"आता तरी एकत्र या" हे आवाहन प्रामाणिक आहे याबद्दल शंका नाही. +
हा प्रश्न कुत्सित नाही. छद्मी नाही. +
प्रामाणिक प्रश्न आहे हा.
पालघरला घडलं ते नवं नाही. वेगवेगळ्या प्रकारे हे आघात होत असतात. कुरमुसे प्रकरण काय, पालघर काय...माध्यमं, तथाकथित विचारवंत नेहेमीच या गोष्टी दाबतात. माध्यमं या बाबतींत तिखट प्रश्न विचारत नाहीत - +
आपल्याकडे ज्युडिशियल अॅक्टीव्हीजम, ह्युमन राईट्स अॅक्टीव्हीजम, शोध पत्रकारिता घडतच नाही का? +
काय घडलं या ५ वर्षांत?
म्हणजे, - +
हिंदुत्ववाद्यांना "आपलं" वाटणारं सरकार सत्तेत असताना तरी इक्विलीब्रियम प्रस्थापित झाला का? ५ वर्षात होण्याची अपेक्षा अवाजवी वाटत असेल तर रिझल्ट सोडा - त्या दिशेने पावलं तरी पडली का? +
इतरांचं सोडा, माझ्यापुरता प्रश्न विचारतो.
माझ्यासारख्या संविधानप्रेमी, सेक्युलर, हिंदू भारतीयाने जर कम्युनिझम, इस्लाम आणि मिशनरी - या संकटाशी लढण्याचा विचार सुरु केला - तर - +
कारण फेसबुक-ट्विटरवर मारामाऱ्या करून काहीही होणार नाही याची व्यवस्थित कल्पना आहे मला. ऑन ग्राऊंड अॅक्टिव्हीजम आवश्यक आहे. कोर्ट कचेरी करावी लागणार. ह्युमन राईट्स आंदोलनं करावे लागणार. +
माझी तयारी आहे हे करण्याची.
इन ऑल प्रोबॅबिलिटी, माझ्यापेक्षा अनुभवी, वरिष्ठ लोक ही याच तयारीत आहेत. कदाचित करत ही असावेत. पण त्याचे रिझल्ट्स दिसत नाहीयेत.
म्हणून मी कन्फ्युज्ड आहे. +
म्हणजे, हिंदुत्ववादी संघटनांची अशी फळी ऑलरेडी कार्यरत आहे, ऑलरेडी हे युद्ध सुरु आहे व मला त्याची कल्पना नाही - ही शक्यता देखील मी नाकारत नाही. फक्त नम्रपणे इतकंच नमूद करतो की - +
सेनापती युद्ध लढतोय - हे माहितच नसेल तर सैन्य कुठून जमणार?
सैन्याला त्या युद्धाची कल्पना देणं आवश्यक आहे. व्हिजन दाखवणं आवश्यक आहे. +
त्यांनी ते दाखवावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com