माझ्या शेतकरी नसलेल्या बांधवांनो
शेतकरी शेतीमध्ये एका दाण्याचे हजार दाणे पिकवतो
किलोभर बियाणे पेरले तर टनभर धान्य पिकवतो
तरीही त्याला शेती परवडत नाही ?
याचंच नवल वाटतं ना तुम्हाला, आम्हालाही तेच नवल वाटत हंगाम संपल्यानंतर जेव्हा वर्षभराच्या
आयात निर्यात धोरणात मिळणारा #मलिदा हेच मुख्य कारण आहे शेतकऱ्यांच्या दुर्दशेला भारतीय शेतकऱ्यांच्या हिता ऐवजी परदेशी शेतकऱ्यांचे हित जपले जाते
भारतीय शेतकऱ्यांची तुर ५०₹ दराने खरेदी केली जाते पण परदेशी तुरीला मात्र १२०₹ दर
याचप्रमाणे सर्व शेतमालाच्या बाबतीत घडतं असते
अन्नदात्यालाच #अन्नत्याग करण्याची दुर्दैवी वेळ आपल्या देशात येते
क्रमशः