Ph.D Appeared
D.Ed. B.Ed. M.Ed.
Double Graduate
Double Post Graduate
D.S.M.
Both TET and TAIT qualified
CBSE UGC NET qualified
अन्यायाविरुद्ध संघर्ष करून न्याय मिळविण्यासाठी लढण्याची आवड.
म्हणूनच रखडलेली शिक्षकभरती चालू होण्यासाठी व पूर्ण व्हावी म्हणून 2 वर्षे तीव्र संघर्ष केला.
(अनेकवेळा मुख्यमंत्री..शिक्षणमंत्री.. अनेक आमदार खासदार यांच्या भेटी घेतल्या.
अनेक TV चॅनल्स व न्युज पेपर मध्ये सद्यशिक्षणस्थिती व शिक्षकभरती याबाबत ठाम भूमिका मांडत आले आहे.
🛑11 दिवसांचे अन्नत्याग उपोषण करून सरकारला तात्काळ शिक्षकांच्या रिक्त जागा भरायला भाग पाडले)
शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित बदलांबाबत फक्त बोलायचं नाही तर प्रत्यक्ष करून दाखवायचे या निश्चयानेच शिक्षण क्षेत्र निवडले आहे.
या जगातील महिलांबाबतचे अजूनही समजले जाणारे व त्यानुसार महिलांना वागणूक देणारे महिलांचे दुय्यम स्थान बदलायचे आहे.
पुरुष व महिला दोन्हीही प्रथमच स्थानावर असायला हवेत.
एकादी निषेधार्ह घटना महिलेबाबत घडून गेल्यावर कारवाई करण्यापेक्षा कोणत्याच महिलेबाबत अघटित घडू नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजले जावेत व त्यात नैतिक मूल्यांचा व कायद्याचा धाक प्रमुख असेल.
प्रत्येक स्त्रीमध्ये एक अंतर्भूत दिव्य शक्ती असते जी अनेक अशक्य गोष्टी स्वसामर्थ्याने शक्य करून दाखविते.