🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Mar 11, 2023, 22 tweets

आजच्या थ्रेडमध्ये आपण सध्या जगभरात Hot Topic असणार्या विषयाबद्दल जाणुन घेऊ. म्हणजेच अमेरिकेतील
१)'Silicon Valley Bank'(SV bank)
२)ती बुडण्यामागील कारणे
३)त्याचे परिणाम,ले ऑफ
सुरुवातीला सांगु इच्छितो की इथे बर्याच जणांना २००८ साली 'Lehman brothers bank' बुडाली
#threadकर #वसुसेन

तेव्हा त्याचे फक्त अमेरिकेवर नाही तर संपूर्ण जगावर काय परिणाम झाले हे माहिती आहेच, आपल्या भारतालापण त्याचा जोरदार फटका बसला पण पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी चिदंबरम इ. हुशार लोकांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरली 😄
हा झाला इतिहास,पण आता कालच लेहमन ब्रदर्सनंतरच मोठ संकट

निर्माण झाल असुन शुक्रवारी (१० मार्च) रोजी SV bank बंद केली आहे आणि या बॅंकला विकत घेण्यासही कोणी तयार नाहीय. SV bank ही अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थित असुन IT companies चा हब असलेल्या जगप्रसिद्ध 'सिलिकाॅन व्हॅली' मधील स्टार्ट अप्सना कर्ज देण्याचे काम करते. या बॅंकेची स्थापना

१९८३ रोजी झाली आणि बॅंकेच‌ मुख्यालय सांता क्लारा, कॅलिफोर्निया मध्येच आहे. या बॅंकेचे CEO असणार्या Greg Becker यांना बॅंक बुडण्याची माहिती आधीच कळल्यामुळे त्यानी आपल्याजवळील ३.६ मिलियन डॉलर्सचे शेअर्स २ आठवड्यांमध्ये विकुन टाकले 🤐.
आता आपण या बॅंकेची व्याप्ती ध्यानात घेऊयात.

ज्यावेळी बॅंक दिवाळखोरीमध्ये निघते तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान त्या बॅंकेत पैसे ठेवणार्या ठेवीदारांना भोगावे लागते. SV Bank किती अवाढव्य होती हे समोर आलेल्या आकड्यानुसार समजेल. ठेवीदारांनी या बॅंकमध्ये तब्बल १७५ बिलियन डॉलर्स रक्कम ठेवली होती 😱
आता एव्हढी मोठी रक्कम असणारी

बॅंक दिवाळखोरीत निघलीय म्हणजे विचार करा की अमेरिकेवर आणि एकुनच जगावर किती मोठं आर्थिक संकट आलेलं आहे 🙏
यात एक छोटी जमेची बाजु अशी की भारतात तुम्ही एखाद्या बॅंकेत पैसे ठेवले तर RBI ज्याप्रकारे ठेवीवर ५ लाखांपर्यंतचा विमा देते(म्हणजे तुम्ही ३ लाख ठेवले किंवा १५ लाख ठेवले आणि ती

बॅंक बुडाली तर तुम्हाला ३ लाख किंवा ५ लाख रू. मिळणार, इथे लक्षात घ्या की १५ लाख ठेवलेत आणि बॅंक बुडाली तर ५ लाख विमा मिळणार म्हणजेच वरचे १० लाख बुडाले!!) त्याचप्रकारे अमेरिकेत २.५ लाख डॉलर्सपर्यंत ( जवळपास २ करोड रूपये) मिळु शकतात. हे सर्व FDIC(Federal Deposit Insurance Corp.)

अंतर्गत समाविष्ट आहे. याच FDIC ने SV Bank मधील ठेवी आणि बाकीची मालमत्ता व्यवस्थित ठेवण्यासाठी काल 'National Bank of Santa Clara' चालु केली आहे. या बॅंकेमार्फत पुढील हालचाली करण्यास प्राधान्य दिले जाईल. आता आपण आणखी जाणुन घेऊया की ही बॅंक बुडण्यामागील नक्की कारणं काय आहे ते..

यामागे प्रमुख दोन कारणे आहेत
१)मागील दिड दोन वर्षात आयटी कंपन्यांची सुमार कामगिरी.
२)गेले वर्ष झाले 'Federal Reserve' मार्फत interest rate वाढवला जात आहे.
तुम्हाला माहिती आहेच की ज्याप्रकारे RBI ने रेपो रेट ४ वरून ६.५० वर नेलाय त्याचप्रकारे Federal Reserve ने त्यांचा रेट वाढवलाय

व आणखी एक कारण असे की या Silicon Valley Bank ने भुतकाळात खुप मोठ्या प्रमाणावर 'Bond' विकत घेऊन ठेवला होता. बाॅंड विकत घेतल्यावर तुम्हाला Fix rate of interest मिळतो पण यांनी त्यावेळी ज्या रेटने बाॅंड विकत घेतले होते त्यापेक्षा आजच्या काळात जास्त रेट मिळत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ

बॅंकनी ४-५ वर्षांपूर्वी ३% रेटनी बाॅंड विकत घेतला असेल आणि आज तोच ६-७% नी असेल तर बॅंकला ३% नीच फिक्स इंटरेस्ट मिळतोय. हा मुद्दा थोडा गौणय कारण खरेदी विक्री लाॅंगटर्म गोष्ट आहे पण सगळ्यात मोठा विषय पुढे आहे!!
मी आधीच सांगितल्याप्रमाणे SV Bank ही IT Start ups कंपन्यांना कर्ज

देण्याचे काम करत होती, आयटी कंपन्या चांगल्या चालल्या तर आपोआप बॅंक पण चांगली कामगिरी करणार अस साधसोपं समीकरणं होत. म्हणुन तर २०१९-२०२० ला बॅंकचे शेअर्स तुफान कामगिरी करत होते. खालील फोटोमध्ये तुम्हाला समजुन येईल की शेअर्सनी ६००-७०० डाॅलर्स गाठले होते पण जेव्हा मागील

एक दोन वर्षात सिलिकॉन व्हॅलीमधील कंपन्या घरंगळायला लागल्या तसं बॅंकेचे शेअर्स पण घरंगळत खाली खाली आले. आकडेवारीनुसार आणखी विश्लेषण केल तर तुम्हाला समजुन येईल की मागील ५-६ वर्षात SV Bank ने ज्या कंपन्यांना कर्ज दिलते त्या कंपन्या तुफान कामगिरी करत होत्या, भरपुर पैसा कमवत होत्या

तो येणारा पैसा कंपन्या SV Bank मध्ये ठेवत असल्याने बॅंकेचे शेअर्सपण उसळ्या मारत चालले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, २०१७ रोजी या बॅंकेत एकुण ४४ बिलियन डॉलर्स ची ठेवी होती तीच २०२१ मध्ये १८९ बिलियन डॉलर्स एव्हढी अवाढव्य झाली 😱🔥
जेव्हा कंपन्या एव्हढे पैसे बॅंकेत ठेवतात तेव्हा

त्या त्याचप्रमाणात व्याज परताव्याची अपेक्षा देखील करणारच! आणि बॅंकांच कामच असत की आपल्याकडची रक्कम जास्त व्याजदराने मार्केटमध्ये वाटायची आणि मुळ व्याजदर आणि ज्यादा व्याजदर यातला फरक स्वताला नफा म्हणुन ठेवायचा..
नेमकं इथेच घोळ झाला कारण जिथे २०१७ साली बॅंकने २३ बिलियन डॉलर्स कर्ज

रूपात वाटले तिथेच २०२१ मध्ये फक्त ६६ बिलियन डॉलर्सच बॅंक कर्ज रूपात वाटु शकली🤕.
आता बॅंकला नफा तर कमवायचा आहे आणि त्यासाठी जी रक्कम कर्जरूपात वाटुन शिल्लक राहिली होती तिला कामाला लावायचा विचार बॅंकच्या डोक्यात आला आणि म्हणुन उरलेल्या सगळ्या रकमेचे म्हणजेच तब्बल १२८ बिलियन

डॉलर्सचे बाॅंड बॅंकनी विकत घेतले. आता तुम्ही जर थ्रेड नीट वाचला असेल तर वरती मी आधीच बाॅंडची स्किम नक्की काय आहे याबद्दल लिहिले आहेच.
इथुन पुढे खरी समस्या उभी राहिली की नवीन स्टार्ट अप्स की ज्यांनी Silicon Valley Bank मध्ये मोठमोठ्या ठेवी ठेवल्या होत्या ते स्टार्ट अप्स फेल

चालल्याने त्यांनी बॅंकेकडे आपल्या पैशांची मागणी करायला चालु केली. सुरुवातीला बॅंकेला काही विशेष अडचण आली नाही पण मागणार्यांची संख्या हळूहळू वाढत चालल्याने बॅंकेसमोर मोठा पेच उभा राहिला आणि शेवटी बॅंकेला १२८ बिलियन डॉलर्सचे बाॅंड स्वस्तात विक्रीस काढण्याची वेळ आली. ही गोष्ट जेव्हा

बाकीच्या कंपन्यांच्या कानावर आली तस प्रत्येकजण बॅंकेच्या मागे तगादा लावायला लागला की 'आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या'. आता या सगळ्या गोष्टींचा इतका परिणाम झाला आणि शेवटी बॅंक दिवाळखोरीत निघाली🙌🤕
मी आधीच सांगितल्याप्रमाणे एखादी बॅंक बुडाली तर ठेवीदारांना FDIC अंतर्गत २.५ लाख

डाॅलर्स म्हणजेच २ करोड रूपयांपर्यंत भरपाई मिळु शकते पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आयटी कंपन्या म्हणल्यावर ठेवीची रक्कम अर्थातच ३० करोड ७० करोड आणि १०० करोडच्या घरात असु शकते..म्हणजेच २ करोडच्या वरची रक्कम बुडीत जाणार आणि त्यामुळेच पैश्यांची कमतरता तयार झाल्याने आयटी कंपन्यात

जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या पगारी आणि इतर खर्च सगळा टांगणीला राहणार.अस जर झालं तर येणार्या काळात मोठ्या प्रमाणावर Lay off(कर्मचार्यांना कामावरून काढुन टाकणे) होऊ शकतं आणि आयटी जाॅब्स आणखी धोक्यात येतील.
याचा ताण एकट्या अमेरिकेवर नसुन संपूर्ण जगभरावर येणार एव्हढ मात्र नक्की

एकंदरीत वातावरण बरच बिघडलय आणि या बातमीची दखल भारतीय शेअर बाजार कोणत्या प्रकारे घेतो ते पाहणे रोमांचक ठरेल!!
खासकरून IT companies 🙌💥
#threadकर #वसुसेन
#SVB #SVBCollapse #SiliconValleyBank #USA #studyIQ #currentaffairs #thread #banks #reservebank

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling