कसे आहे आम्हाला जातीवर आणि वैचारिक वंध्यत्व घेऊन लिहायचे आणि पसरवायचे असते.लिहणार नव्हते पण या ट्वीट ला कोट करून बहूजन समाज ने वाचावे वेगैरे लिहले आहे तर काही सत्य घटना सांगणार आहे. आम्ही डावे नाही की नुसत्या थेअर्या मांडायच्या आड ना बूड. १/११
#स्वातंत्र्यवीर_सावरकर
१) वेदोक्तबंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटीबंदी, व ७) बेटीबंदी, हे सगळे हेरून या अनिष्ट रूढी प्रथांना तोडण्यासाठी प्रयत्न करणारे कृती करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. २/११
देशबंधू चित्तरंजन दास यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी १९२५ साली सावरकरांनी दलित आणि सवर्ण यांची एकत्रित सभा रत्नागिरी च्या जुन्या विठ्ठल मंदिरात घेतली होती, तत्पूर्वी त्या मंदिर मध्ये दलितांना प्रवेश नव्हता, त्यानंतर १३ सप्टेंबर १९२९ साली विठ्ठलाच्या पायावर डोक देखील टेकले. ३/११
एखादे पारंपरिक प्राचीन मंदिर मध्ये गाभाऱ्यात दलितांना प्रवेश खुले होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती. सावरकरांनी अखिल हिंदूंसाठी पतितपावन मंदिरांची योजना आखली. भागोजी कीर मोठे कंत्राटदार होते. सावरकरांनी त्यांना विचारणा केली. या शब्दात -४/११
तुम्ही स्वतः ला पूजाअर्चा करता यावी म्हणून स्वतः साठी मंदिर बांधले मग दलितांसहित सर्वांनाच स्वहस्ते पूजा करता येईल असे ही एक मंदिर बांधून द्या. भागोजी शेठ बोलले जागा पहा आपण नवीन मंदिर बांधू. अशा पद्धतीने पतितपावन मंदिर अस्तित्वात आले. सावरकरांनी महारवाड्यातील ५/११
लोकांचे बॅण्डपथक बनवले हेतू हा होता की इतर लोकांच्या मध्ये त्यांना मिसळता यावे . त्यांना बॅण्ड चालवण्यासाठी चे प्रशिक्षण दिले गेले यामुळे लग्नसमारंभ मधील अस्पृश्यता दूर होण्यास मदत झाली. १६ नोव्हेंबर १९३० ला स्पृश्य अस्पृश्य यांचे रत्नागिरी मध्ये पहिले प्रकट सहभोजन ६/११
सावरकरांनी घडवून आणले होते. आता डिप्रेस्ड क्लासेस मिशन चे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे काय बोलले सावरकरांच्या या कार्याविषयी त्यांच्या शब्दात- अस्पृश्यता निवारणांचे काम मी आयुष्यभर करत आहे पण या स्वातंत्र्यवीरांने रत्नागिरी सारख्या सोवळ्या च्या बालेकिल्यात ७/११
सहभोजन, सहपूजन असे व्यवहार प्रकटपणे चालवले आहेत, अवघ्या सात वर्षात या निधड्या छातीच्या वीरांने जी सामाजिक क्रांती घडवली ती पाहून मी इतका प्रसन्न झालो की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांनाच द्यावे. ८/११
राष्ट्र स्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् अभ्युत्थानाय हिंदूनामयं पक्ष: प्रवर्तित:।।
हे जीवन तत्व घेऊन जगले स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🚩
या प्रसंगी मला माझ्या लहानपणीची घटना आठवली
मी एकदा सावरकर असा उल्लेख केला होता घरी तेव्हा माझ्या वडिलांनी कानफाड फोडून सांगितले ९/११
होते, स्वातंत्र्यवीर सावरकर असा उल्लेख करायचा, आपण नुसते सावरकर म्हणण्याची कुवत घेऊन आलो नाही. शेवटी इतकचं सांगेन डोळसपणे जाणूनबुजून बुध्दीभेद करून स्वातंत्र्यवीर सावरकर डाव्यांना कधीही झाकोळून टाकता येणार नाहीत. १०/११
शेवटी एकच सांगेन सत्य कधी लपत नाही. हेतूपुरस्कर काहीही पसरवून "स्वातंत्र्यसूर्य" तळपायचा थांबणार नाही.
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।🚩🙏११/११
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.