My Authors
Read all threads
मागच्या राजवटीमध्ये कुठल्या मंत्र्याच्या घरी मी गेलो नाही. पण शिक्षणमंत्र्यांच्या घरी मात्र दोन-तीन वेळा गेलो. त्याचं कारण, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न व नवी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा मला अत्यंत महत्त्वाचा वाटत होता.
त्यामुळे कुठलाही कमीपणा न घेता मी शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो, अनेक बैठका घेतल्या. पण काही उपयोग झाला नाही. प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची त्याठिकाणी आवश्यकता होती. धडा हा असा आहे... हे पुनःपुन्हा सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल... तर त्याला तो धडा शिकवावा लागतो.
प्रश्न खूप आहेत आणि ते लगेच सुटतील असे नाही. एकेकाळी मी महाराष्ट्राचा शिक्षणमंत्री होतो. शिक्षणासंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी अर्थखात्याकडे मांडल्यावर.. शक्यच नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, असं उत्तर मिळायचं. बाकी सगळं करता येतं, पैशांचं सोंग काही आणता येत नाही.
कुठेही गेले तर २००० पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही मागणी सरसकट ऐकायला मिळते. कपिल पाटील यांनी जी प्रश्नांची यादी केली आहे, त्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांप्रमाणे वेतन आणि भत्त्यासाठी अंमलबजावणी करावी ही मागणी याठिकाणी का मांडली आहे?
१९७८ साली मुख्यमंत्री म्हणून माझ्या हाती सूत्रं आल्यानंतर पहिल्या पाचांतला हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारकडे हात पसरण्याची वेळ राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर येणार नाही, अशी भूमिका होती. आता त्यातही काहीतरी गडबड केलेली दिसतेय.
सरकार ही कंटिन्यूअस प्रोसेस असते. जुन्या सरकारने जे योग्य निर्णय घेतलेले असतील त्याची अंमलबजावणी करायची नाही असे नसते. प्रशासनाचं ते सूत्रं याठिकाणी पाळलं गेलं नाही. त्यामुळेच अशी मागणी याठिकाणी केली गेली.
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सूत्रं एकदा मान्य केल्यानतंर कुठल्याही राज्यकर्त्यांची ही जबाबदारी असते की वाड्या-वस्त्यांवरील मुला-मुलींकडे जास्त लक्ष असावं. पण, याठिकाणी २० वर्षांपासूनच्या शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद करण्यासाठी अक्कल लागत नाही. चालू ठेवायला अक्कल लागते.
१३ हजार शाळा बंद होतात. एकीकडे सावित्रीबाई-जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊरावांचा आदर्श द्यायचा आणि दुसरीकडे नव्या शाळा सुरू करण्याएवजी आहेत त्या शाळा बंद करतो आहोत. इतका चुकीचा व पुढच्या पिढीला उद्ध्वस्त करणारा निर्णय आम्ही कधी घेतला नव्हता.
पाठ्यपुस्तक मंडळ सुरू झालं तेव्हा विज्ञानाचे आकर्षण नव्या पिढीला होईल, याची आम्ही काळजी घेतली. पण, अलिकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ!
माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत.
मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही लाल शाईत असते. मंत्र्यांची निळ्या शाईत असते आणि राज्यपालांची हिरव्या शाईत. आता आम्ही हिरव्या शाईचा फारसा विचार करत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून मला लाल शाईची सवय आहे आणि त्यानुसार मी या यादीत टिक केलेली आहे.
सर्वच प्रश्न काही सोडवता येणार नाहीत. शिक्षक भारतीचे कपिल पाटील, संजय राऊत यांसह बसून हे मुद्दे ठरवू, आमच्यात एकवाक्यता झाल्यावर ते मा. मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू. हे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मी पाहतोय मुख्यमंत्र्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Sharad Pawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!