सोनिया गांधींवर केलेली वैयक्तिक टीका झोंबली म्हणून अर्णबच्या वडिलांवर - जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत - घसरणाऱ्या लोकांकडून हा प्रश्न येतोय. कुणाची याहून केविलवाणी बुद्धिक कुवत असेल काय? +
"अर्णबच नाही, त्याच्यासारख्या इतरांची पण हीच गत व्हायला हवी" असं म्हणत "त्या इतरांची" नावं असणारी यादी व्हायरल होतीये.
अर्णब "हेट मॉन्गर" असल्याचं जजमेन्ट ठोकून +
आणि या सर्व गदारोळात अर्णबवरील हल्ल्याचा नि हल्ल्याचं समर्थन करणाऱ्यांचा निषेध केला तर फक्त एकच सवाल विचारला जातोय.
"अर्णबच्या पत्रकारितेचं समर्थन करताच कसं?"
स्वतःला उघडपणे भक्त म्हणणारे कित्येक लोक आहेत, +
तुम्ही मला रवीश कुमार आणि कुमार केतकर आणि बरखा दत्त आणि निखिल वागळे आणि इतरांच्या दुटप्पी, खोटारड्या प्रोपागंडाचा विरोध करणारा एक माणूस दाखवा पु गॅंगमध्ये.
नाही दाखवू शकणार तुम्ही. +
बरखा दत्त सारखी बाई तिची लॉबीज मधली मिडल-मनची भूमिका पार पडायला "मोदींना आम्हाला फुकट फॉरेन ट्रिप्सवर न्यायचं नसेल तर ठीकाय, आम्ही पैसे देऊ पण त्यांच्या मिनिस्टर्स आणि टीम बरोबर विमानात घेऊन जायला हवं" +
आजन्म शिवसेनेवर दात ओठ खाणारे वागळे, भाजप-सेनेचं युद्ध सुरु झाल्या झाल्या "शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे...दिल्लीतल्या पत्रकारांना हे माहिती नाहीये" असा गोड गोंडस शोध लावतात. वागळे कशाला! अख्खं पुरोगामी विश्व +
निडवणूक घडत असताना आपल्या संपादकीय जागेचा नीच लाभ साक्षात कुमार केतकर काँग्रेसला मिळवून देतात. उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आहे हे.
रवीश कुमारच्या एका मागे एक प्रोपागंडा कार्यक्रमांची यादीच देता येईल. +
हे सगळे महात्मे सोडा.
कोण कुणी फुटकळ ट्रोल एखाद्या सेल्फ प्रोक्लेम्ड फेमिनिस्टला ट्विटरवर रेपची धमकी देतो, आणि समस्त लिबरल नाझी गॅंग पराकोटीच्या किंकाळ्या फोडत, छात्या पिटत, +
इथे अर्णबवर हल्ला झाला आहे. ख रा ख रा हल्ला. त्याची पत्नी त्या गाडीत असताना हल्ला झालाय.
इथे अर्णब "चांगला" पत्रकार आहे की नाही - हे महत्वाचं का ठरावं? +
कुठे जातं हे तत्वज्ञान नेहेमी?
उत्तर प्रदेशात गाईंना देव मानतात लोक. शिवाय त्यावर आपली उपजीविका चालवतात. +
त्यावेळी काय काय बोलता हो तुम्ही?
तेव्हा कोणता "रंग" देता त्या प्रसंगाला? +
मग हिंदू संतांचा कोल्ड ब्लडेड खून पडल्यावर जर अर्णब टोकाची भूमिका घेत असेल -
तर -
प्लिज टेल मी -
तुमच्यात आणि त्याच्यात नेमका काय फरक आहे? +
मग सोशल मीडिया पोस्ट्समुळे पाठीवर व्रणांचं जाळं ओढणाऱ्या +
इथे प्रॉब्लम अर्णब - रवीश नाही.
तुम्ही आहात.
हो - अर्णब एक आदर्श पत्रकार नाही. आक्रस्ताळा आहे. चला पेड पण असेल. काल तर फारच चुकीचं बोलला. So what? तर काय? "त्याला अद्दल घडायलाच हवी!" हे म्हणणार तुम्ही? +
हा मुद्दा भाजप - काँग्रेस, अर्णब - रवीश नाहीच.
हा मुद्दा तुमच्या दांभिकतेचा आहे. +
आणि तुम्हाला उघडं पाडणं अत्यंत आवश्यक आहे.
अर्णबवर झालेल्या हल्ल्यावर काय करायचं हे अर्णब नि त्याचं नेटवर्क, कायदा, पोलीस केस,कोर्ट - बघून घेतील.
आणि +
जेव्हा जेव्हा "अर्णबच्या पत्रकारितेचं समर्थन करताच कसं?" छाप प्रश्न विचाराल - तेव्हा तेव्हा तुम्हाला उघडं पाडू.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com