रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलं आहे -"किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब (दोष) आहे, याकरितां गड पाहून, १,२,३ दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात." १/११
पायथ्याकडून आणि माथ्यावरून सुद्धा सहजासहजी अजिबात दिसू शकणार नाही अशा पद्धतीनेच या चोर दरवाजाची योजना केलेली आहे. रामसेजच्या बालेकिल्ल्यावर जाताना डाव्या हाताला देवीचे मंदिर लागते. हे मंदिर पायथ्यापासून दिसते. ५/११
#माहिती- मनोज गुरव