Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture
Jan 28, 2020 6 tweets 5 min read Read on X
जीवाची-कामाची-जागतिक मुंबई!

मुंबई कायमच २४ तास जागी असते, (रात्रीची मुंबई म्हणजे फक्त धिंगाणा आणि दारू पिणे नव्हेच) सरकारच्या अतिशय योग्य निर्णयामुळे ती अधिकृतरित्या चालु राहील.

मी स्वत: कित्येक वर्षे रात्री-अपरात्री मुंबईत ऊपाशीपोटी फिरलोय,त्यावेळीही चहा-पाव,अंडाबुर्जी👇
इडली,राईस,बिर्याणी आणि तत्सम हातगाड्या-काही ठराविक ठिकाणे हीच काय तो पोटाला आधार असायचा.

ऐन ऊमेदीच्या काळात तर २४तास काम करत असायचो.

कधीही प्रवास,कोणत्याही वेळी,कोणत्याही मार्गे मुंबईतून निघायचे आणि कधीही परत पोहचायचे.खाण्याचे हाल तर ठरलेलेच, त्याबरोबर कपडे आणि इतर खरेदी असेल👇
कायम दुकाने बंद झाल्यामुळे त्रास सहन करायला लागायचा.

अगदी आजही मी बरेचदा एअरपोर्टवर ट्रांजिटमध्ये असताना कपडे खरेदी करतो आणि तसाच पुढच्या प्रवासाला निघतो.

काही जनरल स्टोअर्स, कपड्यांची,इतर गरजेची दुकाने,सलोन, रेस्टाॅरंट्स आणि प्रवासाची साधने चालु असणे #मराठी #म #मुंबई 👇
हे आमच्यासारख्यांसाठी नक्कीच महत्वाचे आहे.यातुन रोजगारनिर्मीती तर होईलच पण मुंबईत पर्यटन आणि ऊद्योगाच्या वेगवेगळ्या संधीही उपलब्ध होतील.

रेल्वेस्टेशन्स,बसस्थानके,विमानतळ, काॅलसेंटर्स आणि इतर बऱ्याच ठिकाणी तशीही कधी रात्र नसतेच.

तुर्तास प्रत्येकाच्या मताचा मान ठेऊन #म #रोजगार👇
मला वैयक्तिकरित्या हा अतिशय योग्य निर्णय वाटतोय.
मुंबई हे जागतिक महानगर आहे आणि असे निर्णय काळाची गरजही आहे.

महाराष्ट्र सरकारचे त्रिवार धन्यवाद!

खासकरून आदित्य ठाकरेंचे मनापासुन अभिनंदन आणि त्यांना स्तुत्य कामांसाठी अनेक आशिर्वाद.
@CMOMaharashtra @AUThackeray @OfficeofUT 👇
गृहमंत्रालय, पोलिस आणि सफाई कर्मचारी यांच्यावर आणि इतर अनेकांवर याचा अतिरिक्त ताण येईल पण लवकरच मार्ग निघो ही अपेक्षा. या नव्या प्रयोगासाठी महाराष्ट्राला शुभेच्छा आणि सर्वांचे मनापासुन आभार! @NCPspeaks @INCIndia @ShivSena @CPMumbaiPolice #रात्रीचीमुंबई #मुंबई #मराठी #म #व्यवसाय

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

Jun 29, 2024
गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालावर “सालाबाद” प्रमाणे चर्चा सुरूये.

त्यातील आकडेवारी, दरडोई उत्पन्न, एकूण कर्ज, इंफ्रास्ट्रक्चर, उर्जा, शिक्षण, इतर राज्यांशी तुलना, मॅन्यूफॅक्चरिंग-सर्व्हिस इंडस्ट्री, शेती या आणि अशा

#SaturdayThread #EconomicSurvey
१/७ Image
अनेक महत्वाच्या मुद्यांवर “विचारांच्या धारेनुसार” मत व्यक्त केली जाताहेत.

यात एक चांगली आणि सकारात्मक बाब म्हणजे वर्ल्ड “हॅपीनेस इंडेक्स” किंवा “भूकेल्या देशांची यादी” ही जशी खोटी वा बदनामीसाठीच बनवलीये असा जो नेहमीचा सूर उमटतो तसा न उमटता “जे आहे, जसे आहे तसे” या तत्वावर सर्वांनीच ही आकडेवारी स्विकारलेली दिसतेय.

त्यातील प्रत्येकाला नक्की काय बरोबर किंवा काय चूक हे ठरवायचा वैयक्तिक अधिकार आहे आणि तोच लोकशाहीचा गाभा आहे अस मानून आपण पुढे जावूया.

आता या आकडेवारीतून अनेक गोष्टी स्पष्ट दिसताहेत, बरं त्या बऱ्यापैकी ट्रांसपरंटली ठेवल्यात त्यामुळे जो कोणी हा रिपोर्ट मेंदू वापरून वाचेल त्याला वर्तमान अगदी सहज कळेल.

परंतू अशा रिपोर्ट्समधून त्या आकडेवारीपलिकडे विचार करता यायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. - “जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.”

वर्तमान आकडेवारीतून इतिहासातून झालेले बदल आपल्याला भविष्याची दिशा दाखवतात. आपल्याला फक्त त्याची नीट सांगड घालता यायला हवी.

२/७
उदाहरणादाखल आपण या रिपोर्टमधला हा एक मुद्दा पाहू -

साल १९६० मधे संपुर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या होती ३ कोटी ९५ लाख.

त्यात ग्रामिण भागात राहणारे तब्बल २ कोटी ८३ लाख आणि शहरी भागात फक्त १ कोटी ११ लाख.

आता हेच आकडे २०२३ मधे कसे आहेत पहा - महाराष्ट्राची लोकसंख्या झालीये तब्बल ११ कोटी १२ लाख.

आणि त्यात ग्रामिण भागात राहणारे ६ कोटी १५ लाख आणि शहरी भागात तब्बल ५ कोटी ८ हजार.

ही आकडेवारी फार महत्वाची आहे.

हे असं फक्त महाराष्ट्रातच घडलय का?
तर नाही. थोडंफार गुगल केलं तरी कळेल की जगभरात सगळीकडेच हा ट्रेंड आहे. आणि या प्रकारालाच “अर्बनायझेशन” असं म्हणतात.

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात हजारो लाखो वर्षात जे घडलं नाही ते औद्योगिक क्रांतीनंतर घडलंय. सोळाव्या-सतराव्या शतकात केवळ ५% आसपास असलेलं शहरीकरणाच प्रमाण आता कसलं बदललय पहा. लोकांचा ओढा हा असाच शहरांकडे वाढत जाणार आहे. जगभरात प्रचंड मोठ्या मेगा सिटीज तयार होत जाणार आहेत.

गेल्या शतकानुशतकांपासून चालत आलेला गावगाडा आता हळूहळू मागे पडलाय.

लोकसंख्यावाढीने शेतीचे पडलेले तुकडे, शेतीमालाला नसलेला भाव, (अनिश्चितता) ग्रामिण भागातली भयान बेरोजगारी, जातीवाद, भाऊबंदकी तसेच शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं शहरांकडे वळलेत, नव्हे तर इकडे रूळलेतही. कित्येक जणं तर परदेशातील विविध शहरांत जावून स्थायिक झालेत.

शहरात असलेल्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसुविधा, कामधंदे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, त्यातल्या त्यात शेतीच्या तुलनेत असलेली स्थिरता आणि सर्वात महत्वाचं पैसे हे सर्वांनाच खुणावतात.

३/७
Read 7 tweets
Feb 25, 2024
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.

हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.

काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
Read 5 tweets
Nov 18, 2023
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.

खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.

काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत

#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
Image
Image
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.

काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.

काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.

ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.

यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४
Read 14 tweets
Jul 8, 2023
एकदा का आपलं शिक्षण संपलं की आपण खऱ्या दुनियेत प्रवेश करतो. त्याला आपण सर्वच जण ‘प्रोफेशनल लाईफ’ म्हणतो.

त्यात करियर, प्रमोशन, इंन्क्रिमेंट, जॉब स्टॅबिलिटी, जॉब सॅटिसफॅक्शन, सुट्टया, आर्थिक उत्पन्न, मानसिक स्वास्थ्य, पर्सनल डेव्हलपमेंट तसेच

#SaturdayThread #BusinessDots
१/१४
पुढच्या आपल्या संपुर्ण आयुष्याचा गाडा हा काही महत्वाच्या माणसांवर अवलंबून असतो. ते म्हणजे आपले “बॉस.” बरं या मंडळींपासून कोणाचीच सुटका नसते.

खाजगी नोकरी असो की सरकारी, ट्रेनी असो वा कॅार्पोरेटमधला मोठा साहेब, किंवा छोटा-मोठा कोणताही उद्योजक, प्रत्येकालाच कोणाला ना कोणाला
२/१४
रिपोर्ट करावेच लागते.

कोणत्याही शहाण्या माणसाने यात “चांगला किंवा वाईट” असा फरक करण्याचा कदापिही प्रयत्न करू नये.

याविषयी खर तर नेहमी फार उपहासाने, तिरस्काराने किंवा चापलुसी करण्याच्या अंगानेच चर्चा होते.

त्यामुळे बहुतांश वेळा ज्यांना कॉर्पोरेटचे कल्चर माहिती नसते
३/१४
Read 14 tweets
Jan 22, 2023
एका मोठ्या मॉलच्या पार्किंगमधे गाडी लावायला गेलो.

आत एन्ट्री करताना हायवेच्या टोलनाक्यावर जशी माणसं उभी असतात अगदी तशीच भरपूर मुलं-मुली पावती फाडायली उभी होती. बरं सर्व मशीन्स ऑटोमॅटीक होत्या तरीही.

पुढे गेलो तर ॲरोमार्कींग असून जवळपास प्रत्येक
#SundayThread #यंत्रVSमानव
१/१५
टर्न वर फ्ल्युरोसेंट जॅकेट आणि हातात लाईट असलेली माणसं पार्किंगकडे जायचा रस्ता दाखवत होती.

पुढे आत जाताना सेफ्टी चेकलाही भरपूर मंडळी व संपुर्ण ॲाटोमॅटीक लिफ्टमधेही लिफ्टमन होते.

काम झाल्यावर गाडी बाहेर काढतानाही तशीच कामगारांची गर्दी. एक्झिटची वाट-ॲरो अगदी स्पष्टपणे बाहेर
२/१५
पडण्याचे मार्ग/ मार्किंग असूनही.

पुढे कॅश जमा करायला तशीच टोलनाक्यासारखी वसूलीची गर्दी.

हे सगळं पाहत असताना विचार आला ही दिवसभर अशी (तरूण) लोकं काय म्हणून हे काम करत असतील?

त्यांची या कामात काय प्रगती होणार? प्रमोशन काय मिळणार?
यांचा पगार दरसाल किती वाढणार?
या कामामुळे
३/१५
Read 15 tweets
Sep 3, 2022
अगदी छोट्या कंपनीतून थेट महाकाय मल्टीप्रॉडक्ट, मल्टिडीव्हीजनल कॉर्पोरेट कंपनीत मी कामाला लागलो. नवा जॉब, नवे लोक, नवी संस्कृती.

सगळ्या गोष्टी हळू आवाजात, शांततेत हव्या असा तिथे कटाक्ष. जास्तीतजास्त इमेल, लिखित संवाद किंवा सिस्टिमप्रमाणं काम.

#SaturdayThread #BusinessDots
१/२७
मी मात्र या सर्वांच्या अगदी उलट. ऐसपैस उठबस….दणदणीत आवाज…..

दहा वीस फुटांवरील मित्राला काय इंटरकॉम करायचा म्हणून जागेवरूनच “अरे …..ऐक ना” करून जोरात माळरानात आवाज द्यायचा तसा द्यायचो.

सगळं ॲाफीस माझ्याकडे सुरूवातीला अतिशय त्रासिक नजरेनं पहायचं. मग हसायचं. नंतर त्यांना
२/२७
ती माझी सवय कळली आणि काही जणं मग माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले.

इमेल वगैरेपेक्षा माझा जोर सरळ बोलून समोरासमोर हो की नाही करून घ्यायचं अन पुढे जायचं…

एखादी गोष्ट नाही पटली की “ओपन फोरम” मधे बिनधास्त सर्वांसमोर आपलं मत ठोकून द्यायचं. कोणाला काय वाटेल फारसा विचार नसायचा.
३/२७
Read 27 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(