🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Mar 18, 2023, 12 tweets

भाजपने काॅंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी वरून निलंबित करण्याची मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असुन मध्यंतरी राहुल गांधी जेव्हा United Kingdom ला गेले होते तेव्हा त्यांनी देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केलाय
#Rahul #वसुसेन

अस भाजपचं म्हणण आहे. तर इकडे राहुल यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत व केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागणार नाहीय अस स्पष्ट केलय.
भाजपाने ओम बिर्ला यांच्याकडे नवीन कमिटी स्थापन करण्याची मागणी केली असुन याद्वारे राहुल यांना निलंबित करता येईल का हे तपासा अशी मागणी केलीय.
#RahulGandhi

दि. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात गेले होते तेव्हा त्यांनी खालील विधाने केली. 👇
१)सगळ्यांना माहितीय की भारतीय लोकशाही धोक्यात आहे.
२)ज्या विविध संस्था आहेत जसेकी न्यायपालिका, वृत्तसंस्था, संसद या सर्वांना सरकारने दबावात आणलय. मोकळीक नाही ठेवलीय.

३)लोकशाहीवर हल्ला होतोय हा भारताचा प्राॅब्लेम असुन त्याच उत्तर पण भारतातच मिळेल, पण जगातील बाकीचे देश त्यात UK, USA यांनी भारत सरकारला प्रश्न विचारावेत की तुम्ही भारतात लोकशाही दाबण्याचा
प्रयत्न का करत आहात?
४)सभागृहात बोलताना माईक बंद केला जातो. असे गंभीर आरोप त्यांनी लावलेत

तर राहुल गांधींच्या या विधानांवर भाजप म्हणतय राहुल गांधी यांनी बाहेरील देशात जाऊन भारताचा अपमान केला आहे.
भाजप ज्या कमिटीची मागणी करत आहे त्याबद्दल थोडे 👇
तज्ञांच्या मते या आरोप प्रत्यारोपांच्या शहानिशा करण्यासाठी कमिटी स्थापन केली जाऊ शकते. ही कमिटी बनवण्यासाठी आधी ठराव मंजूर

करून घ्यावा लागेल आणि त्या सदस्याला निलंबित करण्याआधी त्यांच्यावरील सगळे आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहेच की लोकसभेत बहुमत भाजपकडेच आहे त्यामुळे ठराव मांडुन मंजुर होण्यास भाजपला काहीच प्राॅब्लेम येणार नाहीय 😄
कमिटीचा विषय निघालाच आहे तर आता आपण

२००५ साली आणि २००८ साली स्थापन दोन्ही कमिटींबद्दल जाणुन घेऊ आणि भाजपाला २००५ सालच्या कमिटीमध्येच का रस आहे ते पण पाहुया.
२००८ साली 'Cash-for-votes' प्रकरणात कमिटी स्थापन झाली होती. त्यात स्टींग ऑपरेशन सारखी प्रकरणं बाहेर आली परंतु २००५ साली 'Cash-for-query' प्रकरणात ११

खासदारांना खासदारकी वरूनच काढण्यात आले. म्हणजेच Expel केले ज्यामुळे तेथे नवीन निवडणूक लावावी लागली. भाजपला राहुल गांधी यांच्यासाठी २००५ सालच्या कमिटीसारखीच कमिटी हवीय. २००५ साली 'Cobrapost' चे स्टिंग ऑपरेशन बाहेर आले त्यात ११ खासदार सभागृहात ठराविक प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे

घेताना पकडले गेले.यात भाजपचे ६, बसपाचे ३ तर १ राजद व १ काॅंग्रेस चे होते. ११ पैकी लोकसभेचे १० खासदार तर राज्यसभेचा १( लोढा) खासदार होते. या सगळ्यांची खासदारकी निष्कासित (expelled) करण्यात आली. २४ डिसेंबर, २००५ ला या ११ खासदारांना निष्कासित करण्यासाठी संसदेत ऐतिहासिक मतदान झाले.

इकडे लोकसभेत प्रणब मुखर्जी(leader of the house) यांनी मतदानासाठी resolution आणले तर तिकडे राज्यसभेत डाॅ.मनमोहन सिंग यांनी resolution आणले.भाजपाने त्या मतदानाला विरोध म्हणुन सभागृहातुन 'Walk out' केले होते 😄.
भाजपचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी हे या संदर्भात बोलताना म्हणाले

की, "खासदारांनी भ्रष्टाचार केला आहे आणि तसे करताना ते पकडल्यादेखील गेलेत परंतु त्यांना शिक्षा म्हणुन सभागृहातुनच निष्कासित करणे हा कुठतरी मुर्खपणा वाटतो".
तर विषय असा आहे की राहुल गांधीना निलंबित जरी केल तरी त्यांना Sympathy मिळेल जी Sympathy त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीसाठी

पोषक ठरेल असा माननारा एक वर्ग आहे.
आता या प्रकरणाला नेमकं कोणत वळण मिळतय ते पाहणे गरजेचे आहे.😄👍
#RahulGandhi #cambridgeuniversity #India #BJP #rahul #congress

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling