Discover and read the best of Twitter Threads about #मार्मिक

Most recents (6)

1970 पर्यंत दरिद्री असलेल्या "कतार" देशाला "पेट्रोलियम, नॅचरल गॅस"चे घबाड सापडले. थोडक्यात त्यांनी जे स्वतः निर्माण केलं नाही ते अमेरिकन कंपन्यांच्या उत्खनन क्षमतेवर विकून पैसे कमावले. त्या देशाच्या "फिफा वर्ल्डकप" आयोजन खर्चाचे कौतुक करत, लिब्रांडू भारताला ज्ञान पाजळत आहेत.
1/7
ते लिब्रांडू 2010 मध्ये भारताने आयोजित केलेल्या (UPA सरकारच्या कृपेने, कलमाडीच्या नेतृत्वात) कॉमनवेल्थ मधील झालेल्या घोटाळ्याबाबत, साहेबांनी बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या नेऊन केलेला खेळ सोयीने विसरले. तेच लिब्रांडू खेळाला मोदींनी कसे महत्व दिले पाहिजे हे सांगतायेत.🤣
2/7
तसेच कतारने फिफाच्या आयोजन उदघाटन सोहळ्यात ज्याप्रमाणे इस्लामिक कट्टरता दर्शवणारे सोहळे आयोजित केलेत, प्रेक्षकांना शरियतनुसार अनेक बंधने घातलीत, त्या पद्धतीने भारताने कुठलं आंतरराष्ट्रीय आयोजन करून रामायणासारखे हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम केलेतर लिब्रांडूंच्या बुडाला आग लागेल.
3/7
Read 7 tweets
सध्या बॉलिवूडला उतरती कळा लागलेली आहे. हे मत एखाद दोन चित्रपट आपटल्याने तयार झालेलं मत नाहीये. तर कुठल्याच विचारधारेशी, राजकीय पक्षाशी काही देणंघेणं नसलेल्या व्यक्ती जेव्हा बॉलिवूड चित्रपटांबाबत फारसे उत्सुक दिसत नाही तेव्हा हे जाणवते. असेही नाही की लोकांकडे पैसे नाहीत.
परंतु लोकांना बॉलिवूडच्या थिल्लर चित्रपटांवर खर्च करायचा नाहीये. याबाबत प्रामुख्याने काही कारणे लक्षात घेतली तर बॉलिवूडचा हिंदुद्वेष व राष्ट्रविरोधी भावना जोपासणारे घटक कारणीभूत आहेतच. परंतु रसिक प्रेक्षक म्हणून ह्यासोबत मला अजून काही कारणे महत्वाची वाटतात.
बॉलिवूड म्हणजे एकतर उचलेगिरी किंवा अगदी चोथा झालेल्या त्याच कथानकांवर "त्याच तिकिटांवर केलेला तोच खेळ" त्यातल्या त्यात अगदी रद्दाड झालेले पन्नाशीचे हिरो व हिरोइन्स, त्यात अभिनयाचा मोठा अभाव तर आहेच आहे पण त्याची पुसटशी जाणीवही त्या कलाकारांना किंवा एकंदरीत बॉलिवूडला अजून नाही.
Read 17 tweets
#PP43

पुस्तक परिचय:

पुस्तक - प्रतिपश्चंद्र
लेखक - डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 440
किंमत रुपये - 390₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा - उत्तम Image
पुस्तक समीक्षण:
कादंबरी ची सुरुवात 2016 मध्ये म्हणजेच 21व्या शतकात होते आणि पुढे आपण 14 व्या आणि 16 व्या शतकांची सफर ह्या कादंबरीतून करतो. या तीनही शतकांचा मेळ उत्तम रीतीने लेखकाने साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे
पण त्या आधीची भारताची परिस्थिती यातून आपल्याला दिसते. बहामनी आक्रमणानंतर विजयनगरचे साम्राज्य लयाला गेले, परंतु त्या आधी विजयनगर ची अफाट संपत्ती एका रात्रीत गायब झाली होती. ती नक्की कुठे गेली? कोणालाच माहीत नाही. खूप शोध घेऊन ही तिचा काही पत्ता लागला नाही.
Read 7 tweets
सध्या जगभरात कोरोना, भारत-चीन तणाव सोबतच नव्याने चर्चेत आलेला विषय म्हणजे टर्की देशातील इस्तांबूल शहरातील हाइया सोफिया संग्रहालय, आपल्याकडे जसा राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद वाद जुना होता तसाच वाद आजही पाश्चिमेकडे "हाइया सोफिया"च्या रुपाने धगधगता आहे.
#HagiaSofia
1/n
शेकडो वर्षांपूर्वी रोमन शासकांच्या ताब्यात असलेल्या ह्या भूभागात तत्कालीन रोमन राज्याने सध्या जिथे "हाइया सोफिया" इमारत आहे तिथे लाकडी चर्च बनवले, ते तेव्हाच्या युद्धात शत्रूंकडून जाळले गेले, पुन्हा लाकडी चर्च उभारले गेले तेसुद्धा युद्धात जाळण्यात आले.
2/n
नंतरच्या रोमन राजाने त्याच जागेवर पुन्हा भव्यदिव्य दगडी बांधकामातील अस चर्च उभारले, आपण "हाइया सोफिया" वास्तू म्हणून पाहतो ती तेव्हाच उभारलेली दगडी बांधकामातील चर्च आहे. परंतु नंतरच्या काळात युरोपात "ऑटोमन साम्राज्य" उदयास आले आणि त्यांनी वेगाने विस्तारही केला.
3/n
Read 15 tweets
@OfficeofUT साहेब तुम्ही पूर्णपणे राजकीय व्यक्ती नाहीत आधीपासून म्हणून हे मनोगत मांडण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या पातळीवर उपाययोजना करताय, परंतु दिवसेंदिवस त्या कुठेतरी कमी पडतायेत हे मान्य करा तुम्ही आता कृपया, अपयश मान्य करण्यात काही कमीपणा नाही.
अपयश मान्य केलेत तर ते दूर करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेतले त्याला जनतेने जमेल तेवढे सहकार्य केले, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात पूरक असे योगदान दिले. परंतु रोज नव्याने हजारात रुग्ण वाढतायेत.
त्यामुळे ह्या क्षणाला पारंपरिक राजकारण्यांसारखे न वागता संवेदनशील व्यक्ती म्हणून जनतेसमोर येऊन सद्यस्थितीची पूर्णपणे सविस्तर कल्पना द्या. मुंबईची परस्थिती खूप हाताबाहेर गेलेली आहे. तेथील नागरिकांना वाचवण्यासाठी का होईना मनाचा मोठेपणा दाखवून खुलेपणाने केंद्राकडे मदतीची मागणी करा.
Read 15 tweets
"एक होत माळीण"
मध्यरात्री झालेली माळीण घटनेची बातमी तिथं जाणाऱ्या एस.टी. चालक वाहकामुळे दुसऱ्या दिवशी प्रशासनाला समजली. दुपारपर्यंत शेजारील तालुक्यांमध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली होती. प्रशासकीय यंत्रणेची हालचाल सुरू झाली होती.
दुपारनंतर ह्या घटनेचे भीषण स्वरूप बातम्यांच्या माध्यमातून देशभर पसरले. आम्हीही मित्रपरिवार गाड्या काढून तिकडे निघालो. वाटेत वाडा-भीमाशंकर रस्त्यावर कधी नाही एवढं ट्रॅफिक लागलं. अनेक पर्यटक बाहेरून भीमाशंकरमध्ये माळीण घटना समजल्यामुळे लँड स्लाईडच्या भीतीने बाहेर पडण्यास सुरुवात
झाली होती. वाडा-भीमाशंकर मार्ग अरुंद असल्याने हे ट्रॅफिक काढून दिले नाहीतर परिस्थिती अजून अवघड बनेल ह्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परीने वाहतूक नियमनाचे काम करू लागला होता. आमचाही बराच वेळ अडकलेल्या गाड्यांना मार्ग करून देण्यात गेला. सोबतीला मुसळधार पाऊस कोसळत होताच.
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!