, 14 tweets, 3 min read Read on Twitter
"एक होत माळीण"
मध्यरात्री झालेली माळीण घटनेची बातमी तिथं जाणाऱ्या एस.टी. चालक वाहकामुळे दुसऱ्या दिवशी प्रशासनाला समजली. दुपारपर्यंत शेजारील तालुक्यांमध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली होती. प्रशासकीय यंत्रणेची हालचाल सुरू झाली होती.
दुपारनंतर ह्या घटनेचे भीषण स्वरूप बातम्यांच्या माध्यमातून देशभर पसरले. आम्हीही मित्रपरिवार गाड्या काढून तिकडे निघालो. वाटेत वाडा-भीमाशंकर रस्त्यावर कधी नाही एवढं ट्रॅफिक लागलं. अनेक पर्यटक बाहेरून भीमाशंकरमध्ये माळीण घटना समजल्यामुळे लँड स्लाईडच्या भीतीने बाहेर पडण्यास सुरुवात
झाली होती. वाडा-भीमाशंकर मार्ग अरुंद असल्याने हे ट्रॅफिक काढून दिले नाहीतर परिस्थिती अजून अवघड बनेल ह्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परीने वाहतूक नियमनाचे काम करू लागला होता. आमचाही बराच वेळ अडकलेल्या गाड्यांना मार्ग करून देण्यात गेला. सोबतीला मुसळधार पाऊस कोसळत होताच.
NDRF चे जवान घोडेगावमार्गे रवाना झाले होते. घटनेच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अलीकडेच गाड्या लावाव्या लागत होत्या. तिथून पायपीट करत मदतकार्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पोहचवले जात होते.
खेड, आंबेगाव तालुक्यातील अनेक तरुण, पुण्यातील काही सेवाभावी संस्थांचे सदस्य मदतकार्यात
हातभार लावता येईल म्हणून संध्याकाळपर्यंत माळीण मध्ये जमा झाले होते. परंतु NDRFने त्यांच्या कार्यपद्धतीने कुणाची फारशी मदत न घेता शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करण्यास सुरुवात केली होती. पाऊस रात्रभर चालूच होता. ढिगाऱ्याखाली दबलेल्या जीवांचे जवळपासचे परिजन जमा झालेले होते.
साताऱ्यावरून अतिरिक्त पोलीस फौजफाटा जमा झालेला होता. jcbच्या बकेटने चिखल बाजूला करताना गुरढोर लागत होती. NDRF मधील एक वीरप्पन सारखी मिशी असलेला जवान मोठ्या साहसाने चिखलात जाऊन काठीने ढोसून पाहायचा चिखलात काही मृतदेह लागतोय का तळाला पाहण्यासाठी, हे सर्व पाहून घटनेची भीषणता अधिकच
जाणवत होती. मदतीसाठी जमलेले लोक ते मदतकार्य बघण्यापुरते मर्यादित झाले होते. NDRF जवान छोट्या छोट्या टीम करून नियोजनबद्ध काम करते होते. ह्या घटनेतून वाचलेल्या शाळेतील काही खोल्यांमध्ये जवानांसाठी पावसात भिजून कार्य केल्याने रिफ्रेशमेंटसाठी चहापाण्याची सोय केली गेलेली होती.
गर्दीत कुणी हुंदके देत होते, तर कुणी ह्या गावातील त्यांचा कुठला नातेवाईक घटनेअगोदर कसा बाहेरगावी गेल्याने सुदैवाने बचावला हे सांगत होत. तिथे सर्वत्र लाल चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. लावलेल्या फ्लडलाईटस मध्ये,
मध्येच एखादी वस्तू चिखलातून चमकून दिसायची ती चिखलात दबले गेलेल्या लोकांच्या घरातली भांडी होती. हिंदी मराठी बातम्यांचे पत्रकार त्यांच्या कॅमेऱ्यांसोबत तिथे दिसेल त्याचे बाईट्स घेत होते. ते वर्षोनुवर्षे इथेच राहतात की काय ह्या अभिर्भावात गावचे, झालेल्या घटनेचे वर्णन करत होते.
त्यातील काही माहिती सत्य होती तर काही त्यांनी ऐकीव स्वरूपातून गोळा केलेली. जमा झालेल्या लोकांना एव्हाना लक्षात आले होते की इथे मदतकार्य नियोजन पद्धतीने करण्यासाठी NDRF व पोलीस प्रशासन सक्षम आहे. येथील गर्दी कमी करणे हीच मदत होऊ शकेल त्यामुळे अनेक जण माघारी फिरायला
सुरुवात झाली होती. आम्हीही पहाटे 4 ते 5 दरम्यान खेडला परतलो. ह्या घटनेमुळे निसर्गाचे विदारक रूप समोर तर आलेच परंतु नंतर स्थानिक जनप्रतिनिधींनी ते गाव पुनर्निर्माण करून दिले सरकारच्या माध्यमातून.
तरी तिथे अचानक मध्यरात्री गाढ झोपेत त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली असंख्य स्वप्न, विचार घेऊन गाडले गेलेले जीव पुन्हा कधीच परतणार नव्हते. ह्या घटनेत अनेकांनी पूर्णच्या पूर्ण कुटुंब गमावून ते एका रात्रीत अनाथ झाले, काही कुटुंबांना तर मागे रडायलाही कुणी शिल्लक राहिले नव्हते.
हे सर्व कुठल्याही व्यक्तीला हादरवून सोडणार आहे. त्यामुळे त्या रात्री प्रत्यक्षात तिथे उपस्थित असून सर्व मदतकार्य सताड डोळ्याने पाहूनही, कधीच माळीण ह्या विषयावर लिहण्याचे धारिष्ट्य झाले नव्हते.
आज "एक होत माळीण" ह्या upcoming चित्रपटाचे पोस्टर पाहिल्याने ते सगळं पुन्हा डोळ्यासमोरून तराळले व लिहावं वाटलं. हे लिहत असताना आत्ताही तसाच मुसळधार पाऊस कोसळतोय.

✍️ #मार्मिक
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to मार्मिक
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!