🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Mar 19, 2023, 13 tweets

आता हसाव का रडाव तेच समजं ना 😂😭
आपला देश भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेला आहे यात काही शंकाच नाही पण आता अमेरिकेला पण चुना लावला गेलाय😂
हा चुना लावणारा दुसरा तिसरा कोणी नसुन 'स्वामी नित्यानंद बाबा' आहे.खालील थ्रेडमधी
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)नेमकं प्रकरण
#वसुसेन #threadकर

स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा

नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला

बलात्कार, फसवणुक इ. आरोपांखाली पोलिस चौकशीला सामोरे जावे लागते. २०१९ साली तमिळनाडू मधील एक जोडपं गुजरातला जाऊन तेथील 'Gujarat state commission for protection of child rights' ला भेट देऊन सांगते की नित्यानंद बाबाच्या अहमदाबादमधील आश्रमात ४ मुलांना डांबुन ठेवलेल आहे.जेव्हा पोलिस

त्या आश्रमात पाहणीसाठी गेली तर त्यांना फक्त २ च मुले सापडले तर उरलेले दोघ बेपत्ता होते.जेव्हा पोलिस नित्यानंद बाबाची शोधाशोध करायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येत की हा भाऊ तर २०१९ लाच देश सोडुन पळुन गेलाय 🫡🙏
आता खरी कथा चालु होते 👇
हा बाबा गेलाय कुठ तर या बाबाने अमेरिकेत

इक्वाडोरजवळ एक बेट विकत 😱 घेऊन तेथे 'United states of Kailasa' नावाचा देश चालु केलाय. या देशाची स्वताची रिझर्व्ह बँक, स्वताचे चलन(ज्याला तो कैलाशियन डाॅलर म्हणतो) वापरत आहे. याने स्वताच्या देशाचा झेंडा,राज्यघटना एव्हढच काय तर स्वताची अर्थव्यवस्थाच उभारली आहे 😅

याची हवा म्हणजे ज्या लोकांना याच्या कैलासा देशाला भेट द्यायची आहे त्या लोकांनी आधी ऑस्ट्रेलिया विसा काढावा आणि तिथे जावे. तिथुन कैलासा देशाच स्वताच प्रायव्हेट जेटने लोकांना कैलासाला नेण्यात येईल 🫡😅
कोव्हिड काळात नित्यानंद म्हणला की 'भारतानी मला आदरातिथ्यसहित स्विकारावं तरच मी

भारतात येईल आणि मी आलो तर देशातला सगळा कोव्हिड गायब होऊन जाईल 😂'
ही झाली या बाबाची एकंदरीत गोष्ट.
आता आपण यानं अमेरिकेसोबत नेमकं काय केलय ते पाहुया.
त्याआधी आपण 'Sister City' म्हणजे थोडक्यात जाणुन घेऊ. सिस्टर सिटी म्हणजे एकाच देशातले किंवा विविध देशातले दोन शहरांची जोडी. ही जोडी

बनवण्यामागे मुख्य उद्देश असा असतो की त्या दोन शहरांत आर्थिक, तांत्रिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी. Sister city बनवताना proper agreement केले जाते.
तर या आपल्या पठ्ठ्याने United States of Kailasa व अमेरिकेतील ३० शहरांमध्ये 'Sister City' Cultural agreement केल आहे.हे शहरं

अशी तशी नाहीत यात Ohio, Florida, Dayton, Virginia इ. नामांकित शहरांचा समावेश आहे 😂. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा 'Fox News' ने विविध शहरांत जाऊन विचारणा केली की "खरच तुम्ही या बाबाच्या देशासोबत sister city cultural agreement केल आहे का??" तेव्हा बर्याच जणांनी होय उत्तर दिलं.

Fox news वाल्यांनी या सर्वांना एव्हढंच सांगितल की‌ 'तुम्ही गुगल जरी केल असत की‌ कैलासा नावाचा देश आहे तरी का?? तरी तुमच्या लक्षात आल असत 😂' असो 🙏
अमेरिकेतील लोकांनी पण यावर आपल मत व्यक्त करताना सांगितले की,"आम्ही तुम्हाला एव्हढा कर देतो आणि तुम्ही कोणतीही शहानिशा न करता एका

बलात्कारी बाबाच्या नादाला लागुन त्याच्या देशासोबत(जो की अस्तित्वातच नाहीय') करार करताय?"
जशी ही गोष्ट उघडकीस आली तशी 'City of Newark' ने Kailasa सोबतचा Sister city agreement मोडलं आहे.
अरे या बाबाने तर UN(United Nations) ला‌ पण सोडलं नसुन मागच्या महिन्यात UN मिटिंगला 'United

States Of Kailasa' या त्याच्या देशाच्या एका प्रतिनिधीने मिटिंग ला उपस्थिती लावली होती.
तर अस हे एकंदरीत प्रकरण आहे.
#nithyanand #USA #sistercity
#kailasa

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling