पुस्तकं काय करतात?
पुस्तकं माणसाचे निरुपद्रवी मित्र. कधीच कोणाला टाळत नाहीत. स्वत:हून इतरांकडे जात नाहीत. मानवी मैत्रीत अंतर येणे शक्य आहे. पुस्तकं अंतर देत नाही. पुस्तकं निषेध करत नाहीत. मतभेदांवर वाद करत नाहीत. जे सांगायचं आहे ते सांगतात. नामानिराळी राहतात. 1/1
#WorldBookDay
पुस्तकं काय करतात?
पुस्तकं आपली मतं इतरांवर लादत नाहीत. पुस्तकं प्रश्न निर्माण करतात. पुस्तकं उत्तरं देतात. पुस्तकं प्रश्न-उत्तराचा पाठशिवणीचा खेळ खेळतात. पुस्तकं महासत्ता तयार करतात. महासत्तेला सुरुंगही लावतात. पुस्तकं आव्हान देतात.आव्हानं स्वीकारतात. (1/2) #जागतिक_पुस्तक_दिन
पुस्तकं काय करतात?
पटले तर घ्या. नसेल तर सोडून द्या.इतका शांतपणा, संयमीपणा केवळ पुस्तकांमध्येच असू शकतो. म्हणून प्रत्येकाचा पुस्तक नावाचा एक मित्र असवा.जो दररोज प्रत्येकाच्या संपर्कात यावा. जेणेकरुन दररोज बदलणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे स्वत: अमुलाग्र बदल होत जाईल. (1/3)
पुस्तकं काय करतात?
लॉकडाऊन असो की 'एकांत' प्रत्येक वेळी पुस्तकं माणसाला नवा अनुभव देते. अनुभुतीसह. लोक सांगतात. 'माणसाला आयुष्यात दोनच गोष्टी शिकवतात. एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं'. (1/4)
#पुस्तक_दिन_2023
पुस्तकं काय करतात?
माणसांचं म्हणाल तर आपण स्वत:हून त्यांना भेटायला जातो. कधी ते स्वत:हून आपल्याला भेटायला येतात. पुस्तकांच तसं नसतं. पुस्तकांना आपण स्वत:च भेटावं लागतं. माणसांकडून शिकण्यासाठी त्यांच्याशी बोलावं लागतं. त्याचा आवाज होतो. पुस्तकांशी बोलताना आवाज होत नाही. (1/5)
पुस्तकं काय करतात?
पुस्तकं बोलतात, बोलतं करतात. स्वत: एक अवाक्षरही न काढता. पुस्तकं सतत बोलत असतात.वाचकांच्या मनात.लेखकाच्या श्वासात. #पुस्तकं मरत नाहीत. पुस्तकं मारत नाहीत. पुस्तकं कारणीभूत मात्र नक्की ठरतात.पुस्तकं इतिहास असतात.पुस्तकं वर्तमान असतात. पुस्तकं भविष्य असतात. 1/6
पुस्तकं काय करतात?
पुस्तकं बरंच काही असतात. पुस्तकं काहीच नसतात. पुस्तकं अमूल्य ठेवा असतात. पुस्तकं रद्दी असतात. अनेकांसाठी अडचण असतात. पुस्तकं असतात म्हणून पुस्तकं असतात. पुस्तकं वाचणाऱ्यांसाठी लिहिणाऱ्यांसाठी प्रेरणा असतात. (1/7)
#जागतिक_पुस्तक_दिन
#WorldBookDay2023
#जागतिकपुस्तकदिन पुस्तक दिन दररोज साजरा व्हावा. प्रत्येकाच्या घरात.माझ्यासकट आपण सर्वांनी पुस्तकं विकत घेऊन वाचावित.आपापल्या परिने जमेल तसं.शेवटी ज्ञानाची, मनोरंजनाची,जिज्ञासू वृत्तीने जाणून घेण्याची ओढ सर्वांनाच असते. म्हणूनच जिज्ञासू वृत्ती कायम ठेऊ..वाचत राहू.
#WorldBookDay
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.