#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य #मराठी
24 मार्च 2015 रोजी सुप्रिम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विशेषतः इंटरनेट माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासंदर्भात एक लँडमार्क असा निर्णय दिला होता.इंटरनेट आणि त्याद्वारे व्यक्त होण्याचा अधिकार याबाबतीत हा निर्णय अत्यंत महत्वाचा होता-आहे!
आयटी ऍक्ट,2000 हा कायदा सायबर क्राईम आणि इंटरनेट रेग्युलेशन यासंदर्भात मुख्य कायदा आहे. या कायद्यात 2009 साली दुरुस्ती करून नवीन सेक्शन 66A समाविष्ट करण्यात आलं. या सेक्शन 66Aच्या तरतुदी हा मूळ वादाचा विषय आहे. याचं थोडक्यात स्वरूप म्हणजे 66A या कलमानुसार संगणक-इंटरनेट अश्या...
माध्यमातून घोर आपत्तीजनक किंवा धमकीवजा माहिती पसरवणे तसेच दुसऱ्याला त्रास देने,गैरसोय करणे,अडथळा निर्माण करणे,अपमान करणे,इजा पोहचवणे,शत्रुत्व,द्वेष निर्माण करणे,गुन्ह्यास प्रवृत्त करणे ई. हेतूंनी कुठलीही माहिती प्रसारित केल्यास पोलिसांना 66A कलमाखाली गुन्हा नोंद करण्याचा....
अधिकार होता..यात तीन वर्षांपर्यंतची शिक्षा व दंड अशी तरतूद होती. या कलमानुसार पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले होते. पोलिसांच्या कारवाईवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत होते. श्रेया सिंघल या दिल्लीत लॉ शिकणाऱ्या विद्यार्थीनीने व इतर अनेकांनी हे कलम 66A असंवैधानीक...
असल्यासाचे सांगत ते रद्द करावे म्हणून सुप्रिम कोर्टात याचिका केल्या होत्या. जस्टीस चलमेश्वर व जस्टीस नरिमन यांच्या बेंच समोर यावर सुनावणी झाली. याचिका कर्त्यांचा युक्तिवाद होता कि अनुच्छेद 19(1)(a) नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा हक्क आहे आणि सरकार त्यावर वाजवी निर्बंध....
घालू शकतं पण त्याचे विशिष्ट आधार घटनेत नमूद केलेले आहेत. या आधारावरच अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर बंधन घातले जाऊ शकते. सरकारचा युक्तिवाद होता कि कायदेमंडळ लोकांच्या गरजा ओळखून योग्य काम करत असतं, जोपर्यंत मूलभूत हक्कांचं थेट उल्लंघन होत नाही तोपर्यंत कोर्टाने यात हस्तक्षेप करू नये.
जस्टीस नरीमन यांनी लिहिलेल्या निर्णयात कोर्टाने सुरुवातीलाच असे म्हंटले आहे कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कुठल्याही लोकशाही संस्थेचा मूलभूत पाया आहे. पुढे कोर्टाने असे म्हंटले आहे कि अनुच्छेद 19,1,(a) नुसार भाषण व अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य आहे, सरकार यांवर वाजवी निर्बंध...
घालणारे कायदे बनवू शकतं पण त्याचे आधार 19(2) मधे स्पष्ट दिलेले आहेत. ते म्हणजे
1- देशाचे सार्वभौमत्व व अखंडतता 2- राज्यांचे संरक्षण 3- परकीय देशांशी मित्रसंबंध
4-सार्वजनिक सुव्यवस्था 5- सभ्यता व नीतिमत्ता 6- न्यायालयाचा अवमान 7- अभ्रूनुकसान
8-गुन्ह्यास चिथावणी
वरील आठ कारणांच्या आधारे केलेल्या कायद्याद्वारेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर बंधन घातले जाऊ शकते, इतर कुठल्याही कारणासाठी असे करता येणार नाही. यानंतर कोर्टाने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या तीन मूलभूत संकल्पनांचा विचार केला आहे. चर्चा, पुरस्कार आणि चिथावणी. कोर्टाच्या मते कुठल्याही अप्रिय
गोष्टीची किंवा कृत्याची केवळ चर्चा किंवा पुरस्कार हा 19(1) अंतर्गत स्वातंत्र्याचा भाग आहे, एखाद्या गोष्टीची चर्चा किंवा पुरस्कार हे चिथावणी देणारे असेल तेव्हाच त्यावर कायद्याद्वारे बंधन घातले जाऊ शकते! सार्वजनीक सुव्यवस्था याबाबतीत विचार करताना कोर्टाने असे नमूद केले आहे कि...
सेक्शन 66A त्याच्या तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही माहीतीसाठी लोकांना टार्गेट करू शकतो. इथे माहिती कुणाला पाठवलीये हे महत्वाचे नाहीये तसेच माहिती एकाला व्यक्तीला पाठवलीये कि असंख्य व्यक्तिंना पाठवलीये यात देखील फरक करण्यात आलेला नाहीये. पाठवण्यात आलेल्या माहिती मधे सार्वजनिक..
सुव्यवस्था भंग होईल असा मेसेज किंवा माहिती आणि त्याद्वारे होऊ शकणाऱ्या घटना याबाबतीत स्पष्ट तरतुदी केलेल्या नाहीयेत.त्यामुळे 66Aचा सार्वजनिक सुव्यवस्थेशी जवळचा संबंध येत नाही.
66A चा अपराधास चिथावणी याच्याशी देखील संबंध नाही. केवळ चर्चा किंवा एखाद्या दृष्टीकोनाचा केवळ पुरस्कार..
म्हणजे चिथावणी असे असू शकत नाही.
पुढे कोर्टाने कायद्याच्या अस्पष्टतेचा मुद्दा मांडला आहे. कोर्टाच्या मते कायद्यात गुन्ह्यांची व्याख्या सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. सामान्य लोकांना कायदेशीर-बेकायदेशीर यातला फरक कळणे गरजेचे आहे. पोलीसांना देखील कुठला गुन्हा झाला आहे याची संपूर्ण...
माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून मनमानी किंवा भेदभाव होणार नाही. 66A मधे वापरण्यात आलेल्या संज्ञा/टर्म्स यांची स्पष्ट व मर्यादित अशी व्याख्या देण्यात आलेली नाही. त्यामुळे 66A ला एकप्रकारे अमर्याद असे स्वरूप प्राप्त होते ज्यामधे सामान्य स्वरूपाची माहिती देखील येऊ शकते.
यात चर्चा,पुरस्कार आणि चिथावणी यातील फरक करण्यात आलेला नाही. विशिष्ट माहिती एखाद्याला आपत्तीजनक वाटू शकते, दुसऱ्याला कदाचीत वाटणार नाही. एखादा आधुनिक विचार विशिष्ट गटाला आपत्तीजनक वाटू शकतो. 66A मधल्या संज्ञा ची स्पष्टपणे व्याख्या दिली गेली नसल्यामुळे त्यात एकप्रकारे योग्य...
माहितीचा देखील समाविष्ट होऊ शकतो. स्पष्टता नसल्यामुळे 66A अंतर्गत कुठल्याही विषयावरील कुठलंही मत किंवा वर्तमान चालीरितीं विरोधातील कुठलंही गांभीर्यपूर्वक मांडलेलं मत देखील गुन्हा ठरू शकत. यामुळे सेक्शन 66A अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकराला मारक आहे.
अशा प्रकारे सेक्शन 66A अभिव्यक्ती स्वातंत्र्यशी सबंधित अनुच्छेद 19(2) मधील आठ अपवादांशी जवळचा संबंध दाखवु न शकल्यामुळे तसेच त्याच्या अस्पष्ट व अमर्यादित स्वरूपामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते म्हणून सुप्रिम कोर्टाने सेक्शन 66A घटनाबाह्य असल्याचे नमूद करत रद्द केले !!
सोशल माध्यमावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यामधे हा निर्णय निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरलेला आहे 🙏🏻
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. सर्व बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या सर्व चर्चेच्या पलीकडे जाऊन काही तथ्यात्मक गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम आरक्षण कुणाला दिले जाते ? आपल्या घटनेच्या अनु.15(4) मधे तरतूद आहे कि सरकार सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग तसेच SC-ST यांच्यासाठी विशेष तरतुदी करू शकते. याअंतर्गत या मागास घटकांसाठी शैक्षणिक आरक्षण व शिष्यवृत्ती ई. सवलती सरकार देत असते.
अनु.16(4) मध्ये तरतूद आहे कि ज्या मागासवर्गीय घटकांना 'पुरेसे प्रतिनिधित्व' नाही अश्यांसाठी नियुक्ती मधे आरक्षण दिले जाऊ शकते म्हणजेच सरकारी नोकरीतील आरक्षण.
ह्या दोन अनुच्छेदावरुन एक गोष्ट लक्षात येते कि आरक्षण देण्यासाठी एखादा समाज हा सामाजिक-शैक्षणिक दृष्टीने मागास..
गेल्या आठवड्यात ओरिसा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस एस.मुरलीधर निवृत्त झाले. गेल्या वर्षी निवृत्त झालेले जस्टीस अखिल कुरेशी आणि आता एस.मुरलीधर यांना जी वागणूक मिळाली ती न्यायपालिकेची दननीय अवस्था आणि चिंताजनक भविष्य अधोरेखित करणारी आहे.
जस्टीस मुरलीधर मे 2010 मधे दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश म्हणुन नियुक्त झाले होते. दिल्ली उच्च न्यायालयातील कार्यकाळात त्यांनी अनेक उल्लेखनीय असे निर्णय दिले. ज्यात समलैंगिकता गुन्हा ठरवणारा कलम 377 रद्द करणारा नाझ फाऊंडेशन निर्णय
सरन्यायाधीशांवर RTI कायदा लागू करणारा निर्णय, हाशिमपूरा हत्याकांड प्रकरणी दोषी पोलिसांना कठोर शिक्षा देणारा निर्णय अश्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.
अर्बन नक्षल प्रकरणी अटक केलेल्या गौतम नवलखा यांना जामीन दिल्यामुळे त्यांच्यावर सरकार समर्थक लोकांकडून
केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचा अजून एक निर्णय बदलण्याचा प्रयत्न..
सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान,लोकसभेतील विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीश यांची समिती करेल असा निर्णय दिला होता.
केंद्र सरकारद्वारे प्रस्तावित विधेयकात मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते व एक कॅबिनेट मंत्री यांची समिती करेल अशी तरतूद केलेली आहे. सरन्यायाधीशांचा समावेश यातून वगळण्यात आलेला आहे.
पंतप्रधान, विरोधीपक्षनेते व कॅबिनेट मंत्री या तीन जणांच्या समितीत दोन सदस्य हे सरकारमधील असतील म्हणजेच बहूमतात असतील. अश्या समितीत विरोधीपक्ष नेत्याच्या मताला काहीही महत्व नसेल कारण निर्णय बहुमताने होईल. म्हणजेच सरकारला अपेक्षित तीच निवड केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी EDचे संचालक SK मिश्रा यांना दिलेली तिसरी मुदतवाढ रद्द केली. मात्र सरकारने CVC ऍक्ट व DPSE ऍक्ट मधे केलेले बदल वैध ठरवले ज्याचे संभाव्य विपरीत परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे...
ED हि संस्था मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा (PMLA) व परकीय चलन कायदा(FEMA) या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक गुह्यांचा तपास करणारी संस्था आहे. तर CBI हि DPSE ऍक्ट 1946 अंतर्गत स्थापन झालेली तपास संस्था आहे जी भ्रष्टाचाराच्या प्रकारणासोबतच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करते.
1997 साली CBI मधे वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर विनीत नारायण यांनी एक याचिका दाखल केली होती. याप्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने CBIमधील सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी व स्वायत्तता राखण्यासाठी अनेक निर्देश दिले होते ज्यात
दहा दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सनदी सेवांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असेल असा निर्णय दिला होता. काल एका अध्यादेशाद्वारे केंद्र सरकारने हा निर्णय बदलून टाकला आहे. याबद्दल सविस्तर -
आपले संविधान तयार करताना आपण संघराज्य पद्धत स्वीकारली ज्यात केंद्र सरकार व राज्य सरकार असे दोन मुख्य थर आहेत. सुरुवातीला राज्यांचे वर्गीकरण A-to-D चार गटात केले होते. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी नंतर 7व्या घटनादुरुस्ती द्वारे राज्य व केंद्रशासित प्रदेश अशी विभागणी केली गेली
1991 साली 69वी घटनादुरुस्ती करण्यात आली व घटनेत 239AA हा नवीन अनुच्छेद जोडण्यात आला. याद्वारे तरतुद करण्यात आली कि दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असेल जिथे विधिमंडळ सभागृह असेल व सार्वजनिक सुव्यवस्था,पोलीस,भूमी हे विषय वगळता इतर विषयांचे अधिकार दिल्ली राज्य सरकारला असतील.
महाराष्ट्र सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काही बाबतीत अपेक्षित होता. अपात्रतेचा प्रश्न स्पिकरकडे देणे आणि ठाकरे सरकार पूर्ववत करण्याबाबत असमर्थता या गोष्टी सुनावणीत दिसून आल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे महत्व आणि परिणाम हे वर्तमानासोबतच भविष्याच्या दृष्टीने अधिक महत्वाचे असते. सर्वोच्च न्यायालयाचा बोंमाई निर्णय याचे उत्तम उदाहरण आहे. 1950-90 पर्यंत देशात केंद्र सरकार द्वारे राष्ट्रपती राजवटीचा येथेच्छ दुरुपयोग केला गेला.
1988 साली कर्नाटकातील तत्कालीन बोमाई सरकारवर राष्ट्रपती राजवट लावली गेली. त्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय सहा वर्षानंतर आला. त्याचा बोमाई यांना काहीही फायदा झाला नसला तरी या निर्णयामुळे राष्ट्रपती राजवट लादण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले दिसून येते.