Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 Profile picture
ॐ Poet, Writer, Director. #शब्दयात्री Own @ShabdyatriBlog वसिष्ठ कुलोत्पन्न ब्राह्मण. Views strictly personal. https://t.co/JFfdYu0d3I
Mar 18, 2023 9 tweets 8 min read
सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते!
#लालपरी ImageImage #प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗
#प्रवास #अनुभव
Mar 18, 2023 14 tweets 15 min read
लालपरी! 🤩 🚌

आयुष्यात पहिल्यांदा ड्रायव्हर काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसून प्रवास 🤗 तो ही तिकिटाचे पूर्ण पैसे भरून!

पुरुष असूनही माझ्या आरक्षित जागेवरून मला उठवलं नाही, या सवलतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो 🙏 माझी तरी दुवा नक्की मिळेल!

असो, प्रवास सुरू 🛣️

#प्रवास #लालपरी #म ImageImageImage पायाशी असणाऱ्या या बोळकांड्यातून हवा येत राहाते.. पण खिडक्या असूनही ते तिथे का आहे? हा प्रश्न गेला अर्धा तास मेंदू कुरतडत आहे 🙄😄

#प्रश्न #निरीक्षण #असे_का ? Image
Mar 17, 2023 5 tweets 2 min read
यावरून आठवलं.. लोक कोणाला बिरुदावली नाही लावली की जणू पातक झाल्यासारखे अंगावर धावून येतात. म्हणजे नावामागे महात्मा, छत्रपती, भारतरत्न जोडलं नाही की गहजब झाल्यासारखे हिंसक होतात. आणि हेच लोक लोकशाहीची हत्या वगैरे बडबड करतात. ही बिरुदावल्यांची जलपर्णी आहे!

shabdyatri.com/blog/%e0%a4%ac… कोणी मुद्दाम अपमान करण्यासाठी हे करत नाही. काही वेळा एखादी व्यक्ती इतकी जवळची वाटते की बिरुदावली नात्यांवरचं ओझं वाटतं. उदा. मी कवी ग्रेस यांना फक्त ग्रेस असं कधी कधी एकेरी हाक मारतो कारण मला ग्रेस खूप जवळचे वाटतात. यात अपमान कुठे आला. तीच गत तुकोबा, ज्ञानोबा आणि इतरांची आहे.
Mar 15, 2023 15 tweets 5 min read
१५ मार्च - ज्युलियसचा मृत्यदिन. ब्रुटस तू सुद्धा!?

मूळ लेख 👉 लिहिणारा मीच

_____

अंगावर उंची वस्त्रे परिधान करून नेहमीप्रमाणे तो सभेत आला. विश्वविजेता म्हणून ज्याची ख्याती होती आणि प्रखर शासक म्हणून ज्याचा वचक होता. तो राजा आपल्या सभेकडे नजर टाकून Image आपल्या सिंहासनाच्या दिशेने जाऊ लागला. सभागृहात शांतता होती. एक विचित्र शांतता. सर्पाने काळोखात लपून बसावे अशी शांतता. पण त्याने दुर्लक्ष केले कारण अशा अनेक सर्पांना त्याने युद्धभूमीवर हरवलेले होते. सिंहासनाकडे जाणाऱ्या पायरीवर त्याने पाय ठेवलाच होता की एक गलका झाला आणि.. Image
Sep 29, 2022 6 tweets 6 min read
Ha chalel ka?
#theme_pic_india_navratri_yellow

Took it during Ganeshotsav in 2018 #Pune Another
#theme_pic_india_navratri_yellow

#flower #yellow
Sep 14, 2022 9 tweets 2 min read
काल एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.

त्याला साधा प्रश्न विचारला "आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?"

तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे😎 ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत त्यांच्या मागची विचारसरणी, खुंटीवर टांगलेला तर्कशुद्धपणा आणि विनाकारण निर्माण केलेली जातीय दरी. या मुद्द्यांवर अक्षरशः पिसं काढली जाऊ शकतात. हास्यास्पद पातळीवर बनवले जात आहेत चित्रपट
Jun 28, 2020 8 tweets 2 min read
"विषारी टोमॅटो"

आजच्या दिवशी म्हणजेच २८ जून १८२० साली सगळ्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की टोमॅटो विषारी फळ नाही आणि ते खाण्यास योग्य आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. ऐकायला विचित्र वाटेल पण इंग्लंड, उत्तर युरोप व अमेरिका येथे कैक वर्षे टोमॅटो हे एक विषारी फळ मानले जात होते. १/क्ष टोमॅटो आपण भाजी म्हणून खात असलो तरी वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो हे एक फळ आहे. तर या रोचक कथेची सुरुवात होते मेक्सिकोत. टोमॅटो खरं तर मूलतः दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील फळ आहे. इतिहासाच्या प्रवासात कधीतरी मेक्सिकोत Aztec लोकांनी ते फळ मेक्सिकोत आणलं व त्याची लागवड केली. २/क्ष