मंगळ सफारी करणारा जॉन कार्टर हा दुसरा मानसपुत्र विज्ञान कथा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
रिचर्ड फ्रान्सिस बर्टन(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. 👇
एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. 👇
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करून हिंदुस्थानात आले. येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्यांना २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्यांनी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सई परांजपे ( १९ मार्च १९३८ ) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या 👇
बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. 👇
पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.कथा, चष्मेबद्दूर अशा हलक्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇
हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇
झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे 👇