सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते!
#लालपरी
#प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗
#प्रवास #अनुभव
#सह्याद्री.. महाराष्ट्रासारख्या राकट देशाला शोभून दिसणारी आणि स्वतः देखील साक्षात कालीमातेसारखी रौद्र सह्याद्री पर्वतरांग! त्यांच्या घनदाट जंगलात वसलेल्या संसारातून प्रवास करणारी ही #लालपरी!
सह्याद्रीला पाहून एकच वाक्य मनात येते, "असो हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा!"
आणि अशा तऱ्हेने आमची #लालपरी कोकणात मुक्तपणे फिरत आहे. जणू काही #माहेरवाशीण! इतकी लीलया की सगळे खाच खळगे सुद्धा तिला माहीत आहेत. लोक सुद्धा तिला बघून बिचकत नाहीयेत. घाटावरून वाहात आलेला हा रस्ता सुद्धा जणू तिला माहेरी सोडायला आल्यासारखा दिसतोय. जावई सासरी येऊन #निवांत व्हावा तसा!
वर्तमान काहीही असो.. पण शेवटी #कोकण माझेही माहेर आहेच ना! कोणी मला कोकणातून कधी आलास हा प्रश्न विचारला की मनात येतं त्याला सांगावं "वेड्या/वेडे कोकण माझ्याबरोबर घेऊन आलोय मी. त्याला कसं सोडता येईल!?" शेवटी जिथे उगम आहे तिथेच अंतर्धान व्हायचे हा जीवनाचा नियम आणि हेच चक्र!
#प्रवास
काय ती तांबडी माती, काय तो उकाडा, काय तो घाम.. एकदम ओकेच!
आता कसं जरा कोकणात आल्यासारखं वाटतंय. मस्त उकडतंय. कुकर मध्ये तांदळाच्या दाण्याला कसं वाटत असेल ना तसं. दिवसाच्या प्रवासात एका ठिकाणी थांबलेली बस म्हणजे एक प्रचंड मोठा कुकर असतो! शिट्टी असूनही उपयोग नाही 😂
#कोकण #प्रवास
प्रवास हळूहळू संपत चाललाय. एका बाजूने उदास वाटत आहे आणि दुसऱ्या बाजूने छान. छान यासाठी की माझ्या लोकांमध्ये जाणार. आणि उदास यासाठी की ही #लालपरी मला सोडून जाणार.. मी तिला सोडणार.. सोडावं लागणार. हा नियम आहे जगाचा. इष्टस्थळी पोहोचल्यावर प्रवास मागे सोडून द्यावा लागतो! #अनुभव
#लालपरी सकाळी ज्या तोऱ्यात निघाली त्याच तोऱ्यात मला आमच्या नाक्यावर सोडून निघून गेली. साधा एक फोटो ही काढू दिला नाही की मागे वळून पाहिलं नाही. मी माझ्या मनाचा एक तुकडा तिच्या कडे लपवून ठेवला आहे आणि मी ही तिच्या सगळ्या कला जपून ठेवल्या आहेत. #प्रवास आणखीन वेगळा काय असतो? ❤️😌🥹
@threadreaderapp unroll
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.