My Authors
Read all threads
आज तालिबान-US मध्ये शांतता करार झाला आहे.
यामागे मोठा इतिहास आहे..
◆अमेरिका अफगाणिस्तानमध्ये का उतरला?
◆सोव्हिएतविरुद्ध अफगाणी मुजाहिद्दीन का लढत होते?
◆अमेरिकेने तालिबान निर्मितीसाठी जमीन कसून तयार केली त्याची सुरुवात कशी झाली?
या प्रश्नांची थोडक्यात ओळख करून घेऊया..
भाग १
सोव्हिएत विरुद्ध लढणाऱ्या अफगाणी बंडखोरांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव/प्रोजेक्ट हा CIA च्या इतिहासातील सगळ्यात दीर्घकालीन आणि खर्चिक प्रोजेक्ट होता. याचे दूरगामी परिणाम जागतिक राजकारणात झाले आणि आजही होत आहेत. अफगाणिस्तान मधल्या कारवायांसाठी CIAच्या मदतीने पाकिस्तानमध्ये
लष्करी प्रशिक्षण देणारी केंद्रं अमेरिकी मदतीनेच उभारली गेली होती. यातून बाहेर पडणारे अतिरेकी हे नुसतेच लढायला तयार नसत तर त्यांच्यावर कट्टर इस्लामीकरणाचे संस्कारही झालेले असायचे. त्यामुळे अफगाण मध्ये सुरू असलेले युद्ध हे इस्लाम आणि इस्लामविरोधी सोव्हिएतमध्ये सुरू आहे असा विचार
त्याच्या मनावर पक्का कोरला गेला होता. सौदीचे राष्ट्रीयत्व असलेल्या ओसामा बिन लादेनला मोठ्ठं करण्यात अमेरिकेचाही हात होता असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.
अफगाणिस्तान हा मोठमोठ्या पर्वतराशींनी वेढलेला स्थानिक टोळ्यांचा प्रदेश आहे. अफगाणवर चाल करून येणाऱ्या परकीयांवर अफगाणी लोक
त्वेषाने तुटून पडतात असा त्यांचा इतिहास आहे. भारत, पाकिस्तान, इराण, मध्य आशिया आणि चीन या देशांना जोडणारा एक लँड-लॉक देश आणि या देशांकडे जाणारे अधिकृत, अनधिकृत मार्ग हे अफगाणिस्तान मधून जातात म्हणून अफगाणचे सामरिक महत्व आहे. वर्ल्डवॉर १ आणि २ मध्ये अफगाणिस्तानने तटस्थ भूमिका
घेतली. परंतु 1973 मध्ये तरुणाईने घडवून आणलेल्या क्रांतीत राजसत्ता उलथून टाकली गेली. यावेळी सोव्हिएत व अमेरिका दोघांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्यात आले. 1979 मध्ये डाव्या विचारसरणीच्या आघाडीने सत्तांतर आणले. पण ते स्थिर राहू शकले नाहीत. सत्तेत आल्या आल्या त्यांनी सामाजिक
सुधारणेचा जोरदार प्रयत्न सुरू केला. सोव्हिएत हे निधर्मी राज्य असल्याने ते इस्लामविरोधी आहे आणि अफगाण सरकार हे त्यांच्या कलेकलेने चालते त्यामुळे अफगाणी जनतेत अशांतता पसरली. एकदा हेरात या गावात समाजसुधारणेचा भाग म्हणून महिलांना साक्षरतेच्या मोहिमेत सहभागी करून घ्यायचा प्रयत्न सुरू
असताना भडकलेल्या काही अफगाणी लोकांनी अनेक सोव्हिएत पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांना मारून टाकलं आणि त्यांच्या मृतदेहांची ओंगळवाणी परेड काढली. यामुळे भडकलेल्या सरकारने सोव्हिएतच्या मदतीने बॉम्बहल्ले घडवून आणले यात जवळजवळ 15 ते 20,000 अफगाणी मेले. इराणमध्ये क्रांती घडवून कट्टर
इस्लामी उदयास आली होती. सोव्हिएतला आता अफगाणमधला पाय पक्का करायचा होता, पण अफगाण मधील क्रांती पाहून कट्टर मूलतत्त्ववादी विचारांच्या मुसलमानांचे वर्चस्व सोव्हिएतला नको होते. पण सोव्हिएतच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे वैतागलेले काही अफगाण्यांनी बंडखोरी स्वीकारली आणि टोळ्यांच्या
स्वरूपात आक्रमक होऊ लागले. त्यामुळे सोव्हिएतने अफगाणिस्तानच्या भोवताली आपला विळखा आणखी घट्ट केला. अफगाणिस्तानमधल्या हालचालींवर अमेरिकेची बारीक नजर होतीच. सोव्हिएतविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक आक्रमक टोळ्यांना छुप्या पद्धतीने मदत करण्याचं CIA ने ठरवलं. अफगाणिस्तान सरकार आणि या
बंडखोरांचं युद्ध जितका काळ चालू राहील तितक्या काळापर्यंत सोव्हिएतला त्यांचं सैन्य अफगाण मध्ये ठेवावं लागेल आणि यात पैसा वेळ खर्ची पडून सोव्हिएत हळूहळू जर्जर होईल असा CIA चा अंदाज होता. तो खराही ठरला. अफगाणिस्तानमध्ये सरकार तसच सोव्हिएतचे सैनिक यांच्याशी गनिमी काव्याने लढायचं
तर त्यासाठी अफगाणी सीमेपलिकडून लपूनछपून हल्ले करायची क्षमता या लोकांमध्ये असणे गरजेचे होते. या बंडखोराना रसद पुरवायची तर त्यासाठी अफगाणचा शेजारी कोणीतरी यात सहभागी होणं गरजेचं होतं(कारण अफगाणिस्तान लँड-लॉक देश आहे. या कामासाठी पाकिस्तानची मदत घ्यायच अमेरिकेने ठरवलं.
या सगळ्याच्या दोनेक वर्षापूर्वी पाकिस्तानात झिया-उल-हक ने झुल्फिकार भुट्टोच्या हातून सत्ता खेचून घेऊन त्याला जेलमध्ये टाकला होता. पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात झिया-उल-हक हे नाव अत्यंत महत्वाचं कारण इतर लष्करी अधिकारी, नेते हे राजकीय महत्वकांक्षी होते पण झिया-उल-हक हे
कट्टर इस्लामवादी असल्याने त्यांची ध्येयं धार्मिक होती. झियाने अणुबॉम्ब आणि इस्लामच्या तत्वांचा प्रचार करणं सुरू केले होते. याच काळात झुल्फिकारला फासावर लटकावून टाकलं गेलं. पाकिस्तान अफगाणिस्तानबाबतीत अमेरिकेची सशर्त मदत करेल अस झियाने सांगितलं.
◆अमेरिकेने अफगाणी बंडखोरांना थेट शस्त्रास्त्रे न पुरवता ती ISI ला द्यावीत
◆एकाही अमेरिकनने अफगाणमध्ये प्रवेश करू नये व बंडखोरांशी थेट संपर्क करू नये.
◆CIA ने पुरवलेला पैसा आणि शस्त्रास्त्रे याच्या वाटपाचे काम ISI करेल.
थोडक्यात सर्व हक्क ISI कडे आले होते.
पाकिस्तान अमेरिकेच्या अफगाण कारवायांचा एक 'कॉन्ट्रॅक्टर' होता.
याकाळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले जिमी कार्टर आणि नंतर रोनाल्ड रेगन यांनी अफगाणी बंडखोरांना जाणारी रसदही वाढवली आणि पाकिस्तानला अमेरिकेच्या साम्राज्यवादाच्या प्रसारामधला महत्वाचा भागीदार म्हणून दर्जा दिला,
झियाच्या उद्योगांकडे साफ दुर्लक्ष केलं. 80 च्या दशकांत अमेरिकेने पाकिस्तानात 6 बिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम ओतली. ही रक्कम सरळ अफगाणिस्तानमध्ये जात नव्हती ती व्हाया ISI जात असल्याने झियाच्या अनुकूल बंडखोर नेत्यांच्याच पदरात रसद पोहचत. झियाचा इस्लामीकरणावर दृढ विश्वास असल्याने
कट्टर इस्लामी तत्वांवर विश्वास असणाऱ्या बंडखोर नेत्यांचीच चंगळ होती. दरम्यान आपण या 'मुजाहिद्दीन' लोकांना आणखी आर्थिक मदत केली आणि इतर सहाय्य केलं तर हे लोक अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएतला नमवू शकतील असं रेगन प्रशासनाला वाटे. यात सौदीचीही मदत घेतली गेली. सौदी आणि पाकिस्तान यांची
मैत्री आधीपासून आहे. पाकिस्तानमध्ये स्थानिक लोकांना आणि अफगाणमधून तिथे आलेल्या निर्वासितांना धार्मिक शिक्षण देणारे मदरसे उघडण्यासाठी सौदी आर्थिक मदत करत होता, कट्टर इस्लामी विचारसरणी तिथल्या जनरेशनमध्ये पक्की रुजावी म्हणून हजारो मुल्ला, कुराणचे तज्ञ, धार्मिक शिक्षक पाकमध्ये
धाडले होते. याच्या मोबदल्यात पाकने सौदीच्या शाही कुटुंबाच्या रक्षणासाठी पाक सैनिक तिकडे पाठवले जात होते. स्वतः झियाने सौदीच्या सैन्याला प्रशिक्षणही दिले होते. यात अमेरिकेला पाकिस्तान आणि सौदीशी काही घेणं-देणं नव्हतं, त्यांना फक्त आशियातील साम्यवादाला आळा बसावा आणि ते सौदी-पाकच्या
मदतीने शक्य आहे हे माहिती होतं. सौदीच्या तेलाकडेही अमेरिका आकर्षित झाला होता, त्यावेळी रेगनने अफगाणमध्ये मदत करण्याची सौदीला मागणी केली. आपल्या मित्राचं(झिया) स्थान पक्क करणं, इस्लामिक मूलतत्त्ववाद आशियात रुजविणे सोप्प होईल म्हणून अमेरिकेची साथ सौदीला हवी होतीच. यासगळ्यात
1986साली सोव्हिएत अध्यक्ष गोर्बाचेव्हने अफगाणमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. 88मध्ये झियाचा विमानअपघातात मृत्यू झाला पण पाकिस्तानचे अफगाण राजकारणात महत्व अत्यंत वाढले होते, अफगाणिस्तानमध्ये इथून पुढे काय झाले पाहिजे या निर्णयावर पाकची पूर्ण पकड होती. 89पर्यंत सर्व
सोव्हिएत अफगाणमधून बाहेर पडली आणि याचा दुष्परिणाम म्हणून सोव्हिएत तुटली, अमेरिकेला साम्यवादावर झालेल्या विजयाचा आनंद झाला. पण यात अमेरिकेचा अफगाणिस्तानमधील इंटरेस्ट कमी झाला, पाकिस्तानने अफगाणमधून पाकमध्ये आलेल्या निर्वासित मुलांना इस्लामच कट्टर प्रशिक्षण देऊन, लष्करी
प्रशिक्षण द्यायचा कार्यक्रम जोरात सुरू केला. असा विद्यार्थी धर्माचं शिक्षण घेत असल्यामुळे त्याला उर्दू भाषेतल्या अर्थनुसार 'तालिब' म्हणलं जातं.. अर्थातच या मुलांच्या संघटनेला "तालिबान" नाव पडलं..
हे झालं तालिबान्यांचा उगम आणि त्यामागची पार्श्वभूमी...पुढच्या भागात बघूया या शांतता करार आणि भारत-अफगाणिस्तान-पाकिस्तान त्रिशंकू आणि त्यांच्या अंतर्गत राजकारणाविषयी...

#IRmarathi
#अफगाणिस्तान
संदर्भ: गिरीश कुबेर लिखित पुस्तकं..
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Anannya

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!