अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प #threadकर#वसुसेन
रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स
असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे.
महाराष्ट्राच्या उभारणीत
अतिमहत्त्वाचे योगदान देणारे 'सेवा क्षेत्र' आणि 'कृषी क्षेत्र' सध्या मार खात असले तरी 'औद्योगिक क्षेत्र' तग धरून आहे. पण इथे ही मुख्य आणि ठळक विषय असा की कुठतरी गुजरातला पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याने महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व कमी होत चालले आहे.
लक्षात घ्या
एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्राने बर्याच प्रकल्पांना मंजुरी दिली खरी पण आपण इथे महाराष्ट्राचा प्रतिस्पर्धी असणारा गुजरात सोबत तुलना केली तर तुम्हाला यातील पोकळपणा समजुन येईल.
महाराष्ट्राने या कालावधीत एकुण २११ प्रकल्पांना मंजुरी दिली आणि त्यासाठी ३५,८७० करोड रूपये
मंजुर केले तिथेच गुजरात याच काळात एकुण १६८ प्रकल्पांना मंजुरी दिली आणि त्यासाठी गुजरातने तब्बल ९८,१५९ करोड रुपये मंजुर केले. केव्हढी मोठी तफावत आहे ही🙏🤕
थोड्या सकारात्मक बाबी पाहुयात.
२०२० साली 'Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell' म्हणजेच 'MAITRI' हे
विविध FDI proposal आणि ५० करोडपेक्षा जास्त गुंतवणूक असणार्या नवीन औद्योगिक कंपन्यांना मंजुरी देण्यासाठी तयार केलेले Single permission system असुन याद्वारे सरकारकडे आलेल्या एकुण २.७८ लाख applications पैकी २.६९ लाख applications प्रोसेसमध्ये आहेत.
तर डिसेंबर २०२२ रोजी राज्य
सरकारने 'टाटा ग्रुप'चे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नेमलीय त्यात महाराष्ट्राला १ ट्रिलियन डाॅलर्स पर्यंत नेण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन ती समिती करेल.
महाराष्ट्राचा इतिहास आहे की आपल्या राज्याने देशाचे इंजिन म्हणुन काम
पाहिलय. आत्तापर्यंत सामाजिक,आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्र छाती ठोकुन नेतृत्व करत असताना ज्या सरकारच्या हातात सध्या राज्याची धुरा आहे त्यांनी एकमेकांच्या द्वेषापायी राज्याची प्रतिमा मलीन करू नये🙏🤕 #Maharashtra#gujarat#महाराष्ट्र#EknathShinde
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Electoral bond बद्दल तत्कालिन अर्थमंत्री स्व.अरूण जेटली नी 2017 च्या अर्थसंकल्पात प्रथम उल्लेख केला.ज्यावेळी वेंकटेश नायक या RTI कार्यकर्त्याने(Right To Information, 2005)याबद्दल विचारणा केली होती तेव्हा अर्थ मंत्रालय,निवडणूक आयोग व रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आम्हाला
#ElectoralBond
Electoral Bond बद्दल कोणतीही कल्पना नव्हती अस सांगितलं.
Electoral bond आणण्याच्या आधी सरकारने निवडणूक संदर्भातील, उत्पन्न कर संदर्भातील आणि RBI संबंधित असणार्या कायद्यामधी बदल केला आणि मग electoral bond आणला. सुरुवातीला सरकारने मोठ मोठ्या बाता मारत देशाला सांगितले होते की
आम्ही electoral bond आणण्यापूर्वी सगळ्या समभागधारकांशी, निवडणूक आयोगाशी तसेच रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करू आणि मगच आणु परंतु आपल्या नेहमीच्या हेकेखोर स्वभावाला जागुन सरकार कोणाशीही कसलीच चर्चा न करता electoral bond घेऊन आले.
बर..या विषयाच्या खोलात जाण्यासाठी RTI कार्यकर्ते नायक
'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.
वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.
घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा
विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.
घरातला गणपती जागरूक नाही.....???
अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो.
जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???
तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.
बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत
सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या
मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या
येणार्या दोन दिवसात अदाणी ग्रुपला एकतर अप्पर किंवा लोवर सर्कीट लागेल कारण २९ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा अदाणी संदर्भात निर्णय येणार आहे.
या थ्रेडमध्ये आपण
जाॅर्ज सोरोस कोण आहेत?
OCCRP म्हणजे काय?
SEBI ने सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला अदाणी रिपोर्ट काय आहे?
'हिंडनबर्ग 2.0'?
ज्यावेळी 24 जानेवारीला 'हिंडनबर्ग'ने अदाणी ग्रुपचा रिपोर्ट बाहेर काढला होता तेव्हा अदाणी ग्रुपमध्ये काय धुर्रळा झाला ते सगळ्या जगाने पाहिले होते. कंपनी एव्हढी कोसळली की आजतागायत अदाणी ग्रुपला उभारी घेता आलेली नाहीय..
तर ज्यावेळी हिंडनबर्गने रिपोर्ट बाहेर काढला त्यावेळी 'जाॅर्ज
सोरोस' ही ९३ वर्षीय व्यक्ती पुन्हा प्रकाशात आली.
सोरोस यांच्याबद्दल सांगायचच तर मार्केटमध्ये ते Short seller म्हणुन प्रचलीत आहेत आणि त्यांना 'The man who broke the Bank Of England' म्हणुन ओळखले जाते. 16 सप्टेंबर, 1992 साली युनायटेड किंग्डमचे चलन(पाऊंड स्टर्लिंग) कोसळत असताना
आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाच जाणवायला चालु होत की "माझा मार्ग चुकलाय का? नेमकं काय चुकतय माझ्याकडुन? मलाच का वेळ लागतोय? मला हवय ते मिळेल का नाही??"
या विचारांनी तुम्ही एव्हढे त्रस्त होता की तुम्हाला झोप लागत नाही. रात्रभर विचार करत निपचित पडुन राहण्याची इच्छा होते तर पहाटे
आवर्जून जाग येते, आणि जेव्हा भल्या पहाटे जाग येते तेव्हा या नकारात्मक विचारांचे चक्र पुन्हा फिरायला चालु होते. अस वाटत की 'राव, आपल्याला आपल शरीर हे विचार येण्यासाठी मुद्दाम झोपेतुन उठवतय, रातभरपण झोपुन देत नाही..'
शेवटी आपल्या मनाची घालमेल व्हायला चालु होते, आपलं कशातच मन लागत
नाही. शांत शांत बसुन राहायला आवडत, संवाद साधण्याची इच्छा मरायला चालु होते, आपल्या लोकांसोबतही बोलणं जीवावर येत आपल्या..
अस वाटत सगळ सोडुन निघुन जावं कुठतरी शांत ठिकाणी..डोकं जड होत, मन गहिवरून येत..डोळे पाणावतात. असह्य व्हायला चालु होत सगळं..त्यात मनाच्या जखमेवरची खपली खपकन
छपरी हार्पिक दांड्याने तिलकचा फोकस हालवायचा प्रयत्न केला. तिलक 44 वर असताना बिनाकामाचं 'तुला नाॅट आऊट राहायच आहे' असली बडबड करून पांड्यानं त्याचा बॅट फ्लो थांबवला.
पांड्या स्वतः स्ट्राईकवर आल्यावर हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा प्रयत्न करायला गेला पण त्याचं नशीब चांगलं त्याचा
कॅच सुटला.
पुन्हा तिलक स्ट्राईकवर आल्यावर त्याने १ रन काढुन हार्पिकला स्ट्राईकवर आणलं आणि पुन्हा एकदा हार्पिकने हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा असफल प्रयत्न केला. स्वताला स्ट्राईक पाहिजे म्हणुन हातात असणार्या बाॅलवर तिलकला २ धावा काढण्यासाठी बोंबलायला लागला. तो हाच पांड्या होता जो
२ बाॅलपुर्वी तिलकला नाॅट आऊट राहण्याबद्दल ज्ञान पाजळत होता.
शेवटी तिलकने लायकी नसलेल्या हार्पिक दांड्याला विचारलं की "मी काय करू?? एक काढू का मोठा शाॅट मारु?" यावर निर्लज्ज हार्पिक त्याला म्हणतोय "तुला काय करायचं ते कर"..
शेवटी २० वर्षीय तिलकने वयापेक्षा जास्त प्रगल्भता दाखवुन