वाचला असेल तर नक्की उमजेल...
तुमच्या सात पिढ्या खपल्या तरी स्वामी विवेकानंदांचे विचार तुम्ही मिटवू शकत नाही, कारण...
#SwamiVivekananda
पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत साहेबी बनलेल्या, साहेबी कल्पनांचे अनुकरण करणाऱ्या माझ्या इंग्रजाळलेल्या बांधवांनो ! तुमची मला शरम वाटते. युरोपियांच्या पायाशी बसून लाचारीने अश्रू गाळीत त्यांना विनवत असता, "हे गौरकाय देवांनो!
'येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लवकरच फळाला येणार आहे !" असा डंके पिटणाऱ्यानो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका.
इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत आसनस्थ आहे. रुधीरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे.
हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पाहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे. दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढ्य रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही. मग बिचाऱ्या मिशनरयांचा काय पाड??
पाश्चात्यांच्या पायाशी लाळ घोटणाऱ्या माझ्या देशातल्या या करंट्यांना काय करावे ? ते ओरडत आहेत : 'आम्ही अध:पतित आहोत. ' अशांना म्हटले पाहिजे:
- स्वामी विवेकानंद
(पूर्व आणि पश्चिम . समग्र वाडमय़, खंड ५)