कुणी, आमदारकी देता का रे? आमदारकी?
एका वाघाला कुणी आमदारकी देता का?
एक वाघोबा विधानसभे वाचून,
परिषदे वाचून,
मावशीच्या माये वाचून,
काकाच्या दये वाचून,
गल्ली ते दिल्ली हिंडत आहे.
(1/4)
अशी आमदारकी ढूंढत आहे,
कुणी, आमदारकी देता का रे? आमदारकी?
खरंच सांगतो बाबांनो
वाघोबा आता थकून गेलाय,
आघाडीच्या राजकारणात,
अर्धा-अधिक तुटून गेलाय,
हाताच्या बोटावरती,
घड्याळ्याच्या काट्यावरती,
सगळे निर्णय घेऊन घेऊन,
वाघोबा आता थकलाय.
(2/4)
म्यँव म्यँव करत रडत आहे,
खर सांगतो बाबांनो,
वाघोबाला नसतं शहाणपणंच नडतय रे,
हे.. बाबा.. कुणी आमदारकी देता का रे? आमदारकी?
वाघोबाला काम नको,
गरम पाणी नको,
पत्ते नको, भेंड्या नको,
निवडणुक तर नकोच नको,
(3/4)
जीव भांड्यात पडण्यासाठी,
एक हवी आराम खुर्ची..
वाघोबाला बसण्यासाठी,
आणि एक पंतप्रधानपद हवय.....
आमच्या काकांसाठी.....
कुणी आमदारकी देता का रे? आमदारकी?
#राजकीय_नटसम्राट
©️ SwaG
Courtesy - @swanandgangal
आमच्या गावठी चाणक्याच्या विरंगुळ्यासाठी.
एक हवी दिशा,
माझ्या पेंग्विनच्या भवितव्यासाठी 😹😹😹😹