🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Mar 20, 2023, 9 tweets

अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प
#threadकर #वसुसेन

रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स

असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे‌.
महाराष्ट्राच्या उभारणीत

अतिमहत्त्वाचे योगदान देणारे 'सेवा क्षेत्र' आणि 'कृषी क्षेत्र' सध्या मार खात असले तरी 'औद्योगिक क्षेत्र' तग धरून आहे. पण इथे ही मुख्य आणि ठळक विषय असा की कुठतरी गुजरातला पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याने महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व कमी होत चालले आहे.
लक्षात घ्या

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्राने बर्याच प्रकल्पांना मंजुरी दिली खरी पण आपण इथे महाराष्ट्राचा प्रतिस्पर्धी असणारा गुजरात सोबत तुलना केली तर तुम्हाला यातील पोकळपणा समजुन येईल.
महाराष्ट्राने या कालावधीत एकुण २११ प्रकल्पांना मंजुरी दिली आणि त्यासाठी ३५,८७० करोड रूपये

मंजुर केले तिथेच गुजरात याच काळात एकुण १६८ प्रकल्पांना मंजुरी दिली आणि त्यासाठी गुजरातने तब्बल ९८,१५९ करोड रुपये मंजुर केले. केव्हढी मोठी तफावत आहे ही🙏🤕
थोड्या सकारात्मक बाबी पाहुयात.
२०२० साली 'Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell' म्हणजेच 'MAITRI' हे

विविध FDI proposal आणि ५० करोडपेक्षा जास्त गुंतवणूक असणार्या नवीन औद्योगिक कंपन्यांना मंजुरी देण्यासाठी तयार केलेले Single permission system असुन याद्वारे सरकारकडे आलेल्या एकुण २.७८ लाख applications पैकी २.६९ लाख applications प्रोसेसमध्ये आहेत.
तर डिसेंबर २०२२ रोजी राज्य

सरकारने 'टाटा ग्रुप'चे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नेमलीय त्यात महाराष्ट्राला १ ट्रिलियन डाॅलर्स‌ पर्यंत नेण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन ती समिती करेल.
महाराष्ट्राचा इतिहास आहे की आपल्या राज्याने देशाचे इंजिन म्हणुन काम

पाहिलय. आत्तापर्यंत सामाजिक,आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्र छाती ठोकुन नेतृत्व करत असताना ज्या सरकारच्या हातात सध्या राज्याची धुरा आहे त्यांनी एकमेकांच्या द्वेषापायी राज्याची प्रतिमा मलीन करू नये🙏🤕
#Maharashtra #gujarat #महाराष्ट्र #EknathShinde

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling