Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture
Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG

Jan 28, 2020, 6 tweets

जीवाची-कामाची-जागतिक मुंबई!

मुंबई कायमच २४ तास जागी असते, (रात्रीची मुंबई म्हणजे फक्त धिंगाणा आणि दारू पिणे नव्हेच) सरकारच्या अतिशय योग्य निर्णयामुळे ती अधिकृतरित्या चालु राहील.

मी स्वत: कित्येक वर्षे रात्री-अपरात्री मुंबईत ऊपाशीपोटी फिरलोय,त्यावेळीही चहा-पाव,अंडाबुर्जी👇

इडली,राईस,बिर्याणी आणि तत्सम हातगाड्या-काही ठराविक ठिकाणे हीच काय तो पोटाला आधार असायचा.

ऐन ऊमेदीच्या काळात तर २४तास काम करत असायचो.

कधीही प्रवास,कोणत्याही वेळी,कोणत्याही मार्गे मुंबईतून निघायचे आणि कधीही परत पोहचायचे.खाण्याचे हाल तर ठरलेलेच, त्याबरोबर कपडे आणि इतर खरेदी असेल👇

कायम दुकाने बंद झाल्यामुळे त्रास सहन करायला लागायचा.

अगदी आजही मी बरेचदा एअरपोर्टवर ट्रांजिटमध्ये असताना कपडे खरेदी करतो आणि तसाच पुढच्या प्रवासाला निघतो.

काही जनरल स्टोअर्स, कपड्यांची,इतर गरजेची दुकाने,सलोन, रेस्टाॅरंट्स आणि प्रवासाची साधने चालु असणे #मराठी #म #मुंबई 👇

हे आमच्यासारख्यांसाठी नक्कीच महत्वाचे आहे.यातुन रोजगारनिर्मीती तर होईलच पण मुंबईत पर्यटन आणि ऊद्योगाच्या वेगवेगळ्या संधीही उपलब्ध होतील.

रेल्वेस्टेशन्स,बसस्थानके,विमानतळ, काॅलसेंटर्स आणि इतर बऱ्याच ठिकाणी तशीही कधी रात्र नसतेच.

तुर्तास प्रत्येकाच्या मताचा मान ठेऊन #म #रोजगार👇

मला वैयक्तिकरित्या हा अतिशय योग्य निर्णय वाटतोय.
मुंबई हे जागतिक महानगर आहे आणि असे निर्णय काळाची गरजही आहे.

महाराष्ट्र सरकारचे त्रिवार धन्यवाद!

खासकरून आदित्य ठाकरेंचे मनापासुन अभिनंदन आणि त्यांना स्तुत्य कामांसाठी अनेक आशिर्वाद.
@CMOMaharashtra @AUThackeray @OfficeofUT 👇

गृहमंत्रालय, पोलिस आणि सफाई कर्मचारी यांच्यावर आणि इतर अनेकांवर याचा अतिरिक्त ताण येईल पण लवकरच मार्ग निघो ही अपेक्षा. या नव्या प्रयोगासाठी महाराष्ट्राला शुभेच्छा आणि सर्वांचे मनापासुन आभार! @NCPspeaks @INCIndia @ShivSena @CPMumbaiPolice #रात्रीचीमुंबई #मुंबई #मराठी #म #व्यवसाय

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling