चीनमध्ये शोध लागलेल्या आणि सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे नामकरण कोविड १९ असे करण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये साथ सुरू होण्याआधी नवा कोरोना विषाणू आणि त्यासंबंधीच्या साथीची कोणतीही नोंद नव्हती.
या आजाराची प्रमुख आणि सर्वसाधारण लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांमध्ये अंगावर चट्टे उठणे, अंगदुखी, नाक चोंदणे, वाहते नाक, घसा खवखवणे, अतिसार आदी लक्षणेही दिसून येतात. या लक्षणांची तीव्रता एकाएकी वाढत नाही.
कोविड १९ हा आजार नव्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून इतरांमध्ये पसरतो. कोविड १९ आजार झालेल्या व्यक्तीच्या नाक आणि तोंडातून उडणारे विषाणूयुक्त शिंतोडे (खोकणे, शिंकणे आदी क्रियांमधून) कोणत्याही वस्तूवर, पृष्ठभागावर पडले...
तशी शक्यता कमी असली तरी नाकारता येत नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संसर्गित व्यक्तीच्या श्वासनलिकेतील द्रवामध्ये विषाणू असून..
काही मोजक्या उदाहरणांमध्ये शास्त्रज्ञांना रुग्णांच्या विष्ठेमध्ये नव्या कोरोना विषाणूचे अस्तित्व दिसून आले आहे. मात्र, सध्याच्या आजाराचा प्रसार प्रामुख्याने श्वासनलिकेशी संबंधित आहे.
नव्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात आणि आपल्या देशात, राज्यात कोठे झाला आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणी जाणे टाळावे.
शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा आणि आपल्या सोबतचे इतरही सर्वजण तसे करतील याची खबरदारी घ्यावी.
परदेश प्रवासातून परत आलेल्या सर्वांनीच काही दिवस स्वतःला इतरांपासून विलग करून ठेवावे. या दरम्यान सौम्य ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी.
आपण नेमके कोठे आहात यावर कोविड १९ चा संसर्ग होऊ शकतो की नाही ते प्रामुख्याने अवलंबून आहे. ज्या प्रदेशांमध्ये साथ सुरू आहे त्या भागात आपण जाणार असाल तर आपल्याला या आजाराचा धोका असू शकतो.
लहान मुले, तरुण यांना या आजाराचा विशेष धोका नाही. सध्या संसर्ग झालेल्या पाचपैकी एका व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयाची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
कोविड आजाराबद्दल अद्याप पूर्ण संशोधन झालेले नाही.मात्र वयस्कर व्यक्ती, गंभीर आजाराची(उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर) पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना कोविड१९ मुळे श्वासनलिकेशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
नाही. कोविड १९ हा आजार नव्या कोरोना विषाणूमुळे होतो. अँटीबायोटिक हे जिवाणूच्या (बॅक्टेरिया) संसर्गासाठी वापरण्यात येते.
हा नवा आजार असल्यामुळे अद्याप त्यावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यावर जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. काही लशींच्या चाचण्याही सुरू आहेत. संसर्ग झाल्यावर दिसणाऱ्या लक्षणांवर उपाय केले जातात.
नाही. कोविड १९ साठी कारणीभूत ठरणारा विषाणू आणि २००३ मध्ये आलेल्या सार्स या आजाराचा विषाणू हे एकमेकांशी जनुकीय नाते सांगत असले तरी ते एक नाहीत. या दोन्ही आजारांची वैशिष्ट्येही वेगवेगळी आहेत.
निरोगी असाल, तर मास्कची आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये कोविड १९ची लक्षणे (ताप, सर्दी, खोकला) दिसत असल्यास मास्क वापरावा. तोही आपल्याकडून इतरांमध्ये आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी.
आपल्या शरीरात विषाणूने प्रवेश केल्यापासून आपल्याला कोविड १९ आजाराची लक्षणे दिसण्यापर्यंतच्या कालावधीला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. सर्वसाधारणपणे हा कालावधी एक ते १४ दिवस इतका आहे. बहुतांश केसेस मध्ये हा कालावधी पाच दिवसांचा आहे.
कोरोना प्रकारातले विषाणू हे सर्वसाधारणपणे प्राण्यांमध्ये आढळून येतात. हा विषाणू जसा माणसाकडून माणसाकडे प्रसारीत होतो, तसा तो प्राण्याकडून माणसाकडेही प्रसारीत होऊ शकतो.
नाही. पाळीव प्राण्यांना हा आजार झाल्याचे आणि त्यांच्यापासून हा आजार माणसात आल्याचे कोणतेही उदाहरण नाही.
कोविड १९ साठी कारणीभूत ठरणारा नवा कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किती काळ तग धरून राहू शकतो या बाबत अद्याप नेमके निष्कर्ष उपलब्ध नाहीत.
कोविड १९ ने आजारी असणाऱ्या व्यक्तीकडूनच वस्तू हाताळली जाऊन ती आपल्यापर्यंत येणे ही अत्यंत दुर्मिळ शक्यता आहे.
खालील बाबींमुळे कोविड १९ हा आजार होणार नाही असे नाही. मात्र, त्याचे परिणाम बरेच कमी करता येऊ शकतात.
धूम्रपान करणे टाळावे
एकावर एक लावलेले मास्क टाळावेत
अँटिबायोटिक घेणे टाळावे
sanshodhan.in